राज्य शासनाने पूरपरिस्थिती सावरण्याच्या मास्टरप्लॅनची जबाबदारी यांच्याकडे सोपवलीय ..

महाराष्ट्रात जिकडे तिकडे सद्या पूरस्थितीने हाहाकार माजवला आहे. राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण चा विभाग पुराने हवालदिल झाला आहे. पूरस्थिती आता ओसरत असून आता बचावकार्य आणि मदत कार्य ज्यांच्या त्यांच्या परीने अनेक कार्यकर्ते, नेते, सामाजिक संस्था करीत आहेत पण आता या संकटात राज्य सरकारचा आणि शासनाचं काय नियोजन आहे हे पाहणे महत्वाचे आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या आणि कोकणकडील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. राज्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारचं काय नियोजन आहे, याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

एकीकडे पुरात, पावसात अडकलेल्या लोकांना पावसाच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे आणि दुसरीकडे आपल्या कुटुंबासहित स्थलांतराचा प्रश्नाला तोंड द्यावं लागतंय त्यामुळे साहजिकच पूरग्रस्तांना आता राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा लागून राहिली आहे.

याची जबाबदारी त्यांनी नोडल ऑफिसर असिमकुमार गुप्ता यांच्यावर सोपवली आहे.

अतिवृष्टीग्रस्त असलेल्या भागातील परिस्थिती सांभाळण्यासाठी तसेच सबंधित भागातील बचाव व मदतकार्यासाठीचे संरक्षण मंत्रालयाशी ठेवावे लागणाऱ्या समन्वयासाठी महाराष्ट्र सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांना नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांसोबतच कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत ८० हून अधिक नागरिक बळी गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर सरकार काय करतंय?

या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाकरे सरकार आणि प्रशासनाने  नेमकी काय हालचाली सुरू केल्या आहेत?

शासनाचं नियोजन काय ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितल्या प्रमाणे, हि परिस्थिती सांभाळण्यासाठी सरकारने  नोडल अधिकाऱ्याच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात महत्वाची जबाबदारी दिली ती असीम कुमार गुप्ता यांना.

पाणी ओसरले तरी आता रोगराई वाढण्याच्या शक्यता आहेत त्यात आधीच कोरोनाचे संकट डोक्यावर असल्यामुळे राज्यातल्या पूरपरिस्थिती असलेल्या भागात राज्य सरकारने आरोग्य युनिट तयार केले आहेत जे लवकरच ज्या त्या ठिकाणी ते पाठवण्यात येतील.

तसेच त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना नियोजनाच्या बाबतीतले आदेश दिले गेले आहेत

त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री, त्या त्या जिल्ह्यातील मंत्रिमंडळातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्या प्रमाणे, “जिथे जिथे पूरस्थिती असेल, तिकडे आरोग्य व्यवस्था सुरू केल्या आहेत. राज्याला चार पाच दिवसांत दहा लाख कोरोना प्रतिबंध लसी मिळतात परंतु आता त्या एका दिवसात ४-५ लाख लसी पुरवल्या जातील असं त्यांनी जाहीर केलं आहे. सध्या दोन तीन लाख मिळत आहेत,आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लस मागणी करणार आहोत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार शासन नागरिकांना अलर्ट देत राहिल आणि त्यानुसार सर्व योजना ठरविल्या जाणार आहेत.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी देखील केंद्राच्या सुरक्षा दलांकडून राज्याला मदत केली जाणार असल्याचं सांगितलं.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे देखील बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेऊन आवश्यक ते निर्देश तात्काळ नोडल ऑफिसर असिमकुमार यांना दिले जात आहेत. असीमकुमार हे त्या-त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेत आहेत, आणि आवश्यक त्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना करीत आहेत.

NDRF आणि सैन्यदलाचीही मदत होत आहे.

राज्यातल्या अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेतली जात आहे आहे. लष्कर व नौदल विभाग बचाव व मदतकार्यात सहभागी झाले आहे.

कोण आहेत असीमकुमार गुप्ता ?

श्री.असीम कुमार गुप्ता हे १९९४ मध्ये सिलेक्ट झालेले भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत आणि यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांतील महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

गुप्ता यांनी कोल्हापूर, सांगली, मिरज आणि कुपवाड, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि मुंबई महानगर शहर आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी, नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालय प्रमुख, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव व कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.