आण्विक हल्ल्याच्या धमकीनंतर वाजपेयी म्हणाले होते, पाकिस्तान कल का सूरज नहीं देख पाएगा…

युक्रेन आणि रशियामधल्या युद्धाच्या दरम्यान रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी युक्रेनला आण्विक हल्ल्याची धमकी दिली होती. पुतिन यांनी आपल्या रशियन अण्वस्त्र दलांना ‘हाय अलर्ट’ वर राहण्याचे आदेश दिले होते, ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम यांच्यातील तणाव आणखी वाढला होता. अमेरिका नाटोसोबत आपली रणनीती बनवत आहे. आजच्या काळात महासत्ता होण्याचं माप म्हणजे अणुऊर्जा

अमेरिका, रशिया, भारत यासह जगातील मोजक्याच देशांकडे अणुशक्ती आहे. आता सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे अणुयुद्धाची ! 

अणुयुद्धाच्या या चर्चेत भारताला मात्र आपल्या दोन महान व्यक्तिमत्त्वांचे आठवण होतेय ते म्हणजे इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी. त्यामागे कारण म्हणजे या दोन नेत्यांनी भारताला इतके सामर्थ्यवान बनवले.

आत्ता वाजपेयी आठवण्याचं कारण म्हणजे १९९९ मध्ये कारागील युद्धात पाकिस्तानने भारताला आण्विक हल्ला करण्याची धमकी दिली होती. 

पाकिस्तान १९४८, १९६५, १९७१ भारता विरोधात चार वेळा युद्धभूमीत उतरला पण भारताने पाक ला चीत केलं. तरी पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी कमी होत नाही. आडमार्गाने डिवचण्याचा प्रयत्न सुरूच असतो.

कारगिल युद्धाच्या वेळेसची हि गोष्ट आहे. कारगिलमध्ये युद्ध सुरू झाले होते. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना फोन आला. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी फोनवर सांगितले की, त्यांना नवाझ शरीफ यांच्याशी बोलणं झालं असून त्यांना भीती वाटते की, पाकिस्तानचे सैन्य युद्धादरम्यान अणुबॉम्ब वापरू शकते. 

क्लिंटन वारंवार अणुयुद्धाचा उल्लेख करीत होते, याचे कारण पाकिस्तानातील काही मूर्ख लष्करी अधिकारी अणुबॉब टाकण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करत होते. भारतीय सेनाधिकाऱ्यांनाही याची कल्पना होती. संभाव्य अण्वस्त्रहल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी राजस्थान आणि पंजाबच्या सीमेवर चालू झाली होती. 

शरीफनाही आपले बेअक्कल कडवे धर्मांध अधिकारी या थराला जाऊ शकतात, याची कल्पना होती.

क्लिंटन यांच्या फोनवर मात्र वाजपेयींनी उत्तर दिले…जर पाकिस्तानने भारतावर आण्विक हल्ला केला तर पाकिस्तान उद्याचा सूर्य पाहू शकणार नाही.

वाजपेयी क्लिंटन यांना फोनवर स्पष्टपणे सांगत होते, ‘पाकिस्तानला अणुबॉम्ब वापरू द्या… पण मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, पाकिस्तान उद्याचा सूर्य पाहू शकणार नाही.  तेंव्हाच्या अटलजींच्या त्या ‘अटल ओळी’ आजही भारतीयांना आठवतात.

 भारताकडे जगातील सर्वात मोठे विध्वंसक शस्त्र आहे, ज्याला जग अण्वस्त्रे म्हणतो, हे पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही माहीत आहे. भारतही त्याचा वापर शांततापूर्ण हेतूंसाठीच करेल यावर ठाम आहे.

तरी जेंव्हा क्लिंटन यांची आणि शरीफ यांच्या बोलणी चालू होती तेंव्हा क्लिंटन यांचा तोफखाना झेलून, हात बांधून आणि खालमानेने शरीफ ‘व्हाइट हाऊस मधून बाहेर पडले. आता माघार घेतल्याबद्दल मायदेशी छी थू होणार होती; तशी ती झालीच. १९७१ नंतरची सर्वांत अपमानास्पद शरणागती, असे बेनझीर भुट्टो हिणवू लागल्या, तर शरीफ यांची ‘भेकड’ अशी उघड संभावना करून लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ बंडाच्या तयारीला लागले!

क्लिंटन नवाझ शरीफ यांची उलटतपासणी घेत होते, तेव्हा भारतीय फौजांनी ३ जुलैच्या रात्री बोफोर्स कंपनीच्या हॉवित्झर या तेजतरीर तोफांचा तुफान मारा करून १६,५०० फूट उंचीवरची टायगर हिल्स ही पर्वतराजी जिंकून घेतली. या तोफांचा खरेदी-व्यवहार संशयास्पद ठरला असला, तरी गुणवत्ता तसेच चपळाई वादातीत होती, हे पुन्हा सिद्ध झाले. श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गावरच्या या परिसराचे स्थान भौगोलिकदृष्ट्या विलक्षण मोलाचे होते. लेह-लडाखला उर्वरित भारताशी जोडणारा रस्ता याच टायगर हिल्सजवळून जातो. जवानांनी ११ तास शर्थीची झुंज देऊन टायगर हिल्सवर विजयी तिरंगा फडकावला.

अटलजी नेमके ४ जुलैला हरयाणात कुरुक्षेत्रात होते. तेथे त्यांनी ‘टायगर हिल्स’ जिंकल्याची बातमी देशाला सांगितली आणि जवानांचे मुक्तकंठाने कौतुक केले. या कौतुकाने मूठभर मांस चढलेल्या जवानांनी दुसऱ्याच दिवशी ५ जुलैला द्रासही जिंकून घेतले. काहीही केले, तरी भारताची ही विजयी घोडदौड आता थांबणार नाही, याचा अंदाज पाकिस्तानी सैन्याला आला. 

तितक्यात मायदेशी परतलेल्या शरीफ यांनी ५ जुलैलाच सैन्याला माघार घेण्याचे आदेश दिले आणि भारताला चर्चेचे निमंत्रणही. ‘दक्षिण आशियातील शांततेसाठी’ म्हणे, शरीफ यांनी हे पाऊल उचलले होते! ‘पडलो तरी नाक वर’, या न्यायाने शरीफनी काश्मीरचा प्रश्न अजून सुटलेला नाही, हे टुमणे या माघारीतही लावलेच.

पण आत्ताचं बोलायचं तर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेंव्हापासून देशातील लोक सोशल मीडियावर अटलबिहारी वाजपेयी यांचा ११ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये अणुचाचणी केल्याची घोषणा करतानाचा व्हिडिओ पाहत आहेत. वाजपेयींनी जेंव्हा यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तेव्हा जगातील देश थक्क झाले होते. अमेरिका सर्व निर्बंधांच्या धमक्या देत होती पण भारताचे अटळ इरादे ते रोखू शकले नाहीत. अटलजींचा तो धाडसी निर्णय आज लोकांना आठवत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, आज जर भारत अण्वस्त्र झाला नसता तर कदाचित भारताची देखील युक्रेनसारखी परिस्थिती निर्माण झाली असती.

 हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.