एका भाषणामुळे अटल बिहारी वाजपेयी यांच मंदिर बांधण्यात आलं. 

सत्ताधारी असोत की विरोधक, राजकारणात दिवसरात्र वाहून घेतलेले असोत की राजकारणाची चर्चा नको म्हणून पळून जाणारे असोत…. मग तो कोणत्याही विचारसरणीचा माणूस असो मात्र वाजपेयी यांच्या नावावर प्रत्येकाचं एकमत असतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ अनेकांना होती. त्यांच्या भाषणापासून ते तिरस्काराने नाही तर प्रेमाने विरोधकांसोबत वागण्याच्या वृत्तीमुळे अनेकजण त्यांचे फॅन होते. 

वाजपेयींच्या याच दिल जिंकण्याच्या वृत्तीमुळे भारतीय राजकारणात कित्येक किस्स्यांनी जन्म घेतला. असाच एक किस्सा त्यांच्या भाषणाचा आणि त्यामुळे उभारण्यात आलेल्या मंदिराचा. 

अटल बिहारी वाजपेयी यांच देखील एक मंदिर आहे हि गोष्ट खूप कमी जणांना माहित असेल. अटल बिहारी वाजपेयी यांची नाळ ज्या शहरासोबत जोडली गेली. ज्या शहराने त्यांना पराभव देखील दाखवला व ज्या शहराने त्यांच्यावर तितकच प्रेम केल अशा ग्वालियर मध्ये वाजपेयी यांच मंदिर बांधण्यात आलं आहे. 

या मंदिराची स्थापना करण्यात आली ती सन १९९५ साली. या मंदिराची उभारणी केली होती ती विजय सिंह चौहान यांनी, आणि त्याचं कारण म्हणजे त्यांनी १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत हिंदीतून केलेलं भाषण. 

१९७७ साली जनता पक्षाचं सरकार केंद्रात सत्तेत असताना अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते. यावेळी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ३२ व्या अधिवेशनामध्ये भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली होती. “वसुधैव कुटूंबकम” या शब्दाचा अर्थ जगभरातील राष्ट्रांना सांगत वाजपेयी म्हणाले होते, 

“ यहां मैं राष्ट्रो की सत्ता आैर महत्ता के बारे में नहीं सोच रहा हूं, आम आदमी की प्रतिष्ठा आैर प्रगति मेरे लिए कहीं अधिक महत्व रखती है. अंततः हमारी सफलताएं आैर असफलताएं केवल एक ही मापदंड से मापी जानी चाहिए कि क्या हम पूरे मानव समाज वस्तुतः हर नर, नारी आैर बालक के लिए न्याय आैर गरिमा की आश्वस्ती देने में प्रयत्नशील हैं.”

अटल बिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेत केलेल भाषण फक्त हिंदीतून असल्यामुळेच महत्वाचे नव्हते तर आणिबाणी नंतर सहा महिन्यातच जागतिक व्यासपीठावरुन भारत लोकशाही प्रधान देश आहे हे दर्शवण्यासाठी देखील महत्वाच होतं. 

या भाषणाने अनेकांच्या मनावर खोलवर परिणाम केला. हिंदी भाषेच्या प्रेमापोटी झगडणारे विजय सिंह चौहान हे त्यांपैकीच एक. ग्वालियरच्या सत्यनारायण टेकडीवर त्यांनी हिंदी भाषेच्या प्रेमापोटी हिंदी मातेच मंदिर बाधलं होतं. या मंदिराशेजारी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच देखील मंदिर बांधल.

अटल बिहारी वाजपेयी यांच हिंदी भाषेवरची पकड आणि हिंदी भाषेवरच प्रेम आणि त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यासपीठावरुन केलेलं हिंदीतून भाषण या कारणामुळे त्यांच मंदिर बांधल्याच विजय सिंह चौहान सांगतात. या मंदिरात अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा ठेवण्यात आली असून हिंदी दिन व अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिवशी तिथे पूजा करण्यात येते. 

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.