तो बंडखोर कवी होता विद्रोही लेखक होता त्याहूनही गोव्याच्या राजकारणातला वाघ होता.

विष्णू गेल्याची बातमी धडकली. 23 वर्षाची गाढ मैत्री संपली . कधी पणजीतल्या कुठल्याशा लहान बारमध्ये बसण्यासाठी त्यानं केलेला फोन, निसर्गाबाबत अधिक माहिती हवी असली की तो मला त्याच्या कार्यालयात बोलवायचा मी असेल त्या अवतारात हजर व्हायचो आणि…