जास्तीची प्रसिद्धी नडली आणि जॉन केनेडीची हत्या झाली…

२२ नोव्हेंबर १९६३ चा दिवस हा जागतिक इतिहासातला सगळ्यात भयानक दिवस मानला जातो कारण याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या जॉन एफ केनेडीची हत्या झाली होती आणि सगळं जग हादरलं होतं. केनेडी यांची हत्या झाली आणि याला कारण म्हणून त्यांची अमेरिकेत असलेली प्रसिद्धी. 

केनेडी यांची हत्या झाल्यावर त्याबद्दल शोधाशोध सुरू झाली खरी पण या हत्येचं कोडं अजूनही सुटलेलं नाही. तसेच अजूनही या हत्येमागचा मुख्य गुन्हेगार कोण आहे समजले नाही. पण या हत्येमागचा खरा  गुन्हेगार म्हणून हार्वी ओसवाल्ड कडे संशयाने पहिले जाते. पण, ओसवाल्डचीही हत्या झाल्याने ते गूढ अजून वाढलं आहे.

असं म्हणतात की, अमेरिकेच्या टेक्सास येथील डलास येथे मतदानाच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नीसह आलेले होते. टेक्ससच्या डलासमध्ये डिलि प्लाझाजवळून जात असताना केनेडीला हार्वी ओसवाल्डने गोळी मारली आणि जागीच केनेडीचा मृत्यू झाला. 

केनेडी यांना तात्काळ पार्कलँड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोवर केनेडी मरण पावले होते. ओसवाल्डला पोलिसांनी तात्काळ अटक केली खरी पण जेलमध्येच ओसवाल्डला गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. या घडलेल्या रामायणामुळे अमेरिकेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी डेमोक्रॅटिक पक्षातील लिबरल राल्फ यार्बो आणि डॉन यार्बो आणि टेक्सासचे गव्हर्नर कंझर्व्हेटिव्ह जॉन कोनेली यांच्यातील तणाव दूर करण्यासाठी टेक्सासला जाण्याचा निर्णय घेतला होता. 

टेक्सासला पोहोचल्यावर सामान्य लोकांमधून त्यांचा ताफा बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली. त्यावेळी सुमारे दीड ते दोन लाख लोकांचा जमाव राष्ट्रपतींना पाहण्यासाठी पोहोचला होता.

त्यांचा ताफा टेक्सास स्कूल बुक डिपॉझिटरीमध्ये पोहोचताच केनेडी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तेथे उपस्थित जमावाने तीन गोळ्यांचा आवाज ऐकला. केनेडी आणि जॉन कोनेली यांना गोळ्या घालण्यात आल्या. 

केनेडी कारमध्ये मरण पावले तर कॉनली बचावले. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे डॅलस पोलिसांनी लवकरच संशयिताची छायाचित्रे प्रसिद्ध केली.

दुसरीकडे, हार्वे ओसवाल्डला डीली प्लाझापासून फार दूर नसलेल्या जेडी टिपिट या पोलिस अधिकाऱ्याने पाहिले. टिपिटने ओसवाल्डला चौकशीसाठी बोलावले असता त्याने टिपिटवर गोळीबार केला. तेथून तो टेक्सास थिएटरमध्ये लपण्यासाठी धावला पण तिथल्या तिकीट क्लर्कने पोलिसांना बोलावले. 

पोलिसांनी ओसवाल्डला अटक केली आणि त्याच्यावर अध्यक्ष केनेडी आणि अधिकारी टिपिट यांच्या खुनाचा आरोप लावला.

ओसवाल्डला अटक केली खरी पण पोलीस चौकशी होण्याआधीच त्याचा गेम झाला आणि केनेडी यांच्या हत्येभोवतिचं गूढ अजून वाढलं. काही लोकांचं मत होतं की केनेडीच्या हत्येचं कनेक्शन क्युबाशी जोडलेल होतं, फिडेल क्रस्टोला खुश करण्यासाठी ओसवाल्डने त्यांचा गेम केला होता. 

त्याबरोबरच एका गूढ महिलेवर या हत्येचा संशय जातो जिला ‘द बबूष्का’ लेडी म्हणून ओळखलं जातं, जेव्हा केनेडीची हत्या झाली तेव्हा तिच्या हातात पिस्तुलवजा कॅमेरा होता आणि हत्या झाल्यावर ती तिथून गायब झाली होती. 

पण नंतर जॉन एफ केनेडी यांची हत्या गूढ झाली आणि त्याभोवती संशयाचं वलय फिरत राहिलं.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.