अंतराळवीर महिला अंतराळात पिरियडस् आल्यानंतर काय करतात ? 

अंतराळवीर महिला अंतराळात पिरियडस् आल्यानंतर काय करतात ?

हा प्रश्न होता जेव्हा अमेरिकेची अंतराळवीर महिला सैली राईट पहिल्यांदा अंतराळात जावून आली होती. साल होतं १९८३ चं. तिचं सर्वत्र कौतुक होतं असतानाच एका पत्रकाराने तिला हा प्रश्न केला होता. 

त्यासाठीच म्हणा किंवा इतर कारणांमुळे पुढे कित्येक वर्ष महिला अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात आलं नव्हतं. मात्र या प्रश्नामुळे चर्चेला एक निमित्त मात्र मिळालं होतं. 

पण अस काय होतं त्या प्रश्नात ? सहज साधा तर प्रश्न होता. अंतराळात कसं मॅनेज केलं जातं. हवेच्या शुन्य दाबाचा काय परिणाम पडतो ? जर या गोष्टीचा परिणाम महिलांवर होणारच असेल तर महिलांना अतंराळात पाठवणं सुरक्षित आहे का ? 

एकामागून एक येणारे कित्येक प्रश्न. पण एक गोष्ट निर्विवाद होती ती म्हणजे ज्या गोष्टीचा,

विचार कोणीच केला नव्हता अशा प्रश्नाबद्दल एका पत्रकारामुळे चर्चा होवू लागली. 

त्यानंतर अनेक अभ्यासकांनी, डॉक्टरांनी  आपआपली मते मांडलीच. अंतराळात गेलेल्या महिलांनी देखील त्यांचे अनुभव सांगितले त्यातून जे हाती लागलं तीच या प्रश्नाची उत्तरे. 

डॉक्टरांच्या मते हवेतील बदलणाऱ्या दाबाचा महिलांच्या शरिरावर नक्कीच फरक पडतो मात्र त्यांच्या मासिक पाळीचं ऋतूचक्र मात्र बदलत नाही. त्यांच्या ठरावीक तारखांनाच मासिक पाळी होते. मात्र यासाठी महिलांकडून औषधांचा वापर करण्यात येतो. जेणेकरून मासिक पाळी टाळण्यात येते. अंतराळवीर महिला आपल्या डॉक्टरांच्या सल्यानेच या गोळ्यांच सेवन करत असतात. 

मात्र अशा गोळ्या घ्याव्यातच अस कोणतेही बंधन महिला अंतराळवीरांना नसते. त्या या गोळ्यांचा वापर त्यांच्या इच्छेनुसारच करू शकतात. 

अशा वेळी अंतराळवीर महिला सॅनिटरी पॅड व टेम्पोनसचा वापर करत जेणेकरून रक्तस्त्राव कमीत कमी पसरला जाईल. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.