एकेकाळी क्रिकेटच्या मैदानात सिक्सर मारणारी ती आज टेनिस सम्राज्ञी बनली आहे.

हळू आणि स्थिरतेने शर्यत जिंकता येते, बरोबर ?

पण अवघ्या २३ वर्षाचा खेळाडू धीमा कसा काय असू शकतो ? तिचे करीयर फक्त काही वर्षापूर्वी सुरु झालेले असताना, तिचे पहिले ग्रँडस्लॅम शीर्षक हे तिच्या दीर्घकाळाच्या स्थिरतेचे यश कसे म्हणता येईल ?

कारण अॅश्ले बार्टी एक वेगळीच जिद्द असलेली खेळाडू होती जिचे कायम काहीतरी मोठे करण्याचे ध्येय असायचे. एका विचाराने तिला टेनिस पासून दूर होण्यास भाग पाडल होत.

एक ऑस्ट्रेलियन हौशी खेळाडू जिने वयाच्या १५व्या वर्षी विम्बलडन ज्युनिअर खिताब जिंकला होता. वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत तिने केसी डेलॅकक्का हिच्या सोबतीने ग्रँडस्लॅम डबल्समध्ये तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. पण वयाच्या १८व्या वर्षी तिने कंटाळा, एकाकीपणा आणि दबावामुळे टेनिस सोडले आणि क्रिकेट सुरु केलं.

पुढे ती ऑस्ट्रेलियन फर्स्ट क्लास क्रिकेटच्या वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळू लागली. पहिल्याच सामन्यात २७ चेंडूत तिने ३९ धावा तडकावल्या. तेव्हा तिथल्या कोचने ओळखले की,

“ती ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी खेळू शकते.”

1444804582746

परंतु अॅश्ले जास्त वेळ क्रिकेटमध्ये रमली नाही. तिच्यासाठी टेनिस हेच खर प्रेम होत. पूर्वी टेनिस सोडण्याचा तिचा निर्णय तिच्या आयुष्यात महत्वाचा ठरला. कारण याच निर्णयामुळे ती क्रिकेटकडे गेली आणि आपल्या आयुष्यातील टेनिसचं खर महत्व लक्षात आलं होत. तिला स्वताला ओळखण्यास मदत झाली . तिच्या कारकिर्दीला योग्य दिशा मिळाली होती.

२०१६ मध्ये ती टेनिस कोर्टवर परतली ते एका नव्या जोशात!!

मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एका नव्या दृष्टीकोनातून लढण्यास ती सज्ज झाली. २०१७ मध्ये क्वालालंपूर येथे शेवटच्या सीजन मध्ये तिने आपल्या कारकीर्दीचा पहिला खिताब जिंकला. हा खिताब जिंकत ती क्रमवारीत टाॅप २० मध्ये आली.२०१८ मध्ये फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत ती सेरेना विल्मस कडून पराभूत झाली.

पण या वर्षी ८ जूनला फ्रेंच ओपनच्या फायनल मध्ये तिने मार्केता व्हाँड्रॉसोव्हा हिला ६-१ ६-३ अशा सरळ सेट मध्ये हरवून आपल्या कारकिर्दीत मधील पहिले ग्रँड स्लॅम शीर्षक जिंकले. संयम आणि स्थिरता खरोखरच जिंकु शकते.

Ashleigh Barty social AFP

बार्टी विंबलडन ज्युनिअरची विजेती होती. पण तिला मातीच्या कोर्टची आवडत नव्हती. सगळ्याना वाटायचं ती केवळ गवताच्या कोर्टवर खेळी शकते.  गेल्या वेळीच्या फ्रेंच ओपन मधील ५ सामनांपैकी फक्त दोनच सामने जिंकली होती. तेव्हा ती म्हणाली होती की,

“मातीवरील प्रत्येक आठवडा हा गवताच्या जवळ जाणारा आठवडा आहे”

पण एवढ्या लवकर हे साध्य होईल अस वाटत नव्हत. त्यानंतर ती माद्रीद ओपनच्या क्वार्टर फायनल मध्ये पोहचली, रोम ओपनच्या सिंगल्स मध्ये हरल्यानंतर तिने व्हिक्टोरिया अझरेन्काबरोबर डबल्स मध्ये विजय मिळवला.

४६ वर्षाच्या इतिहासात फ्रेंच ओपन खिताब जिंकणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू बनली तर इव्होने गोलागॉंग केव्हलीनंतर दुसरी स्वदेशी ऑस्ट्रेलियन ठरली. सध्याच्या महिला टेनिस क्रमवारीत ती दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.