त्याच्या सुपरहिट पिक्चरनेच त्याचा घात केला…

ऋषी कपूर म्हणे 'आ अब लौट चले' च्या पूर्व प्रसिद्धीच्या वेळी म्हणाला होता, चिम्पू (राजीव कपूर)ने ४८ की ७२ तास खपून सिनेमा एडिट केला होता. हे सांगून माझा मित्र जोरात हसायला लागला. राजीव कपूर आताच्या उदय चोप्रा वगैरे प्रभृतींचा आद्य…

हिंदी फिल्म इंडस्ट्रीने आमच्या मौशुमीला वाया घालवलं !

मी आणि माझा मित्र फार पूर्वी सिटीलाईट एरियात असेच हिंडत असताना (उकिरडे फुंकणे असा समाजमान्य शब्द आहे त्याला) मराठी नाटक सिनेमात काम करणारी एक अभिनेत्री दिसली. नाही, त्या उकिरडे फुंकत नव्हत्या. काहीतरी खरेदी करत होत्या. जसे बरेच मराठी…

बापाचं नाव मोठ्ठं करणारा मुलगा..

शाहिद का कोण जाणे मला नाही आवडला कधीच. आपलं एखादा अभिनेता अभिनेत्री आवडण्याचं कारण हे केवळ चित्रपटापूरतं मर्यादित नसतं कधीच. अनेक पातळ्यांवर हे पसरत गेलेलं प्रतिबिंब असतं नायक नायिकांचं. शाहिद कधी पडद्याबाहेर लोकांशी connecting असा वाटलाच…

पेग नंबर दोन नंतर गोविंदा प्ले लिस्ट लावा..

ऐंशीच्या उत्तरार्धात बीबीसी लंडनच्या टीमने बॉलिवूड डान्सर स्टार्स अभिनेत्यांच्या मुलाखतीची मोहीम केली होती. नंतर त्यातली काही लोकं छायाचित्रकार गौतम राजाध्यक्षांना भेटायला आली तेव्हा त्यांनी राजाध्यक्षांवर एक बॉम्बच टाकला. "तुमच्या…

आपल्याला थलैवाचा अर्धा चेहरा दिसतो…थेटर जणू फेसाळत्या लाटेसारखं उसळलं…

किस्सा खरा खोटा वेंकटेश्वर जाणे... तेव्हा जयललीता तामिळनाडूच्या पंतप्रधान (तिथं पंतप्रधानच असतात) होत्या आणि त्यांची काहीतरी ठसन होती याच्याबरोबर. तेव्हा याच्या घरापासूनच्या रस्त्यावर वाहनबंदी लावली त्यांनी. आता हा कामाला निघेल की नाही…

तब्बू आणि स्कॉच जितकी मुरते, तितकी चढते!

आमच्या बॉलीवूड मध्ये हिरॉईनला अमुक अमुक गर्ल म्हणून लाडाची नावं ठेवण्याचा प्रघात आहे. जशी माधुरी 'धकधक गर्ल', हेलनजी 'गोल्डन गर्ल' तशी तब्बू 'रुक रुक गर्ल'. खरं म्हणजे 'विजयपथ'च्या त्याच नाही तर इतर गाण्यातही उंच, लंबू तब्बू नाच करताना…

खानमंडळीनां फाईट द्यायला ‘खिलाडीयों का खिलाडी’ आला होता.

बारा नंबरचा जुता घालणारा हा ताडमाड पंजाबी पोरगा, प्रमोद चक्रवर्ती यांच्या "सौगंध" चा हिरो होता त्यावेळची गोष्ट. शूटला पत्रकार आणि फोटोग्राफर्सना बोलवायची तेव्हाची पद्धत. कॅमेरामन पटापट याला क्लिक करू लागले. टिपिकल बॉलिवूड भाषेत, "हां भैय्या…

चार चौघीत उठून न दिसणारी सामान्य रुपाची मुलगी चक्क सिनेमाची हिरोईन होते..

१९७४ चा रजनीगंधा हा एक सरप्राइज हिट होता. अनेक वेळा या वर लिहून आलं आहे म्हणून बोटं अजून बदडत नाही. परंतु एक बात काबिल ए तारीफ होती त्याकाळी आलेल्या या चित्रपटात. ती म्हणणे या कथेतली सगळी पात्रं अगदी तुमच्या आमच्या सारखी होती. नॉर्मल. इकडे…

गोऱ्यागोमट्या तनुजाची मुलगी अशी दिसते?

तनुजाची मुलगी सिनेमात येणार हे गौतम राजाध्यक्ष यांच्या लेखातून कळलं. हळू हळू तिचे फोटोज् छापून यायला लागले... ही?? तनुजा दी फिल्म स्टार ची मुलगी??? (तुषार कपूरला बघून असा शॉक बसला होता.जितेंद्र चा पोरगा?) हिरॉईन गोरीच हवी हा बॉलिवुडच्या…

हे बाळ साडे सहा फुटी झालं तरी डोक्याने बाबाच राहील.

एखाद्या गड किल्ल्यावर ट्रेकला जावं आणि आपण जातो म्हणून आपला यार, श्रीमंत बापाचा पोरगा असलेला मित्र पण यावा. मग अर्ध लक्ष त्याच्या कडे. याला दगडा धोंड्यातून कसं जमेल..? गडाखालची भाकरी कशी खाईल. याच्या महागड्या जर्किन ला काटे ओरबाडतील. चिखल…