औरंगजेबाच्या कुठल्याही भूलथापेला बळी न पडता दाराची बायको शेवट्पर्यंत एकनिष्ठ राहिली.

मुघल पातशाह औरंगजेब याने स्वतःला आलमगीर अर्थात ‘जगज्जेता’ ही उपाधी लावून घेतली होती. इतिहासात औरंगजेबाची ओळख ही क्रूर, कपटी धर्मांध राजा म्हणून आहे आणि इतिहासकारांनी याचे खूप सारे दाखले देखील दिलेले आहेत.

पण तो त्याचा मोठा भाऊ दाराच्या हिंदू असणाऱ्या पत्नीच्या प्रेमात वेडा असूनही शहाण्यासारखं वागला होता. आणि याची गोष्ट लिहून ठेवली आहे इटालियन प्रवासी निकोलाव मनुची याने. 

तर जेव्हा मोगल बादशाह शाहजहानचा मोठा मुलगा दारा शुकोव्ह सत्तेत होता तेव्हा त्याच्याकडे एक इटालियन प्रवासी म्हणजे निकोलाव मनुची कामाला होता. जिथ त्याला ८० रुपये पगारावर तोफखान्यात ठेवलं गेल. यानंतर समुगडची लढाई झाली ज्यात दाराला आपली शस्त्र खाली ठेवून हार मानायला मागली. यादरम्यान मुरादबक्षला बंदी बनविण्यात आल्यानं मनूची औरंगजेबाच्या ताफ्यात काही दिवस काम करत होता. 

 दाराचा शिरच्छेद केल्यानंतर औरंगजेबाने दाराच्या दोन बायकांना बोलावलं. एक चंचल स्वभावाची उदेपुरी ही जॉर्जियन वंशाची होती. आणि दुसरी एकनिष्ठ राणादिल. 

राणादिल हि हिंदू सामान्य कुळात जन्मलेली एक सामान्य नर्तकी होती. ती शाहजहानच्या पदरी होती. तिच्या लावण्यावर दारा मोहित झाला होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. दाराची प्रमुख पत्नी नूरमहालला दुःख होऊ नये म्हणून शहाजहान या लग्नाच्या विरुद्ध होता. पण दाराने ही गोष्ट मनाला इतकी लावून घेतली की तो झुरणीला लागला. आणि जवळ जवळ शेवटच्या घटका जणू तो मोजतो आहे इतकी त्याची अवस्था झाली. आपल्या मुलाची अवस्था बघून शहाजहानने त्या लग्नाला मान्यता दिली. आणि राणादिल दाराची बायको झाली होती. 

औरंगजेबाची आज्ञा मानून उदेपुरी  त्याच्यापुढे हजर झाली. तिला औरंगजेबाने आपली पत्नी म्हणून स्वीकारले. तिच्यापासून त्याला राजपुत्र कामबक्ष हा झाला. पण राणादिल म्हणजे सच्छील हृदयाची होती. ती औरंगजेबापुढे हजर झाली नाही. उलट तिने त्याला निरोप पाठवून विचारले

मला भेटण्याची इच्छा का करता ? 

त्यावर तिला निरोप धाडण्यात आला कि पत्नी म्हणून बादशाह तुझा स्वीकार करू इच्छितो. ज्येष्ठ भावाच्या विधवा या धाकट्या भावाच्या मालकीच्या होत असतात असा नियम आहे. 

यावर माझ्यात आपल्याला काय आढळले म्हणून आपण माझ्यावर मोहित झाला आहात ?

असे राणादिलने विचारले. त्यावर औरंगजेबाने उत्तर दिले तुझे केस मला फार आवडतात. यावर तिने आपले सगळे केस कापून औरंगजेबाकडे पाठवले आणि सांगितले तुला जे सौंदर्य हवे होते ते तुला मिळाले आता मला एकांतवासात काळ कंठू दे. परंतु औरंगजेबाला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. 

त्याने तिला पुन्हा कळवलं की तुझं सौंदर्य अप्रतिम आहे पत्नीच म्हणूनच मी तुझा स्वीकार करीन. मी दारा आहे असं समजून चालावस. राणी म्हणून तुझा मानमरातब यात यत्किंचितही उणीव राखणार नाही. नाहीतरी तू माझ्या बंधूची पत्नी होतीसच. राणादिल मोठ्या धैर्याची होती. ती आपल्या महालात गेली. एकसुरी घेऊन तिने आपल्या चेहऱ्यावर सपासप वार करून घेत रक्त एका वस्त्रात गोळा करून ते औरंगजेबाकडे पाठवून दिलं. आणि म्हणाली, 

आपणास जर माझ्या चेहऱ्याचे सौंदर्य पाहिजे असेल तर तू आता विद्रूप झाला आहे. आणि माझे रक्त जर आपणास संतोष देत असेल तर तशी आपणास मोकळीक आहे.  

तिचा हा निर्धार बघून औरंगजेबानेही आपला आग्रह सोडून दिला. तिचा एकनिष्ठ पणा पाहून तो तिला आदराने वागवू लागला. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.