‘शार्क टॅंकमधल्या’ या शार्कला त्याच्याच कंपनीतून काढून टाकण्याच्या हालचाली चालू आहेत

शार्क टॅंक या रिऍलिटी शोचं एक वेगळंच खुळ लोकांना लागलंय. असंही इंडियन लोकं रिऍलिटी शोला उचलून धरतातच त्यात शार्क टँकची आयडिया पण एकदम नवीन आणि भन्नाट. तुम्हाला आतापर्यंत शेकडो बिझनेस आयडिया आल्या असतील पण सगळ्यांचा घोडं अडतं पैशामुळे. हा शो बरोबर हाच प्रॉब्लेम सोडवतो. 

तुम्ही शोच्या जजकडे आयडिया घेऊन जायची आणि मग तुमची आयडिया आवडली तर शो चे परीक्षक म्हणजे शार्क्स तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करणार.

आता ह्यातले शार्क्स पण सगळे यशस्वी स्टार्ट अप चालवनारे आहेत. पण ह्यातला सगळ्यात जास्त हवा करतोय तो म्हणजे भारत पे चा सहसंस्थापक अश्निर ग्रोव्हर.अशनीर ग्रोव्हर बरोबरच अमन गुप्ता (boAt सह-संस्थापक), नमिता थापर (Emcure Pharmaceuticals चे कार्यकारी संचालक), पीयूष बन्सल (Lenskart चे सह-संस्थापक), अनुपम मित्तल (शादी डॉट कॉमचे संस्थापक), गझल अलघ . (Mamaearth च्या सह-संस्थापक) आणि विनीता सिंग (SUGAR Cosmetics च्या संस्थापक) हे शार्क्स चांगलेच फेमस आहेत.

 मात्र अश्निर ग्रोव्हर भाऊ स्पर्धकांना कोणतीही दया मया ना दाखवता सरळ त्यांच्यावर तुटून पडतो. त्याच्या या तापट स्वभावामुळं त्याला त्याला तुफान ट्रोल केलं जातंय.

 तर त्याच्या या ‘नो नॉन्सेन्स’ ऍटिट्यूड चे काही फॅन पण आहेत.

मात्र त्याच्या खरी आयुष्यात पण अश्निर ग्रोव्हर रागीट स्वभावामुळे चांगलाच गोत्यात सापडलाय. सुरवात झाली नायकाच्या IPO मुळं. कोटक बँकेच्या कोटक मॅनेजमेंटमुळं आपल्याला नायकाचा IPO मिळत नाही असं म्हणत त्यांनी बँकेला आधी नोटीस पाठवली आणि त्यांनतर बँकेच्या एका कर्मचाऱ्याला फोन कमी करून शिवीगाळ केली. 

कोटक बँकेनं पण हे प्रकरण सिरिअसली घेत अश्निर ग्रोव्हरवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं. 

पण प्रकरण इथंच थांबलं नाही.अश्निर ग्रोव्हरमुळे कंपनीची बदनामी होतेय असं म्हणत कंपनीनं अश्निरला सक्तीच्या रजेवर पाठवलं असं सांगण्यात येतंय. अश्निर मात्र आपण स्वतःहून सुट्टी घेतलं असल्याचं सांगतोय. लाइव्ह मिंटवरील वृत्तानुसार, भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर सध्या आर्थिक फसवणुकीच्या चौकशीत आहे. 

कारवाईच्या जवळच्या सूत्रांनी असे उघड केले आहे की ग्रोव्हरला भारतपेमधून काढून टाकले जाऊ शकते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका लॉ फर्मला आणण्यात आले आहे आणि तपास दोन महिने चालण्याची शक्यता आहे.

 या कारवाईच्या जवळच्या सूत्रांनी असे उघड केलयं की ग्रोव्हरला या आरोपांमुळे भारतपेमधून काढूनही टाकले जाऊ शकते.

हे सगळं चालू असताना अश्निर ग्रोव्हर यांच्या पत्नी आणि भारत पेच्या हेड ऑफ कंट्रोल्स माधुरी जैन यांना यांनी कंपनीतून काढून टाकल्याच्याही बातम्या आल्या. मात्र कंपनीच्या मॅनेजमेंटने नंतर स्पष्टीकरण देत कंपनीने सध्यातरी कोणाला काढून टाकले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

त्यामुळं अश्निर ग्रोव्हरच हे वागणं बघून त्यालाच आता ‘‘ये क्या दोगलापण है’ हा त्याचाच डायलॉग वापरून ट्रोल करण्यात येतंय.

हे ही वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.