वाजपेयी इंदिरा गांधींच्या पाव्हनीच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभर बॅचलर राहिले
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ नैराश्यामध्ये गेला. त्यांना वाटलं की आता सर्वकाही संपलय. असं त्यांना वाटत होत कारण २०१४ साली राजकुमारी कौल यांचं निधन झालं होत.
अटलजी आणि राजकुमारी कौल यांचा विषय कधीच चर्चेमध्ये राहिला नव्हता. पण २०१४ मध्ये राजकुमारींचं निधन झाल्यावर इंडियन एक्स्प्रेसने बातमी छापली की, ‘राजकुमारी अटलजींचा आधार होत्या.
त्यानंतर बऱ्याच गोष्टी प्रकाशझोतात आल्या, त्यातली एक गोष्ट म्हणजे इंदिरा गांधी या राजकुमारी कौल यांच्या चुलत मावशी होत्या. आणि प्रेम करताना अटलबिहारींना याविषयी काहीच माहित नव्हतं. त्याचाच हा किस्सा.
या गोष्टीची सुरुवात होते चाळीसच्या दशकात. जेव्हा अटलजी ग्वाल्हेरच्या कॉलेजमध्ये शिकत होते. ग्वाल्हेरमध्येच पदवीचे शिक्षण घेत असताना अटल बिहारी यांची ओळख राजकुमारी यांच्याशी झाली. खरं तर ते दोघे ही एकाच विक्टोरिया कॉलेजमध्ये शिकत होते. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. ही युवती या कृष्णाची राधा बनली.
१९२५ सालात मध्यप्रदेशातील उज्जैन मध्ये राजकुमारी हक्सर यांचा जन्म झाला. गोविंद नारायण त्यांचे पिता होते आणि मनमोहिनी हक्सर त्यांची माता. मनमोहिनी हक्सर म्हणजे इंदिरा गांधींची चुलत चुलत बहीण. अटलजींची राजकुमार यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली तेव्हा अटलजींनी हे सत्य बहुधा माहीत नव्हतं.
आपल्या कुटुंबियांबरोबर ग्वाल्हेरला येण्यापूर्वी अल्पकाळ राजकुमार यांच जुन्या दिल्लीत सुद्धा वास्तव्य होतं. ग्वाल्हेर मध्ये राजे सिंधिया यांच्या शिक्षण खात्यात राजकुमारी यांच्या वडिलांना नोकरी मिळाली. अटलजी आणि राजकुमारी यांना जोडणारा हा एक दैवयोग म्हटला पाहिजे. त्यांच्यात प्रेम झालं, परंतु तो काळ होता जेंव्हा एक तरुण मुलगी आणि मुलगा यांच्यातली मैत्री झेपणार नव्हती. अशाच परिस्थितीतून हे दोघेही जात होते.
तेव्हा अटल बिहारी राजकुमारी यांना पत्र लिहायचे, अटलबिहारीं यांनी लिहिलेले पत्र राजकुमारी यांनी कॉलेज च्या लायब्ररीत लपवून ठेवले होते. राजकुमारी यांनीही अटलजींना पत्र लिहिली होती परंतू ती कधी अटलजी पर्यंत पोहचलीच नाहीत.
फाळणीच्या वेळी राजकुमारीच्या वडिलांनी जे कि काश्मिरी पंडित वडील गोविंद नारायण हक्सर हे होते, त्यांनी राजकुमारीचं लग्न ब्रिज नारायण कौल या काश्मिरी पंडितशी केले. वास्तविकपणे सांगायचं झालं तर,
हक्सर यांना त्यांच्या मुलीचे लग्न अशा कोणत्या मुलासोबत लावायचे नव्हते जो राजकारणात सक्रिय आहे.
त्यानंतर अटल बिहारी आणि राजकुमारी हक्सर हे दोघेही आपापल्या आयुष्यात रमले. लग्नानंतर राजकुमारी कौल झाल्या असल्या तरी अटलजींच्या मनातून त्या काही गेल्या नव्हत्या. मैत्रीचं नातं तरी होतंच. लग्नाच्या काही काळानंतर मिसेस कौल दिल्लीला आपल्या पतीसमवेत शिफ्ट झाल्या आणि वाजपेयी ही त्या काळात लखनऊला होते.
त्याकाळात अटल बिहारी वाजपेयी सक्रिय राजनेता बनले. त्यानंतर एकदा त्यांची भेट राजकुमारी कौल यांच्याशी झाली आणि नंतर भेटीगाठी वाढतच राहिल्या. अटलजी कौल यांच्या घरी येत जात राहिले आणि काही काळानंतर तिथेच शिफ्ट झाले. १९७८ मध्ये अटलजी मोरारजी देसाई सरकार मध्ये विदेश मंत्री झाले तेव्हा मिसेस कौल आणि त्यांचा परिवार सरकारी आवसा मध्ये शिफ्ट झाला. अटलजींनी कौल यांच्या दोन्ही मुलींना दत्तक घेतले.
पण या सर्व घडामोडी सुदैवाने मीडियाच्या नजरेपासून लांबच राहिल्या.
कौल यांनी स्वतःहून एका मुलाखतीत त्यांच्या मैत्रीविषयी सांगितलं होतं. आमच्या मैत्रीविषयी कोणालाही स्पष्टीकरण देण्याची कधीच गरजही पडली नाही. मिसेस कौल यांचे २०१४ मध्ये निधन झाले आणि तेव्हापासून अटलजी खूप आजरी पडू लागले. इतके आजारी होते की ते कौल यांच्या अंतिम संस्कारमध्ये देखील सामील होऊ शकले नव्हते.
हे हि वाच भिडू :
- एक खराखुरा डाकू मनोज वाजपेयींसोबत रहात होता अन् कोणाला कळले देखील नाही.
- वाजपेयींचा सत्कार केला या एकाच कारणामुळे त्यांना परत आमदारकीचं तिकीट मिळालं नाही.
- वाजपेयींना हे दोन नकार ऐकून घ्यावे लागले, नाही तर आज भाजपची इमेज वेगळी असती..