मशरूम शेतीतून पापड ,लोणचं आणि 89 प्रकारचे प्रोडक्ट बनवुन ते लाखो रुपये कमावतायत…
आजच्या काळात जर तुम्हाला सक्सेसफुल गाण्याचा स्टेटस ठेवायचा असेल तर तेवढी मेहनतसुद्धा लागते. फक्त मेहनतचं नाही तर चांगलं व्हिजनसुद्धा हवं. शेतकरी फक्त मेहनत न करता नफ्याचं व्हिजन कसं ठेवतात याबद्दलची आजची माहिती एका शेतकऱ्याची ज्याने आपल्या हुशारीने आणि मेहनतीने लाखो रुपये कमवायला सुरवात केलीय.
शेतीमध्ये पर्याय नसल्याचं अनेक शेतकरी बोलताना दिसतात पण अशोक कुमार वशिष्ठ या शेतकऱ्याने शेतीत इतके पर्याय तयार केले की त्याच्याच जोरावर त्यांनी नफा कमवायला सुरवात केली. हरियाणामध्ये जिंद भागात अशोक कुमार वशिष्ठ यांचं फक्त 10 वी पर्यंत शिक्षण झालं. मग पुढे काहीच करायला नाही म्हणून ते शेती बघू लागले. पाच एकर शेतीत कुटुंब पोसायची जबाबदारी अशोक कुमार वशिष्ठ यांच्यावर होती. त्यांना शेतीत काहीतरी वेगळं करून पाहायचं होतं.
2007 साली अशोक कुमार वशिष्ठ यांना मशरूम शेतीची माहिती मिळाली. तेव्हाच त्यांनी डन करून टाकलं की आता आपण मशरूम शेती करायची. पण त्यांना मशरूम शेती कशी करतात याचं नॉलेज नव्हतं मग ते त्यांनी सोनिपत मध्ये राहणाऱ्या त्यांच्या काही ओळखीच्या लोकांशी चर्चा केली . त्या लोकांच्या सल्ल्यानुसार अशोक कुमार वशिष्ट मुरथल मधल्या मशरूम ट्रेनिंग सेंटरला ट्रेनिंगसाठी गेले. तिथं डॉ. अजय सिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं शिक्षण सुरू झालं.
डॉ. यादव त्यांना म्हणाले की ट्रेनिंग साठी बरेच जण येतात पण करत मात्र कोणीच नाही. या वाक्यावर अशोक कुमार वशिष्ठ यांनी खूणगाठ बांधली की आपण मशरूमचीच शेती करायची. आपल्या जुन्या घरात त्यांनी मशरूमचं युनिट लावलं. पहिल्यांदा म्हणावं तसं यश मिळालं नाही पण सगळं गेलं आणि तोटा झाला असंही काही नव्हतं. पण त्यांनी हार मानली नाही आणि ट्रेनिंग घेत राहिले. अनेक मोठमोठ्या कृषी विद्यापीठाशी त्यांनी चर्चा केली आणि दरवेळी युनिट बदलत राहिले आणि त्याला व्यावसायिक रूप देत राहिले. बऱ्याच लोकांचा समज आहे की मशरूम हे नॉन व्हेज असतं तोच समज त्यांना दूर करायचा होता.
मग अशोक कुमार वशिष्ठ यांनी लोकांमध्ये मशरूम बाबतीत जागरूकता निर्माण करायला सुरुवात केली. प्रोसेसिंग करून नवनवीन प्रोडक्ट बनवायला त्यांनी सुरवात केली. यात तरकारी, लोणचं यांचा समावेश होता ते प्रोडक्ट त्यांनी लोकांना विकायला सुरवात केले. लोकांकडून मागणी वाढू लागली.
आज घडीला 89 प्रकारचे प्रोडक्ट ते बनवतात. मशरूम पापड, बर्फी,जिलेबी, लाडू सुद्धा ते बनवतात. वर्षाला 10 लाख रुपये ते कमावतात. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं आहे.
हे ही वाच भिडू :
- आजोबांचं स्वप्न पूर्ण करत दोघा बहीण भावांनी inc 5 ब्रँड उभा केला….
- श्रीमंतांचं स्टेटस सिम्बॉल असणारं झारा, जाहिरातीवर शून्य रुपये खर्च करून ही टॉप ब्रँड बनलंय
- अनेक अपयशे पचवली आणि अखेर १००० कोटींचा काचेच्या भांड्याचा ब्रँड उभा केला …
- के’सागरने क्लासेस उघडले नाहीत पण अधिकाऱ्यांच्या पिढ्या घडवणारा ब्रँड उभा केला