बाबरीचा निकाल लावून माजी न्यायाधीशांनी सहकाऱ्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये वाईन पार्टी दिलेली.

सद्या माजी CJI रंजन गोगोई यांना कायमच वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. सद्या ते त्यांच्या आत्मचरित्रामुळे चर्चेत आलेत. त्यांच्या आत्मचरित्रामुळे अनेक सिक्रेट समोर आले आहेत. 

विद्यमान राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे ”जस्टिस फॉर द जज”  हे आत्मचरित्रामध्ये नुकतेच पब्लिश झाले आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीशी जुळलेल्या अनेक घटनांबाबत खुलासा केला आहे. २०१८ मध्ये चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी घेतलेली पत्रकार परिषद, त्यांच्यावर झालेले लैंगिक छळाचे आरोप, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय ते रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात दिलेला निकाल या सर्व प्रकरणांबाबत अनेक गोष्टी त्यांनी त्यात सांगितल्या आहेत.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल लागून जवळपास दोन वर्ष होत आलीत. ९ नोव्हेंबर २०१९ ला याचा तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी हा निर्णय दिला होता. या निकालामुळे रंजन गोगोई यांनी सर्वांच्याच लक्षात राहिलेत. हा निकाल लावण्यासाठी पाच न्यायाधीशांच्या खंठपीठाची स्थापना केली होती. त्यात माजी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस अब्दुल नझीर यांचा समावेश होता. 

या सर्वांनी मिळून या प्रकरणाचा निकाल लावला. या ऐतिहासिक निकालाच्या नंतरची एक आठवण गोगाई यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिली आहे.  

गोगोई यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेय कि, ऐतिहासिक अयोध्या खटल्याच्या निकालानंतर सेलिब्रेशन म्हणून गोगोई यांनी इतर सर्व सहकारी न्यायाधीशांना घेऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनरसाठी घेऊन गेले आणि तेथील सर्वोत्तम वाइन सर्व्ह करण्यात आली.

त्यांनी लिहिलं कि, ”अयोध्या बाबरी मशिद च्या प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर सरचिटणीसांनी न्यायालयाच्याबाहेर न्यायाधीशांच्या गॅलरीत फोटो सेशन ऑर्गनायझ केले. त्यानंतर संध्याकाळी गोगाई यांनी सहकारी न्यायामूर्तींना ताज मानसिंग हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले होते. त्यांनी असेही लिहिले कि, आम्ही चायनीज फूड खाल्ले आणि आमची आवडती वाईन प्यायली. मी सर्वात मोठा असल्याने या पार्टीचे पैसे मी स्वतः दिले.” 

 CJI रंजन गोगोई यांच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची घटना म्हणजे या प्रकरणाचा निकाल असं ते त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात. 

या बहुचर्चित पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात न्यायमूर्ती गोगोई यांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल देखील वक्तव्य केलं आहे,  

त्यांच्या वर झालेल्या लैंगिक छळाच्या खटल्याच्या सुनावणी करणाऱ्या खंडपीठात ते होते. पण या सुनावणीच्या खंडपीठात हजर राहून आपण खूप मोठी चूक केली असंही त्यांनी मंजूर केलं, शेवटी चुका सगळ्यांकडूनच होतात तशाच माझ्याकडूनही झाल्याचे त्यांनी मान्य केले.  

आपल्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्याचा प्रस्ताव स्वीकारला होता त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले कि, मी कोणत्याही पक्षाचा नाही, मला राष्ट्रपतींनी उमेदवारी दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

तसेच त्यांच्या आत्मचरित्र ‘जस्टिस फॉर द जज’ लाँचच्या निमित्ताने माजी सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक गैरसमज देखील दूर केलेत. न्यायव्यवस्थेत कार्यकारिणीचा हस्तक्षेप नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या आत्मचरित्राचे उद्घाटन माजी सरन्यायाधीश एसए बोबडे यांच्या हस्ते नेहरू मेमोरिअल न्यूजिम अँड लायब्ररी येथे करण्यात आलेय. 

 

English Summary: After delivering a unanimous verdict in the Ram Janmabhoomi-Babri Masjid case on November 9, 2019, the then Chief Justice of India Ranjan Gogoi took his colleagues, who were part of the bench, for a dinner to Hotel Taj Mansingh and ordered their best wine.

 

Web title: Ayodhya Verdict Update: After Ayodhya verdict former CJI Ranjan-Gogoi-celebrate at the 5 star hotel took dinner wine

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.