वाजपेयींना हरवण्यासाठी कॉंग्रेसने बॉबी सिनेमा दाखवण्यास सुरवात केली…

अटल बिहारी वाजपेयी. एक असा नेता जो बोलायला उभा राहिला की लोक टाळ्या आणि शिट्यांचा गजर करत. असा नेता, जो आपल्या कवितांमधून सत्ताधारी कॉंग्रेसच्या पायाखालची जमीन हादरवत असे. अटल बिहारी यांच्या अनेक गोष्टींबाबत विरोधक सहमत नसतील पण त्यांची भाषण ऐकण्यासाठी विरोधकांचे देखील कान तरसायचे हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.

अटल बिहारी वाजपेयींचा हा किस्सा आणिबाणीच्या काळातला.

१९७७ च्या पहिल्याच महिन्यात इंदिरा गांधींनी राजकिय कैद्यांची सुटका करत निवडणुका घेण्याचा अंदाज दिला. काही दिवसात निवडणुकांच्या तारखा जाहिर करण्यात आल्या.

आणिबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण, अटल बिहारी, जार्ज फर्नांडिस, मोरारजी देसाई, चरणसिंग असे एक से बढकर एक नेते जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते. लोकं त्यांच्या सभांना मोठमोठ्ठी गर्दी करत होते. हि गर्दी कशी रोखायची याचं नवीनच कोड इंदिरा सरकारला पडलं होतं.

अशातच मार्च महिन्यात अटल बिहारी वाजपेयींची सभा दिल्लीच्या रामलीला मैदानावर घेण्याच नियोजित करण्यात आलं.

अटलबिहारी वाजपेयींची सभा होणार म्हणल्यानंतर कॉंग्रेसकडून देखील प्रतीडाव आखण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. काहीही करुन वाजपेयींच्या सभेला गर्दी होवू न देण्यावर कॉंग्रेसच्या नेत्यांनी भर दिला होता. त्यातूनच तत्कालीन दूरसंचार मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्या डोक्यातून आयडिया आली. त्यांनी जाहिर केलं की त्यावेळी सर्वात हिट फिल्म बॉबी हि दूरदर्शन वरुन दाखवली जाईल.

अटलबिहारी वाजपेयींच्या सभेच्या विरोधात कॉंग्रेसने बॉबी फिल्म दाखवून गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला. अशातच दिल्लीच्या त्या रात्री कॉंग्रेसच्या मदतीला तुफान पाऊस देखील हजर झाला.

रात्रीचे नऊ वाजले. दिल्लीत पावसाचा जोर वाढू लागला होता. घरांमध्ये बॉबी सिनेमा चालू झाला होता. आणि हिकडे रामलीला मैदान अटलबिहारींच्या भाषणासाठी तुडूंब गर्दीनं भरलं होतं. अटलबिहारी उभा राहिले. ते पुढचे दोन तास भाषण करत राहिले आणि दिल्लीची भल्लीमोठ्ठी गर्दी भर पावसात रात्रीच्या बारा पर्यन्त त्यांच भाषण ऐकत राहिली..

या भाषणात अटलबिहारींनी कॉंग्रेसचा बॉबी डाव उधळून लावला. त्यांनी जे भाषण केलं ते इतिहासात लिहलं गेलं. काही दिवसातच देशात पहिलं बिगर कॉंग्रेसी राज्य आलं. याच राज्यात अटलबिहारींचा वाट नक्कीच अधिकचा होता.

बाद मुद्दत के मिले हैं दीवाने
कहने सुनने को बहुत हैं अफसाने
खुली हवा में जरा सांस तो ले लें
कब तक रहेगी आजादी कौन जाने.

– अटलबिहारी वाजपेयी.

हाच किस्सा बाबू जगजीवन राम यांच्या नावाने देखील अनेकांकडून सांगितला जातो. त्यावेळी बाबू जगजीवन राम देखील गर्दी खेचत असत व ते देखील व्यासपीठावर सहभागी होते.

हे हि वाच भिडू. 

5 Comments
  1. Anonymous says

    शेवटच्या ओळीत ‘वाट’ ऐवजी ‘वाटा’ लिहायला हवं होतं का?

Leave A Reply

Your email address will not be published.