मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या असिफला मारल्याबद्दल महंतांना थोडाही पश्चाताप नाही..

गेल्या काही दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस होता ११ मार्च. या दिवशी देशभर एक व्हीडीओ व्हायरल होत होता. #सॉरी_आसिफ असा हॅशटॅग ट्रेंड होत होता. ज्यात एक व्यक्ती एका मुलास मारहाण करत होता.

घटना अशी की,

हा मुलगा मंदिर परिसरात येवून पाणी प्यायला होता आणि तो धर्माने मुस्लीम होता. मंदिर आवारात येवून पाणी पिल्यामुळे आसिफला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली होती.

ही घटना गाझियाबादमधल्या डासना या ठिकाणी ही घटना घडली.

काय आहे असिफच म्हणण ?

आसिफ म्हणतो, मला तहान लागली म्हणून मी मंदिरातील नळाचे पाणी प्यायला गेलो होतो. पहिल्यांदा मला तिथल्या एका पुजार्यांनी बोलावले. आणि विचारले काय करतोय इथ. यावर आसिफ म्हणाला पाणी प्यायला आलोय. यावर पुजारी म्हणाले, ठीक आहे.

असिफच्या म्हणण्यानुसार तो पाणी पिऊन परतत असताना एक पुजारी आले आणि तुझा व्हिडिओ बनवू म्हणाले.

मला माझ आणि वडिलांचं नाव विचारल गेल. मी नाव सांगताच मला अश्लील शिव्या दिल्या. आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. एक व्यक्ती मारत असताना दुसर्या दुसरी व्यक्ती मोबाईल वर व्हिडिओ बनवत होती. मला खूप मारहाण केली गेली.

माझ्या डोक्याला मार लागला आहे. माझा हात मोडला. नंतर व्हिडीओ बनवणारा व्यक्ती म्हणाला, आता सोड अन्यथा मरेल तो. यापूर्वीही मी कैकदा मंदिरात पाणी पिण्यास गेलो आहे. पण त्यादिवशी कुणास ठाऊक मला नाव विचारून मारहाण केली गेली’, असही आसिफ म्हणाला.

आसिफच वय १४ वर्ष इतकं आहे. त्याचे वडील हबीब मजुरी करतात. डासना परिसरात हबीब आपल्या कुटुंबासोबत भाड्याच्या खोलीत राहतात.

कोण आहेतआसिफला मारहाण करणारे?

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन जागरूक झाले आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपींनी हा मारहाणीचा व्हिडिओ  स्वताहुन  इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. श्रृंगीनंदन यादव नावाच्या आरोपीसोबत व्हिडिओ बनवणाऱ्या शिवानंदला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपी हिंदू एकता संघटनेचा सदस्य असल्याचही समोर आलय.

दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ५०४, ५०५ आणि ३५२ नुसार गुन्हे नोंद झाले आहेत. आसिफची मेडिकल चाचणी करण्यात आली असून अहवाल बाकी असल्याच कळतय. त्यामुळे अहवाल आल्यानंतर गुन्हेगारांवर आणखी कलमानुसार गुन्हा नोंद होणार आहे.

आरोपी श्रृंगीनंदन यादव आणि शिवानंद यांनी आसिफला मारहाण केल्याचा व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

ज्या मंदिर परिसरात ही घटना घडली. ते मंदिर तिथल्या महंतांच्या नरसिंहानंद सरस्वती यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच वादात सापडत आले आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारचे दोन पोलीस  आणि सशस्त्र खासगी सुरक्षा देखील तैनात आहे.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ‘इथ मुस्लिमांना प्रवेश नाही’ असा फलक लावण्यात आलेला आहे. हा फलक मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांच्या आदेशानुसार लावण्यात आलेला आहे.

महंताना आसिफवर झालेल्या अन्याबाबत कसलीही सहानुभूती नाहीये. माध्यमांनी आसिफ बाबत प्रश्न विचारताना आसिफला लहान मुलगा म्हणताच महंतांना राग आला.

ते म्हणाले,

आसिफला सगळे लहान मुलगा म्हणत आहेत. पण हे गुन्हेगार आहेत. चोरी, हत्त्या अशा गुन्ह्यांमध्ये यांचा हात असतो. म्हणून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर मुस्लिमांना प्रवेश नाही

असे स्पष्ट लिहिलय.

त्यांच्या सांगण्यानुसार यापूर्वी कित्येक महंतांची हत्त्या झाली आहे. मंदिराची जमीन बळकावली गेली आहे. आसपासच्या गावातील बरेच लोकं इथ दर्शनासाठी येतात. त्यांच्याशी छेडछाड केली जाते. मंदिराच्या बाहेरही नळ आहे. जवळच पंचायत भवन आहे तिथही नळ आहे. मग हा मुलगा मंदिरातच कशाला आला?’, असा सवालही महंतांनी उपस्थित केला.

पूर्वीचे महंत हिंदू मुस्लीम भाई भाई यावर विश्वास ठेवायचे. त्यामुळेच मुस्लिमांनी गैरफायदा घेतला. म्हणून मी मुस्लिमांना प्रवेश बंदीची सक्ती केलीये. यामूळेच मी सुरक्षित आहे. मंदिरात घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची मी जबाबदारी घेतोय असही त्यांनी सांगितलं.

मात्र कितीही कारणे दिली तरी त्या मुलाला झालेली मारहाण बरोबर ठरू शकत नाही असं अनेकांचा म्हणणं आहे.

हे हि वाच भिडू.

 

 

2 Comments
  1. Samadhan avhad says

    हेच तर चुकतं हिंदू समाजाचे….आपण पटकन विसरतो….पालघर येथे दोन साधूना आपल्याच मंदिरातून काढून जीव जाईपर्यंत मारले…किती लोकांना शिक्षा झाली…आणि पण दुसऱ्या धर्माला सहिष्णु मानून…आपला धर्म मात्र विसरतो…

  2. Raj Gopalan says

    मक्का मध्ये हिंदुना प्रवेश नाही त्यावर ही लेख लिहा बघु किती दम आहे तुमच्यात?

Leave A Reply

Your email address will not be published.