चार्जशिट वाचल्यानंतर आसाराम सारखा माणूस आयुष्यभर जेलमध्ये सडावा असचं वाटेल

सध्या MX प्लेअरवर बॉबी देओलची आश्रम धुमाकूळ घालत आहे. म्हणजे ज्या पातळीवर नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईमच्या सिरीज धुमाकूळ घालतात तशी नाही पण निदान चर्चेत तरी आहेच आहे.

आत्ता ही सिरीज चर्चेत असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक कारण बॉबी देओल असू शकेल पण त्याहून अधिक महत्वाच कारण आहे तो म्हणजे या सिरीजचा विषय. ढोंगी बाबा त्याचा प्रभाव आणि त्यातून वाढलेले भक्त. आश्रमात होणारे अत्याचार आणि शोषण असा सर्व गोष्टी या सिरीजमध्ये आहेत. 

आत्ता सिरीज बघितल्या बघितल्या डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे आसाराम बापूचा. आसाराम बापू आणि या सिरीजमध्ये बऱ्याच गोष्टींच साम्य आहे. म्हणजे या सिरीजमधला बाबा विद्यालय, कॉलेज, हॉस्पीटल काढून समाजसेवेचं ढोंग करतो. 

साहजिक आसारामचा विषय चर्चेत आला आणि बोलभिडू कार्यकर्त्यांनी आसारामचा विषय नेमका काय होता ते डिटेल्समध्ये सांगण्याची विनंती केली. 

तर आपण आज आसारामची कुंडली काढूया इतकच.. 

आसाराम कोण होता ? 

आसाराम पूर्वी कोण होता, तो या बाबागिरीच्या जगात कधी आला हा आपला पहिला प्रश्न. तर आसारामचं पूर्वीचं नाव होतं आसूराम सिरमलानी. त्याचा जन्म पाकीस्तानातल्या सिंध प्रांतातला. फाळणीनंतर आसुरामचे वडील अहमदाबादमध्ये आले. तिथे ते कोळसा आणि लाकडाचा व्यापार करायचे. आसुराम वडीलांना मदत करायचा. त्यानंतर तो दारूच्या चोरट्या विक्रीत गेला. आसुराम चोरून दारू विकायला लागला तेव्हा त्याचं वय होतं फक्त १४ वर्ष. 

दोन नंबरच्या धंद्यातून पुढे गाडी सरकत सरकत थेट गुरू लिला शहा महाराज यांच्या दरबारात गेली. गुरू लिला शहा महाराज हे देखील चांगले नावाजलेले महाराज होते. पण कसय दोन नंबरच्या माणसाला सगळीकडे दोन नंबरच दिसतं. आसुरामला या गोष्टीत धंदा दिसला आणि तो पण महाराज झाला. 

हळुहळु करत गुरू लिला शहा महाराजांचा तो एक नंबरचा फंटर झाला. कालांतराने आसारामं आपलं वेगळं दुकान काढायचा निर्णय घेतला. 

आसाराम बापूने १९७२ साली अहमदाबादमध्ये स्वत:चा आश्रम सुरू केला. हळुहळु किर्ती वाढू लागते. या काळात आसूरामने लग्न केलं. ८० चं दशक आलं तेव्हा त्याने आसुराम नाव मागे ठेवून आसाराम बापू हे नवीन नाव धारण केलं. या काळात त्यांचे आश्रम देखील वाढू लागले होते. आश्रमांची संख्या आणि भक्तांची संख्या दोन्ही गोष्टी वाढू लागल्या होत्या पण फक्त गुजरातच्या ठराविक भागात. अजून आसाराम ग्लोबल झाले नव्हते. 

आत्ता थेट २०१२-१३ चा काळ… 

या काळात आसाराम फक्त गुजरातचं नव्हे तर भारतातलंच प्रस्थ झालं होतं. एकूण १० हजार कोटींच्या वरची मालमत्ता. देशभरात १ हजारहून अधिक आश्रम, तितकेच गुरूकूल आणि जागा. सुमारे ४-५ कोटींच्या संख्येत असणारे भक्त एवढी सगळी माया आसारामने तीस वर्षात गोळा केली. 

याची वेगवेगळी कारण सांगितली जातात. म्हणजे आसाराम हायफ्रोफाईल लोकांना आपले भक्त करत गेला. त्यामुळे गरिब जगता आपोआप पाठीमागे आली. वाजपेयींपासून ते मोदींपर्यन्त प्रत्येकजण मग तो भाजपचा असो किंवा कॉंग्रेसचा तो आसारामच्या दरबारात जाऊ लागला. आसाराम आपल्या भक्तांच्या मार्फत मतदार देखील तयार करत असल्याने राजकारण्यांना आसाराम वर्ज्य नव्हता. 

आसारामचे भक्त या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर जाऊन पोहचले. आसाराम भक्त ही एक व्याख्या होऊन त्यामार्फतच एकमेकांची कामे होऊ लागली. त्यानंतरच्या काळात भारतात आलेल्या सेटॅलाईट टिव्ही ते मोबाईल तंत्रज्ञानाच्या युगात आसाराम आसेतू हिमाचल होऊन बसला. 

असो तर आसाराम कसा मोठा झाला हा विषय नाही तर आसाराम ने काय कांड केले हा आपला विषय आहे. 

तर झालेलं अस की आसारामला ज्या घटनेतून अटक झाली म्हणजे २०१३ पूर्वी देखील त्याच्या नावाने वेगवेगळ्या केस येतच होत्या. कुठे जमीनीचा वाद असायचा तर कुठे अपहरण, खून, मारामाऱ्या असायच्या. 

अशीच एक केस अहमदाबाद पोलीसांकडे २००८ च्या दरम्यान आलेली. अहमदाबादच्या साबरमती नदीत दोन मुलांच्या बॉडी मिळाल्या. चौकशी केल्यानंतर ही दोन्ही मुलं बाबाच्या आश्रमातील असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी या घटनेची चौकशी केल्यानंतर या दोन लहान मुलांचा मृत्यू काळ्याजादूच्या प्रकारातून झाल्याची माहिती मिळत गेली. 

त्यानंतर मध्यप्रदेशातल्या छिंदवाडा येथील गुरूकूल मधल्या दोन मुलांचा मृत्यू झाला. ही देखील सेम केस होती. पण या दोन्ही गोष्टींचा पाठपुरावा झाला नाही. या केसेस तिथेच संपल्या. 

आत्ता गोष्ट सुरू होते ती आसारामच्या प्रमुख कारनाम्याची… 

तर आसारामचे भारतभर आश्रम होते, गुरूकूल होते. गुरूकुलमधून ११ वी १२ वीच्या मुलांना शिक्षण दिले जात असे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात साधारण ४०० मुलं होती. त्यापैकी १०० एक मुली होत्या. जे लोक आसारामचे भक्त आहेत अशी माणसं आपल्या मुलांना आसारामच्या गुरूकूलमध्ये दाखल करायची. निवासी शाळा असं याचं स्वरूप होतं. 

२०१२ साली छिंदवाडा येथील आश्रमात आसारामचा सत्संग होतं. त्यावेळी आसारामची नजर ११ वी मध्ये असणाऱ्या एका मुलीवर गेली. आसारामने त्या मुलीला बोलवून घेतलं तिची चौकशी केली. आसाराम सारखा माणूस आपणाला बोलावून घेतो आणि चौकशी करतो म्हणल्यानंतर मुलगी खूष झाली. 

यानंतर त्या मुलीला निरोप पाठवला जातो की आसारामने तुला पसंत केलं आहे. तू त्यांना एकांतात भेटायला जा. मुलीला संशय वाटतो, मुलगी नकार देते. 

आत्ता आसाराम काय करतो तर हरिद्वारला असणाऱ्या शिल्पी नावाच्या वार्डनला छिंदवाडा इथे पाठवतो आणि त्या मुलीला आपल्याजवळ पाठवून द्यायची जबाबदारी तिच्याकडे देतो. 

शिल्पी नावाची वार्डन त्या मुलीच्या संपर्कात येते. ती आसाराम बापूकडे जाण्याची गळ तिला घालते पण मुलगी काही केल्या तयार होत नाही. तेव्हा शिल्पी थेट त्या मुलीच्या आईवडीलांना फोन करते आणि सांगते की तुमच्या मुलीवर भूतबाधा झाली आहे. स्वत: आसाराम बापू तिच्यावर उपचार करणार आहेत. त्या मुलीची आई आसाराम भक्त असल्याने लगेच तयार होते पण वडील तयार होत नाहीत. 

त्यानंतर शिल्पी त्या मुलीच्या आईवडिलांना सांगते की महाराज जोधपूर जवळच्या त्यांच्या कुटीत येणार आहेत. तिथेच मुलीवर उपचार होतील. तूम्ही देखील या. आईवडिलांच्या समोर हे उपचार होणार असल्याने वडील तयार होतात. 

दूसरीकडे आसाराम जोधपूरला फोन करून शिवा नावाच्या व्यक्तीला जोधपूरमध्ये ९, १० आणि ११ ऑगस्ट रोजी सत्संग ठेवण्याचं सुचवतो.

ठरल्याप्रमाणे ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान सत्संग होतो. 

त्यानंतर विश्रांतीसाठी आसाराम जोधपूर पासून जवळ असणाऱ्या आपल्या एकांतकुटी नामक आश्रमात जातो. इकडेच त्या मुलीच्या आईवडिलांना व संबधित मुलीला बोलवण्यात येतं. 

१३ ऑगस्ट रोजी शहाजहांपूरवरून ती मुलगी तिचे आईवडिल एकांतकुटीत पोहचतात. १३ आणि १४ ऑगस्ट रोजी आसाराम त्यांना भेटत नाहीत पण १५ ऑगस्टच्या सकाळीच त्यांना निरोप पाठवला जातो की आज आसाराम तुमच्या मुलीवर उपचार करणार आहेत. 

त्यानंतर एका खोलीत आसाराम पुढे संबधित मुलगी तिचे आई वडील आणि एखादा दूसरा सहकारी असतो. आसाराम पूजेचं साहित्य मांडतो. काहीकाळ बडबडल्यासारखं करुन तिच्या आईवडिलांना बाहेर जावून पूजा करण्यास सांगतो. याचं कारण विचारल्यानंतर आई वडिलांना सांगण्यात येत की भूत कोणत्याही व्यक्तीवर आक्रमण करू शकतं. बाबा आणि संबधित मुलगीच इथे थांबतील तूम्ही बाहेर जावून पूजापाठ करा. 

आईवडिल आणि उपस्थित असणारे कार्यकर्ते बाहेर जातात आणि आसाराम त्या मुलीवर बलात्कार करतो. 

ही घटना घडली तेव्हा मुलीचं वय फक्त १६ वर्ष होतं. चार्जशिटमध्ये सर्व गोष्टी अगदी डिटेल्स दिल्या आहेत. मुलीसोबत आसारामने मुखमैथून केलं. त्यानंतर आसाराम त्या मुलीला धमकी देतो, ही घटना कोणाला सांगितली तर तुझ्यासह तुझ्या आईवडिलांना मारून टाकण्यात येईल.

मुलगी आईवडीलांसह शहाजहांपूरला आपल्या घरी येते. १६, १७ तारीख जाते आणि १८ ऑगस्ट दिवशी मुलगी धाडस करून आपल्या आईला सर्व घटनाक्रम सांगून टाकते. या गोष्टीनंतर तिची वडील आसराम कुठे आहे त्याची चौकशी करतात. तेव्हा त्यांना समजत की १८,१९,२० तारखेला आसाराम दिल्लीच्या रामलीला मैदानात सत्संग आयोजित करत आहे. 

झालेल्या प्रकाराचा जाब आसारामला विचारायचा आणि केस करायची या उद्देशाने मुलीचे आईवडील आणि मुलगी शहाजहापूरवरून दिल्लीत पोहचतात. १९-२० तारखेला ते रामलीला मैदानात जातात पण आसारामच्या आजूबाजूची लोकं तिच्या वडीलांना आसाराम बरोबर बेट घालून देत नाहीत. 

२० तारखेला सत्संग संपत येवू लागतं तेव्हा त्या मुलीचे आईवडील व मुलगी थेट रामलीला मैदानाजवळ असणारं कमला मार्केट पोलीस स्टेशन गाठतात.

तिथे मुलगी पोलीसांना घडलेला प्रकार सांगते. आसारामचं नाव ऐकताच पोलीस अधिकारी ही घटना आपल्या वरिष्ठांना कळवतात. सुरवातीला जोधपूरची घटना असल्याने ही FIR जोधपूरलाच दाखल करता येईल अस पोलीस सांगतात पण वरिष्ठांना आसाराम असल्याने हे प्रकरण दाबलं जाईल याची शंका येते.

वरिष्ठ पून्हा ZERO FIR दाखल करण्यास सांगतात. झिरो FIR नुसार घटना कुठेही घडली असो व्यक्ती आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला FIR दाखल करु शकतो. पुढच्या तपासासाठी ही FIR पोलीस ट्रान्सफर करत असतात. कमला मार्केटमध्ये FIR दाखल करुन ती जोधपूर पोलीसांकडे देण्याचा निर्णय घेण्यात येतो. 

FIR दाखल झाल्यानंतर मिडीयात बातमी फुटते आणि आसाराम गायब होतो. दरम्यानच्या काळात जोधपूर पोलीस एकांतकुटीवर धाड टाकतात. पुरावे गोळा करतात आणि आसारामला ३१ ऑगस्ट अखेर शरण येण्याचं फर्मान सोडतात. 

३१ ऑगस्ट रोजीचं पोलीसांना टिप मिळते की आसाराम त्याच्या इंदौरच्या आश्रमात लपून बसला आहे. आसारामला अटक केली झाले आणि पॉस्को अंतर्गत कारवाई केली जाते. 

त्यानंतर आसारामचा पोरगा नारायणसाईचा फास आवळण्यात आला. एकामागून एक घटना समोर येऊ लागल्या. एकूण साक्षिदारांपैकी ९ जणांवर हल्ले करण्यात आले त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला. घटनेची चौकशी करणारे अजय पाल लांबा या पोलीस अधिकाऱ्यांना एकूण १६०० धमक्यांची पत्रे मिळाली. राम जेठमलानी आणि सुब्रम्हण्यम स्वामी यांच्यासारखे वकिल आसारामने दिले पण काहीच फायदा झाला नाही. 

२०१८ साली जेव्हा केसचा निकाल लागला तेव्हा न्यायाधीश म्हणाले आसाराम सारख्या माणसाने कधीही जेलमधून बाहेर पडता कामा नये. आसाराम सारखा माणूस जिथं जाणं गरजेचं होतं तिथेच जाऊन अखेर सडत राहिला. 

हे ही वाच भिडू 

8 Comments
  1. Saurabh Patil says

    Hello there admin.. you are sharing informative article now a days I’m glad to comment that,the article are really interesting
    I suggest you to launch your Application on play store so like me others can also read this

  2. A says

    आसाराम आणि पतंजली मधे काही तरी कनेक्शन असावं, कारण आसाराम जे प्रोडक्ट विकत होता ते नंतर पतंजली चे झाले आणि फार फायद्याचे ठरले. अजून एक प्रश्न आहे, ८६ व्या वर्षी जिथं सामान्य म्हातारे लघुशंका करतांना धोतरापासुन लांब पडली तरी मोठी गोष्ट मानतात, त्या वयात बाबा ने एवढं काळं काम केलं, बाबा नक्की कुठली जडीबुटी खात असेल?

  3. Mukund says

    विश्व हिंदू परिषद के अध्यक्ष रहे,स्व० मा.अशोक सिंघलजी का यह मानना था की Pujya Sant Shri Asharamji Bapu को झूठे षडयंत्र मे फंसाया गया है।उन्होंने इसके विरुद्ध आवाज़ भी उठाई थी आएं हमसब उनकी आवाज को बुलंद बनाएं ✊ https://t.co/r5OwWmC197

  4. Hitesh says

    बोल भिड़ू के एडमिन आज तक मैं तुम्हारे सब आर्टिकल पढता था, उसमे सच्चाई दिखती थी पर तु भी साला कांग्रेस का भड़वा निकला जो सच्चे हिन्दू साधु संतों पर झूठे इल्जाम लगाते है अगर दम है तो खुद जाकर सच्चाई पता कर या लडक़ी की मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करके बता ।

  5. Suhas says

    I think the story of Ashram go more near to Ram Rahim baba from Punjab and Haryana..being a Messiah of Dalits..and skeletons and Tunnels in Ashram… anyway Asaram is bird of the same Father/Feather..😂

  6. Girish says

    Asaram bapu ko fasa ya gaya hai ,kyu ki wo hindu sant hai , charch ke dharam guru ,maulavi ye log ke pass bhi karodo ki sampati hai lekin koi bolega nahi ,bollywood wale bhi jaan buz kar hindu dharam ka apman karte hai .agar 80 year me asaram bapu aise kaise karegay ye to pahile bhi kar sakte the tab kyu naam nahi liya koi . CBI ne bhi clean chit diya .asaram bapu khood valentine day ka virodh kiya .matru puja n day balaji ne hi nikala hai .media walo ne bhi such ko daba diya .is desh ko media barbad kar degi

  7. yogashri deore says

    jar lekhak hindu aai wadilanchya pocti janmala aala asel tr purwi pasunch hindu santanwar honare atyachar aani khote aarop ya babat mahiti aselch … prantu hindu wirodhi boliwood che talwe chatat tumhi surwatilach aashram webseries che udaharan deun aaplya murkha panacha parichay dila
    jar aasharamji bapunbaddal lihay chech asel tr thode hat pay ghasa aani tyanchya kontyahi ashramala bhet dya .. tevha kalel ki andharat nishana lawne yogya nahi .. he karoon apn aaplyach sanskriticha ghat karat aahot . chatrapati shivaji maharaj jyani sant aani sanskriticha samaan karayla shikwale .. tyach maharashtrat nirdosh santanchi itkya ghanerdya shabdat vitambana karoon aapan hindu aani marathi shabdala kalima phasat aahat .
    jay shivray

  8. Yogashri says

    अनेक वर्षापासून हिंदुत्ववादी कार्यासाठी आम्ही त्यांच्या संस्थेशी जोडले गेलो आहोत . आपल्या ब्लॉग मध्ये लिहिलेला कोणताही प्रकार आम्ही अनुभवलेला नाही. कारण फक्त भांड बॉलीवूड
    वर विश्वास ठेवून त्यांची पाय चाटत आम्ही एका निर्दोष महान संताबद्दल धारणा बाळगली नाही. आश्रम या वेब सिरीज चा उल्लेख करून तुम्ही तुमच्या मूर्खपणाचा परिचय दिला परंतु जर संपूर्ण भारतभरातील कोणत्याही आश्रमात जाऊन तुम्ही प्रथम शहानिशा केली असती तर ती समजदार ठरली असती ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी संत संस्कृती धर्माचा आदर सन्मान करणे शिकवले त्याच महाराष्ट्रात राहून ज्या संतांनी हिंदुत्वासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले त्यांच्यासाठी वाटेल ते लिहिताना लाज वाटली पाहिजे. जय शिवराय

Leave A Reply

Your email address will not be published.