बरोबर २० वर्षांपूर्वी वाजपेयी यांच्या एका शब्दानं नरेंद्र मोदींचं अख्खं आयुष्य पालटलं.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांचे नाव आज जागतिक पातळीवर आहे. त्यांचे विरोधकही मान्य करतील की ती आज भारतातले सर्वात लोकप्रिय नेता आहेत.  त्यांच्या रोजच्या दिनक्रमापासून ते भाषणांपर्यंत अनेक गोष्टींबद्दल चर्चा होतात. त्यांची विकासकामे आणि त्यांची निर्णयक्षमता याचे भारतभर फॅन आहेत. पण सर्वात जास्त चर्चा होते ती त्यांच्या साधेपणाची.

याच त्यांच्या साधेपणाचा अनुभव घेतला होता, त्यांच्या विरोधातले पत्रकार समजल्या जाणाऱ्या राजदीप सरदेसाई यांनी.

ही गोष्ट नव्वदच्या दशकातील आहे. नरेंद्र मोदी तेव्हा भाजपचे एक छोटे कार्यकर्ता होते. एका निवडणुकी दरम्यान टीव्हीवरील एका चर्चेच्या कार्यक्रमासाठी विजय मल्होत्रा यांना आमंत्रित करण्यात आलं होत. पण अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी नकार कळवला.

 कार्यक्रम चालू व्हायला दहाच मिनीटं शिल्लक होते. अशा वेळीभाजपाची बाजू मांडायला  कोणाला बोलवायचं हा प्रश्न पडला. राजदीप सरदेसाई यांना नरेंद्र मोदी आठवले. ऐन वेळचा बदली पाहुणा म्हणून मोदींना बोलविण्यात आले. कुठला ही इगो अडवा न आणता मोदी देखील लगेच या चर्चेसाठी गेले.

नरेंद्र मोदी यांच्यात असणारा हा साधेपणा त्यांना खूप वेळा मदतीला आला किंवा त्यामुळेच त्यांना राजकीय यशाची फळ चाखायला मिळाली अस म्हणल तर काही हरकत नाही. त्यांच्या याच साधेपणातून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी देखील प्रभावित होते.

B Id 419530 modi advani 1

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर नरेंद्र  मोदींना दिल्लीला बोलवून घेण्यात आले. त्यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी मोदींवर देण्यात आली. हरियाणा आणि हिमाचल प्रदेश मधील भाजपची धुरा मोदींकडे देण्यात आली होती.

१९९८ साली गुजरातमध्ये मध्यवर्ती निवडणुकांसाठी मतदान झाले. मोदी तेव्हा  दिल्लीत होते, पण उमेदवार निवडीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. १९९८ आणि १९९९ च्या निवडणूक धोरणांची आखणी करण्यात देखील मोदींचा सहभाग होता. याच त्यांच्या धोरणी राजकारणाने अटलबिहारी वाजपेयी प्रचंड प्रभावित झाले. त्यांच्या सारख्या एका मात्तबर राजकारणी प्रभावित झाला म्हणजेच त्याचे फळ देखील मोठे असणार यात शंका नाहीच.

२००१  साली गुजरात मध्ये मोठा भूकंप झाला. याच भूकंपात १५ ते २० हजार लोकांच्या आयुष्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. हवालदिल झालेल्या लोकांच्या समस्या वाढत होत्या, जवळ जवळ सात आठ महिने या आव्हानांना केशुभाई पटेल तोंड देत होते. यातच त्यांची तब्येत देखील खालवली होती. त्यामुळे सहाजिकच सरकार अस्थिर होउ लागले होते. वाजपेयी देखील याच परिस्थितीवर विचार करत होते आणि तोडगा शोधण्याचा प्रयत्न करत होते.

मोदींना पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा निरोप आला. मोदींना दिल्लीतल्या ७ रेस कोर्स रोडवर येण्यास सांगितले होते. हा  ७ रेस कोर्स रोड म्हणजेच आजचा ७ लोककल्याण मार्ग. या ठिकाणी तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच घर होत. तातडीने आलेल्या या बोलवण्याच करण मोदींना देखील कळत नव्हते.

तिथे नरेंद्र मोदी देखील तिथे गडबडीने पोहचले. तिथे पोहचताच वाजपेयींनी मोदींना अजिबात वेळ न घालवता,

दिल्ली सोडून निघून जा असा आदेश दिला.

पक्षश्रेष्ठींच्या या आदेशामुळे मोदी देखील थोडे कोड्यात पडले. त्यांनी वाजपेयींना विचारले,

“कुठे जाऊ मी?”

या प्रश्नाचं उत्तर वाजपेयींना एका शब्दात दिलं,

“गुजरात”

याच वाजपेयी यांच्या एका शब्दाने कधी काळी सामान्य कार्यकर्ता असलेल्या मोदींच्या आयुष्याला मोठा टर्न मिळाला.

दिल्लीतून निघून जा असे म्हणताच मोदींनी देखील दिल्ली सोडली आणि ते गुजरातला निघून गेले. काहीच दिवसात म्हणजेच ७ अक्टोबर २००१ रोजी  नरेंद्र मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनतर नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाला खरी सुरवात झाली. याच कारकीर्दीच्या जोरावर ते २०१४ च्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान झाले.

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.