बिझनेसमन लोकांच्या उल्हासनगरमध्ये युट्युबचा किंग जन्माला आला : आशिष चंचलानी
यू ट्यूब म्हणल्यावर सगळ्या जॉनरचे व्हिडिओ पाहायला मिळतात पण लोकं सगळ्यात जास्त प्रेफर करतात ते म्हणजे कॉमेडी व्हिडिओ. दिवसभर कामधंदे करून थकलेले भिडू रात्री डोक्याचा शिणभाग हलका करण्यासाठी कॉमेडी व्हिडिओ बघतात. आता कॉमेडी करणारे पण बरेच असतात पण एखादाच कॉमेडी किंग असतो आणि तो म्हणजे आशिष चंचलानी.
साधं कामच नाही, यू ट्यूबवर कॉमेडी कंटेंट काय असला पाहिजे आणि लोकांना पोट धरून कसं हसवत ठेवायचं याचं गणित आशिष चंचलानीला चांगलंच कळलंय. पण यू ट्यूबवर आपलं साम्राज्य उभं करणाऱ्या आशिष चंचलानीचा संघर्ष सुद्धा खूप खडतर आहे.
तर जाणून घेऊया आशिष चंचलानीच्या यशस्वी कॉमेडी किंग बनण्यापर्यंतचा प्रवास.
७ डिसेंबर १९९३ रोजी उल्हासनगरमध्ये आशिष चंचलानीचा जन्म झाला. घरची परिस्थिती उत्तम होती आणि आशिषला अभिनेता बनायचं होतं. अक्षय कुमारला तो आदर्श मानतो. अभ्यासूपणा अंगात ठासून भरलेला होता पण लाजाळू स्वभाव कायम नडायचा. त्यातही शरीराने जरा जास्तच सुदृढ असल्याने शाळेतल्या नाटकातून त्याला काढून टाकण्यात आलं. पण अभिनय करायचा होता, ऍक्टर बनायचं त्याच्या मनात पक्क ठरलेलं होतं.
एकदा शाळेमध्ये वर्गशिक्षकांची मिमिक्री करताना शाळेच्या एका स्टाफने आशिष चंचलानीला पाहिलं.
अगोदर तो व्यक्ती आशिषवर ओरडला पण नंतर मात्र त्याने आनंदाने आशिषला शाळेच्या फंक्शनमध्ये सहभाग घ्यायला सांगितला. शाळेच्या एका फंक्शनमध्ये एक स्क्रिप्ट आशिषला देण्यात आली. त्याने एकदाच ती स्क्रिप्ट वाचली आणि ऐन परफॉर्मन्सच्या वेळी पदरचे डायलॉग त्यात टाकले. लोकांना त्याचं इंप्रोव्हमेंट चांगलंच आवडलं. इथूनच खरी प्रेरणा आशिष चंचलानीला मिळाली. यानंतर शाळेच्या प्रत्येक फंक्शनमध्ये आशिषला संधी मिळत गेली. आपल्या कॉमेडी अंदाजाने आशिषने लोकांना चांगलंच एंटरटेन केलं.
आता एवढं झाल्यावर डोक्यात अभिनयाचं भूत चांगलंच घुसलं.
त्याला ऍक्टर बनायचं होतं पण आशिषच्या वडिलांना हे चांगलंच माहिती होतं की त्या क्षेत्रात कामाची शाश्वती नाही म्हणून. वडिलांनी त्याचा एक स्पेशल सेशन घेतला आणि त्याला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आशिषला सुद्धा ते पटलं आणि पुढे जाऊन १२ वीत चांगले मार्क पडल्यावर इंजिनिअरिंग करण्याचा त्याने निर्णय घेतला.
शिक्षण घेत असतानाच बॅरि जॉनच्या अभिनय शाळेचा कोर्स त्याने केला जेणेकरून त्याचा पुढे त्याला फायदा झाला. एकदा फेसबुकवर एक ६ सेकंदाचा कॉमेडी व्हिडिओ आशिषने बघितला आणि त्या व्हिडिओवर तो बराच वेळ हसत होता मग त्याच्या डोक्यात विचार आला की आपणही असंच काहीतरी करायला हवं.
यानंतर मात्र आशिषने मागे वळून पाहिलं नाही त्याने आपले बरेच कॉमेडी व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकौंटवरून टाकायला सुरवात केली. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर आशिष चंचलानीला चांगला सपोर्ट मिळाला आणि मग तो यू ट्यूबवर आला.
कॉलेजमध्ये तो इव्हेंट हेडसुद्धा होता त्यामुळे त्याला त्याच्युअ टाईपचा फॅनबेस मिळत गेला. आज घडीला भरपूर प्रमाणात त्याचा फॅन बेस तयार झालेला आहे. भारतातला ४ था आणि महाराष्ट्रातला १ ला असा यूट्यूबवर आहे की ज्याला पहिल्यांदा सिल्व्हर बटण यू ट्युबकडून मिळालं होतं. आशिष चंचलानी किती मोठा सेलिब्रिटी आहे हे त्याच्या सबस्क्रायाबर वरून अंदाज लावू शकता.
आवडत्या क्षेत्रात काम केल्याने आपण प्रो झालो असं तो म्हणतो. यू ट्यूबवर आपल्या कॉमेडी कंटेंटने लोकांना हसवणे आणि आनंद लुटणे हेच आपलं युनिव्हर्स असल्याचं तो मानतो.
हे ही वाच भिडू :
- ट्विटर एखाद्याच अकाउंट कायमच सस्पेंड करू शकतं का? जस कंगनाच केलंय.
- फॅमिली मॅन मध्ये दाखवलेली संघटना जर लिट्टेशी साधर्म्य दाखवत असेल तर वाद होणारच कारण
- अख्या सोशल मीडियावर लक्षद्वीपला वाचवण्यासाठी मोहीम का सुरु आहे?