औरंगजेबाचा हा मुलगा बादशाह बनला आणि मुघलांचा वाईट काळ सुरु झाला

औरंगजेबाच्या क्रुर शासनकाळाबद्दल प्रत्येकालाचं चांगलीचं माहितीये. सत्तेच्या हव्यासापायी त्यानं सामान्य जनताचं काय आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा सोडलं नव्हतं.

एवढंच काय आपल्या मुलाबद्दल सुद्धा त्याला कधीचं माया आली नाही. आणि तेही अशा मुलाबद्दल ज्याच्या आईशी दुश्मनाने लग्न करून दिलं होतं.

औरंगजेबाचा विवाह काश्मीरचा मुस्लिम राजपूत राजा ताजुद्दीन खानची मुलगी बेगम नवाब बाईशी झाला. त्यांना मुलगा सुद्धा झाला बहादूर शाह पहिला. १४ ऑक्टोबर १६४३ ला त्याचा जन्म झाला. औरंगजेबाच्या कित्येक मुलांपैकी तोच सातवा बादशाह बनला होता.

पण यासाठीचा मार्ग तितका सोपा नव्हता. वडिलांचा आधीच आईवर राग त्यामूळे वडील औरंगजेबाबद्दल नेहमीच मनात द्वेषाची भावना होती.

त्याला लहानपणी मुअज्जम नावाने ओळखले जायचे. १६७० मध्ये, त्याने वडिलांविरुद्ध बंड केले. ज्यात त्याला इतरांनीही भडकावून दिलं. पण औरंगजेबाला हे कळले आणि त्याच्या आईला पाठवले, त्याची समजून घालण्यासाठी. त्यानंतर मुअज्जमला वडिलांच्या देखरेखीखाली राहावे लागले.

१६८० मध्ये त्यांने पुन्हा ट्राय केलं. पण पकडले गेला. यावेळी देखरेख अधिक कडक झाली. औरंगजेबाने हुकूम सुद्धा दिला की, नखे कापायची नाही आणि केसही कापायची नाही.

पण सम्राट होणं त्याच्या नशिबात लिहिले होते.

१७८१ चं ते सालं मुअज्जमचा सावत्र भाऊ मुहम्मद अकबरनं दख्ख मध्ये तांडव सुरू केला होता. त्यामुळे

औरंगजेबाने मुअज्जमली दख्खनला पाठवलं. कारण त्याला दख्खनचा अनुभव होता आणि बरेच दिवस किल्ल्यात राहिल्यानंतर मन बदलणे आवश्यक होते. पण तो मुद्दाम लढाई हरला.

१७८७ मध्ये, त्याने मोठा कांड केला. औरंगजेबाने गोलकुंडाचा राजा अबुल हसनला पराभूत करण्यासाठी याला पाठवले होते. पण त्याने त्याच्याशी मैत्री केली.

आता औरंगजेब चिडला होता, त्याने त्याला परत पकडले. त्याच्या हरमच्या स्त्रियांना त्यापासून दूर पाठवले. सहा महिने नखं किंवा केस कापायची नाहीत,असा आदेश दिला होता. एवढचं नाही चांगलं खायला सुद्धा द्यायचं नाही आणि कोणाला भेटायचं सुद्धा नाही. त्याची नोकर मंडळी सुद्धा काढून घेतली.

१६९४ मध्ये औरंगजेबाला याची दया आली. पुढचं काम समजावून सांगितल्यावर त्याला परत पाठवण्यात आलं. आता पंजाबचा राजा, गुरु गोविंद सिंह याला थामबवायचं होतं. मुअज्जमने त्याला थांबवलं पण औरंगजेबाच्या मनाप्रमाणे नाही. म्हणजे लढाईतून नाही तर बोलण्यातून.

म्हणाला की, मला शीख धर्माबद्दल खूप आदर आहे. त्यानंतर त्याला अकबराबाद, लाहोर आणि नंतर काबूलचे राज्यपाल बनवण्यात आले. १७०८ मध्ये वडिलांच्या मृत्यूपर्यंत तो तिथं राहिला.

त्यावेळी त्याचे भाऊ कामबख्श आणि आझम शाह हे दख्खन आणि गुजरातचे राज्यपाल होते. सगळे आग्र्याच्या दिशेने निघाले. पण मुअज्जमने सर्वांचा पराभव केला. अगदी आझम शाह मारला गेला. आणि १९ जून १७०७ ला मुअज्जम बहादूर शाह प्रथम या नावाने दिल्लीचा सातवा बादशहा झाला.

बादशाह बनल्यानंतर बहादूर शाहने अंबर, जोधपूर आणि उदयपूरला किरकोळ लढाईंमध्ये आपल्या राज्यात जोडले. पण या बहादूर शाहला औरंगजेबाची परंपरा पुढे नेता आली नाही. तितका महत्वाकांक्षी नव्हता. पराक्रमी तर नव्हताच. त्याच्यापासूनच मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.