लंडनमध्ये शिकलेला इंजिनियर बायकोच्या हट्टापायी गँगस्टर बनला.

मुंबईत एकेकाळी अंडरवर्ल्डचं साम्राज्य होतं. खुद्द डॉन दाऊद इब्राहिमचं सुरुवतीचं बरंचसं आयुष्य इथेच व्यतीत झालं. मुंबईत कुख्यात गुन्हेगारांसोबत त्यांच्या पत्नींचा सुद्धा बोलबाला झाला. नवरा वाईट धंदे जरी करत असला तरीही या गुन्हेगारांच्या पत्नींना त्यात काही वावगं वाटायचं नाही. उलट नवरा जेलमध्ये गेल्यावर त्यामागे सगळा कारभार या स्त्रिया समर्थपणे सांभाळायच्या.

खूपदा म्हटलं जातं की, वाईट परिस्थितीमुळे एखादा माणूस गुन्हेगारीचा मार्ग निवडतो. पण अंडरवर्ल्डच्या इतिहासात असाही एक गुंड होता. ज्याने केवळ पत्नीच्या सांगण्यावरून ही गुन्हेगारी वाट निवडली.

ही कहाणी कुख्यात गँगस्टर अश्विन नाईक आणि त्याची पत्नी निता नाईक यांची.

ही कहाणी सुरू होते १९८० साली. निता आणि अश्विन यांचं एकमेकांवर प्रेम होतं. निता ही गुजराती होती.
मुंबईतील एक पॉश भाग म्हणजे ब्रीच कँडी. निता या भागात राहायची. तिचं शिक्षण कॉन्व्हेन्ट शाळेतून
झालं होतं. तर अश्विन हा महाराष्ट्रीयन. अश्विनचा भाऊ अमर नाईक हा प्रसिध्द डॉन. मुंबईतील एक
सामान्य भाजी विक्रेता ते डॉन असा अमर नाईकचा प्रवास होता.

बॅक टू द स्टोरी.. अश्विन आणि निता परस्परांच्या प्रेमात हरवून गेले होते. नीताच्या कुटुंबाला या दोघांच्या प्रेमाबद्दल कळलं. त्यामुळे दोघांच्या लव्हस्टोरीला थोडा ब्रेक बसला.

दोघांनी स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. निताने सोफाया कॉलेजमधून आर्टसमध्ये डिग्री घेतली.
तर अश्विन इलेक्ट्रिकल इंजिनियर होण्यासाठी थेट लंडनला गेला. सध्याच्या भाषेत आपण ज्याला लाँग
डीस्टन्स रिलेशनशिप म्हणतो, तसाच काळ या दोघांनी अनुभवला. इतके दूर असले तरी दोघांचं
एकमेकांवर असलेलं प्रेम कमी झालं नाही. अश्विन लंडनला शिकून पुन्हा मुंबईत आला. नीता शी लग्न
करायचं होतं. परंतु नीता च्या घरच्यांची परवानगी नव्हती.

अजिबात वेळ न दवडता अश्विन आणि नीताने पळून जाऊन लग्न केलं.

लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष नीता आणि अश्विन मुंबईत राहिले. दोघांचं वैवाहिक जीवन आनंदात सुरू
होतं. यादरम्यान अश्विनचा भाऊ अमर नाईक मुंबईतील अट्टल गँगस्टर बनला होता. अमरच्या कृत्यांचा
परिणाम अश्विन च्या जीवनावर सुद्धा होत होता. येता-जाता त्याला माणसं ‘डॉनचा भाऊ’ असं संबोधायचे.

अश्विनला लोकांचं हे बोलणं सहन झालं नाही. म्हणून अश्विनने नीता सोबत मुंबई सोडण्याचा निर्णय
घेतला. मुंबई सोडून हे दोघे चेन्नईला सेटल होणार होते. घर शोधण्याच्या निमित्ताने हे दोघे काही वेळेस
चेन्नईला जाऊन सुद्धा आले होते.

१९९१ ची ही गोष्ट. अश्विन आणि नीता चेन्नईहून परतले.

सांताक्रूझ एअरपोर्ट वरून घरी जात असताना अश्विनच्या‌ गाडीवर छोटा राजनच्या गँगने गोळीबार केला. निता अश्विनच्या मागच्या गाडीत होती. छोटा राजनच्या गँगमधील २० माणसांनी अश्विनच्या गाडीवर गोळ्यांचा वर्षाव केला. अश्विन जवळ प्रतिकार करण्यासाठी काहीच शस्त्र नव्हतं हे नीताला ठाऊक होतं. नीता तिच्या गाडीतून उतरली आणि तिने जोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. एव्हाना हल्लेखोरांनी तिथून पळ काढला होता. सुदैवाने हल्ल्यातून स्वतःचा बचाव करून अश्विन तिथून निसटला होता.

या घटनेचा अश्विन वर आणि विशेषतः नीता वर खोल परिणाम झाला. आपल्या पतीच्या जीवाला धोका
आहे हे नीता ला यामुळे कळून आलं होतं. स्वतः पेक्षा सुद्धा जास्त अश्विन वर प्रेम असणाऱ्या नीताने
अश्विनला सांगितलं,

“तू मला माझ्यासोबत हवा आहेस कायम. मला तुझं मृत शरीर बघण्याची काडीचीही इच्छा नाही.”

नीताच्या प्रत्येक शब्दांमागे पतीविषयी असलेलं प्रेम आणि काळजी होती. काहीही करून अश्विनने सुरक्षित राहावं असं नीताला वाटत होतं. अखेर नीताच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अश्विन अंडरवर्ल्डमध्ये सहभागी होण्यास तयार झाला. काटेकोर योजना आणि नियोजन या गुणांमुळे अश्विन लोकप्रिय झाला. मुंबईच्या माफिया वर्तुळात पहिला उच्चशिक्षित गॅंगस्टर म्हणून अश्विन नाईक ओळखला जाऊ लागला.

अश्विन गँगस्टर झाल्यावर नीताने काय केलं? हा प्रश्न तुमच्या मनात आला असावा. अश्विन आणि नीता
या दोघांच्या लव्हस्टोरीचा शेवट अत्यंत दर्दभरा. ट्रॅजेडी अशी की, अश्विनने त्याच्या माणसांना सांगून नीता
चा खून केला असे आरोप केले गेले. अजूनही हि कोर्ट केस चालू आहे. असो ! ती स्टोरी पुन्हा कधीतरी…

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. Iqba Bepari says

    1994. In Kolhapur when Ashwin Naik transfer in kadamba jail at Kolhapur. that’time I am working as a receptionist in Mira hotel Kolhapur. Neeta Nayak stay in Mira hotel… very good human being …

Leave A Reply

Your email address will not be published.