देशापुढे जातधर्म फिका असतो याच उत्तम उदाहरण : अश्फाकउल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल

बऱ्याच क्रांतिकारकांची नावं ही एकत्र घेतली जातात जसं की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. असेच दोन क्रांतिकारक आहेत ज्यांची नावं ही एकत्र घेतली जातात ते म्हणजे रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाकउल्ला खान. त्यांची ओळख फक्त इतकीच नाही की ते काकोरी कांडामध्ये सहभागी होते तर त्याहून पलीकडे या दोघांची एकमेकांसोबत घट्ट मैत्री होती. दोघांनी जीव दिला व कधी एकमेकांला धोका दिला नाही.

रामप्रसाद बिस्मिल यांच्या नावापुढे पंडित लागलेलं होतं तर अश्फाकउल्ला खान मुसलमान होते. पण दोघांना याचा काहीच फरक पडला नाही उलट दोघांचं एकच ध्येय होतं ते म्हणजे इंग्रजांच्या तावडीतून भारताची मुक्तता करणे.

अश्फाकउल्ला खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1900 रोजी उत्तरप्रदेश मध्ये झाला. आपल्या चार भावंडांमध्ये अश्फाक सगळ्यात छोटा होता पण तो नवीनच उदयास आलेला प्रसिद्ध शायर म्हणून ओळखला जाऊ लागला होता. जेव्हा जेव्हा अश्फाक घरी शायरी लिहीत असे तेव्हा त्यांचे मोठे बंधू सोबत शिकणाऱ्या रामप्रसाद बिस्मिलचा उल्लेख आवर्जून करायचे. रामप्रसाद बिस्मिल यांचे किस्से ऐकूनच अश्फाक त्यांचे फॅन झालेले होते.

याच काळात रामप्रसाद बिस्मिल यांचं नाव इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या लोकांमध्ये येऊ लागलं या केसला नाव पडलं मैनपुरी कोन्स्पिरेसी. अश्फाक सुद्धा भारताला स्वातंत्र्य करण्याच्या ध्येयाने झपाटलेले होते. त्यांना रामप्रसाद बिस्मिल यांना भेटायची ओढ लागली आणि बऱ्याच दिवसांनी अश्फाक रामप्रसाद बिस्मिल यांना भेटले.

त्या काळात गांधीजींनी असहयोग आंदोलन सुरू केलेलं होतं.उत्तरप्रदेशात एका भाषणासाठी रामप्रसाद बिस्मिल आले होते. अश्फाक लगेच तिथं जाऊन पोहचले आणि तुमच्या मित्राचा मी छोटा भाऊ असल्याचं सांगितलं आणि सांगितलं की मी हसरत आणि वारसी नावाने शायरी लिहितो. मग रामप्रसाद बिस्मिल यांचा इंटरेस्ट वाढला आणि तिथून त्या दोघांची दोस्ती सुरू झाली. क्रांतिकारी कवीटा सादर करताना ते दोघे सोबतच दिसू लागले आणि त्यांची मैत्री घट्ट होत गेली.

1922 साली गांधीजींनी असहयोग आंदोलन मागे घेतल्याने तरुणांचा मोठा भ्रमनिरास झाला आणि मग रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाकउल्ला खान यांनी बंदूक हातात घेऊन आपला मार्ग निवडला.यातच त्यांनी काकोरी कांड घडवून आणलं आणि मोठी दहशत इंग्रजांमध्ये निर्माण केली. पण जेव्हा अश्फाकउल्ला खान यांना अटक करण्यात आली तेव्हा तत्कालीन एसीपी तसदूक हुसेन खान यांनी रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाक यांची दोस्ती हिंदू मुस्लिम भांडणं लावून तोडण्याची कोशीश केली आणि साक्षीदार झाला तर रामप्रसाद बिस्मिल यांना अटक केली जाईल आणि तुला सोडून देण्यात येईल अशी ऑफर देऊ केली त्यावर अश्फाक यांनी त्यावर दिलेलं उत्तर इतिहासात अजरामर झालं,

खान साहब! पहली बात, मैं पंडित राम प्रसाद बिस्मिल को आपसे अच्छी तरह जानता हूं. और जैसा आप कह रहे हैं, वो वैसे आदमी नहीं हैं. दूसरी बात, अगर आप सही भी हों तो भी एक हिंदू होने के नाते वो ब्रिटिशों, जिनके आप नौकर हैं, उनसे बहुत अच्छे होंगे.

19 डिसेंबर 1927 रोजी अश्फाकउल्ला खान याना फाशी देण्यात आली पण त्यांचा हा मित्रावर असलेला जीव जगात धार्मिक तेढ निर्माण करू पाहण्याऱ्याना एक जोरदार झापड मारून गेला. आपल्या डायरीत अश्फाकउल्ला खान लिहितात ,

किए थे काम हमने भी जो कुछ भी हमसे बन पाए,ये बातें तब की हैं आज़ाद थे और था शबाब अपना
मगर अब तो जो कुछ भी हैं उम्मीदें बस वो तुमसे हैं,जबां तुम हो लबे-बाम आ चुका है आफताब अपना…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.