औरंगजेब अंबेजोगाईच्या दत्त मुर्तीसमोर नतमस्तक झाला होता, अशीही एक आख्यायिका

बीड जिल्हातील अंबाजोगाई किंवा अंबेजोगाई. गावाचा उल्लेख दोन्ही नावाने केला जातो हे एक वैशिष्टच म्हणावे लागेल. तर या गावात बऱ्याच गोष्टी फेमस आहेत.

अध्यात्मिक सांगायचं झालं तर आद्यकवी मुकुंदराज आणि संत दासोपंत यांच्या वास्तव्यामुळे पुनित झालेले स्थान म्हणून अंबेजोगाईचा उल्लेख केला जातो. अंबेजोगाईच्या देशपांडे गल्लीत दासोपंताचा दत्त देवस्थान दत्तसंप्रदायात प्रसिद्ध आहे.  

दत्त संप्रदायात प्रामुख्याने तीन पंथ आहेत पैकी गोसावी, गुरुचरित्र आणि दासोपंती असे तिन पंथांचा उल्लेख केला जातो.

यामधील दासोपंती पंथाचे उध्वर्यु म्हणून दासोपंत यांचा उल्लेख केला जातो. या पंथाचे वैशिष्टे म्हणजे एकमुखी द्विभुजी द्त हेच सद्गुरूंचे रुप मान्य केलेले आहे. 

दासोपंत हे दत्तभक्त होते. त्यांनीच स्थापन केलेले दत्तमंदिर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील देशपांडे गल्लीत आहे. थोरले देवघर व धाकडे देवघर असे या मंदीराचे दोन भाग आहेत. दासोपंतानी आपले आयुष्य याच मंदिरात व्यतीत केल्याचं सांगण्यात येत.

त्याचसोबत या मंदिराची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. 

अस सांगतात की औरंगजेबाची दासोपंतावर खूप श्रद्धा होती. मात्र औरंगजेब तितकाच संशय देखील होता. आपण ज्यांच्यांवर श्रद्धा ठेवतो असे दासोपंत खरच दत्तभक्त आहेत का? त्यांची दत्तावर तितकीच श्रद्धा आहे का? हे प्रश्न त्याला पडत असत.

अशा प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी व दासोपंतांची परिक्षा घेण्यासाठी औरंगजेबाने दासोपंतांची परिक्षा घेण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याने दासोपंतांच्या दर्शनासाठी जात असताना नैवेद्याच्या ताटात बकऱ्याच्या मांसाचे तुकडे घेतले. त्यावर स्वच्छ रुमाल टाकून ते मांस झाकण्यात आले.

औरंगजेब दासोपंताच्या ठिकाणी पोहचला. दासोपंतानां म्हणाला,

तुमच्या दत्तासाठी आम्ही नैवेद्य आणला आहे. दासोपंतांनी ते नैवेद्याचं ताट घेतलं आणि दत्त मुर्तीसमोर ठेवलं.

औरंगजेब खूष झाला आणि दासोपंतांना नैवेद्याच्या ताटावरील कापड दूर करण्यास सांगितलं. दासोपंतांनी कापड दूर केलं तेव्हा त्याला तिथे गुलांबांची फुले दिसली. बकऱ्याचे मांस गायब होवून त्याठिकाणी गुलाब असल्याचं दिसल्याने औरंगजेब चक्रावला व तो दासोपंत व दत्तासमोर नतमस्तक झाला.

त्याने दासोपंतांच्या दत्त मंदीरास तीन गावे इनाम दिली. या इनाम दिलेल्या गावांच्या पाठीमागे औरंगजेब आणि दासोपंताची आख्यायिका सांगितली जाते.

ही गोष्ट आधारहिन वाटत असली तरी बऱ्याच अख्यायिकांना आधार नसतो हे देखील खर मात्र भक्तांकडून मोठ्या विश्वासाने आजही ही आख्यायिका सांगितली जाते. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.