संसदेमध्ये वाजपेयी प्रणब मुखर्जींना म्हणाले होते, आपका ही बच्चा है…

राजकारण म्हणजे फक्त डाव- प्रतिडाव, छक्के पंजे आणि वादग्रस्त विधानं इतकंच नसतं तर राजकारणी लोकांचे काही मजेशीर किस्से सुद्धा असतात. राजकीय वर्तुळामध्ये हे किस्से चवीने चघळले जातात. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाभोवतीच वलय आणि त्याच्याशी निगडित अनेक किस्से आहेत. असाच एक किस्सा आहे अटल बिहारी वाजपेयी आणि प्रणब मुखर्जी यांचा. हा किस्सा प्रणब मुखर्जी यांनी एका पेपरसाठी लिहिला होता.

काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाचा काळ. नरसिंह राव हे पंतप्रधान होते. १९९५ साली त्यांनी विश्व् व्यापार संघटन ( WTO ) सोबत एक ठराव मांडला होता. या ठरावाअंतर्गत भारताला पेन्टेन्ट ऍक्टमधे एक संशोधन करायचं होतं. पण या ठरावाला बीजेपी आणि इतर काही पक्षांनी विरोध दर्शवला. आता या बिलाला विरोधी लोकांकडून झालेला जोरदार विरोध बघून राज्यसभेत हे संशोधन बिल पास झालं नाही. 

पुढे सरकारे बदलली. इतकी वर्षे विरोधात बसलेले अटलबिहारी वाजपेयी यांची भारतीय जनता पार्टी सत्तेत आली.

वाजपेयी सरकारने तेच संशोधन बिल पुन्हा एकदा संसदेमध्ये पेश केलं. प्रणव मुखर्जी लिहितात कि अटल बिहारी वाजपेयी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षातील नेते मनमोहन सिंग यांना विनंती प्लस अपील केली कि ते बिल पास केलं जावं आणि मला म्हणाले कि,

प्रणबदा यह आपका हि बच्चा है, आप क्यो नहीं समर्थन दे रहे है…

यानंतर प्रणब मुखर्जी यांनी पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी या घटनेवर आणि बिलावर चर्चा केली. सोनिया गांधींनी याच बिलाची चर्चा पक्षातल्या नेत्यांसमोर मांडायला लावली. प्रणब मुखर्जी यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत दोन तास चर्चा केली आणि नेत्यांना समजावलं की आता जे बिल दिलेलं आहे त्यात काडीमात्र फरक नाही. आपण जो बिलाचा पाठपुरावा केला होता तो आणि हा सेम टू सेम आहे काहीच फरक नाहीए. फक्त वर्ष बदललं आहे आणि वाणिज्य मंत्र्याचं नाव चेंज झालं आहे.

प्रणब मुखर्जी यांच्या सांगण्यावरून काँग्रेसच्या नेत्यांना या बिलाचं महत्व पटलं आणि राज्यसभेत काँग्रेसने या बिलाचं समर्थन केलं. काँग्रेसच्या समर्थनामुळे राज्यसभेत हे बिल पास करण्यात आलं. जेव्हा बिल पास झालं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रणब मुखर्जींना धन्यवाद सुद्धा दिले होते. पण यात प्रणब मुखर्जींनी आवर्जून उल्लेख केला होता अटल बिहारींच्या त्या वाक्याचा की आपका हि बच्चा है…..

अटल बिहारी वाजपेयी राजकारणात तर आघाडीवर होतेच पण यांचं विनोदी आणि कवी मन राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असायचं. प्रणब मुखर्जी आणि वाजपेयी यांची मैत्रीसुद्धा खास होती. राजकारणामध्ये केल्या जाणाऱ्या काही विधानांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं हे स्टेटमेंट चांगलंच गाजलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.