त्यावेळी पहिल्यांदाच असं घडलं कि SPG टीमला गोळीबार करावा लागला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाब दौरा गेल्या  दोन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यादरम्यान आंदोलनाची त्यांचा ताफा रोखला, त्यामुळं १५ ते २० मिनिट पंतप्रधानांना तिथंच खोळंबून राहावं लागलं. शेवटी सुरक्षा कमी पडली आणि पंतप्रधानांना वापस फिरावं लागलं.  

पण या घटनेमुळे पंजाब सरकारवर अपुऱ्या सुरक्षेचे आरोप केले जातायेत. तिथून पाकिस्तान जवळ असल्यामुळं पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता, पण तरी पंजाबच्या चन्नी सरकारनं हे मुद्दाम केलंय असा आरोप भाजपची मंडळी करतायेत.

दोन दिवसापासून गाजलेल्या या प्रकरणात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबरोबर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारी एसपीजी टीम सुद्धा चांगलीच चर्चेत आलीये. आता आपण याआधीच पाहिलंय की हे एसपीजी कमांडो कश्यापद्धतीने काम करतात.  म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा कधी पंतप्रधानांवर हल्ला होण्याची शक्यता असते, तेव्हा या एसपीजी कमांडोजना तातडीने निर्णय घेण्याचे सगळे अधिकार असतात. अगदी समोरच्याला गोळी मारण्या इतपत सुद्धा.

आतापर्यंत एवढा मोठा प्रसंग कधी ओढवला नाही, कि एसपीजी टीमला कारवाई करावी लागली. पण एकदा अशी गंभीर परिस्थितीत निर्माण झालेली कि, पंतप्रधानांचे संरक्षण करणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ला गोळीबार करावा लागला. ज्यामध्ये एकाचा जीव गेलेला.

हा घटना होती २५ जानेवारी २००० सालची. भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर सिंग एकदा रेल्वेने प्रवास करत होते.  त्यावेळी  पंतप्रधानांसोबत माजी पंतप्रधानांना सुद्धा एसपीजी सुरक्षा मिळत होती. त्यामुळे चंद्रशेखर यांना सुद्धा एसपीजी सुरक्षा मिळालेली.

आता २०१९ मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. आता माजी पंतप्रधानांना पदावरून काढून टाकल्यानंतर केवळ एक वर्षासाठी हे संरक्षण मिळते.

असो.. तर गाझीपूरच्या सआदत स्टेशनवर ही घटना घडली. हे स्टेशन उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात आहे. सआदत स्थानकावर ट्रेन थांबवण्यात आली. पण या दरम्यान पंतप्रधान प्रवास करत असलेल्या रेल्वेच्या डब्यात विद्यार्थ्यांच्या एका गटाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आणि अचानक विद्यार्थ्यांचा घोळका पंतप्रधानांच्या डब्यात शिरला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे एकच खळबळ उडाली.

एपीजी टीमने विद्यार्थ्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण गर्दी आणखीच हाताबाहेर गेली. त्यानंतर एसपीजीला टीमला गोळीबार करणं भाग पडलं. पण कोणाचा जीव जावा असा हेतू त्यांचा नव्हता , फक्त हवेत गोळीबार करून गर्दी पांगावी एवढंच या टीमचं म्हणणं होत. पण चुकून एका विद्यार्थ्याचा गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा एक यात जखमी झाला.

 स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना झाल्यापासून ही पहिलीचं वेळ होती जेव्हा गोळीबार झाला होता. त्यावेळी सुद्धा या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. जनता  रस्त्यावर उतरून एपीजी टीमविरूद्ध आंदोलन करत होते. आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याविरूद्ध घोषणाबाजी करत होते. 

पुढे, जेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे एनडीए सरकार आलं, तेव्हा चंद्रशेखर यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली, अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.