काय आहे मोदींनी जाहीर केलेलं आयुष्मान भारत डिजिटल मिशन ?

२३ सप्टेंबर २०१८ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सूरू केली होती. ज्या अंतर्गत कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची व्यवस्था होती. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. मंत्रालयाने नंतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक संस्था म्हणून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची स्थापना केली.

२०२० पर्यंत १ कोटीपेक्षा जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेतला होता.

त्यानंतर १५ ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजनेची घोषणा केली होती. आधी ६ केंद्रशासित प्रदेशासोबत या मिशनचा पायलट प्रोजेक्ट सुरु केला जाईल आणि नंतर हळू-  हळू त्याचा विस्तार करण्यात येईल, असं त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून म्हंटल होतं. 

आता आरोग्य क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आयुष्मान भारत डिजिटल मिशन लॉन्च केलं.

या योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,

हे आरोग्य क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल आहे. या योजनेने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या उपचारांमध्ये महत्वाची भूमिका बजावलये, आता डिजिटल स्वरूपात आल्यामुळे त्याचा आणखी विस्तार होतोय.

देशातल्या १३० कोटी जनतेच्या आरोग्य हितासाठी ही योजना लॉंच करण्यात आल्याचं म्हंटलं जातं. प्रत्येक भारतीय जो देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल. त्याला आरोग्य संबंधित मार्गदर्शन हवे असेल तर तो कुठल्याही पेपरवर्क, डॉक्टरांच्या पावती किंवा दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंड न राहता.

आयुष्यमान भारत डिजिटल योजनेच्या मदतीने आता त्याच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरमध्ये तो सगळा डेटा असेल. ज्याच्या मदतीनं तो आपल्या आरोग्य समस्यांचे निदान करू शकेल.

योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य ओळखपत्र तयार केले जाईल. 

पीएम मोदी म्हणाले की, आता प्रत्येकाला हेल्थ आयडी मिळेल, याच्या मदतीने रुग्ण आणि डॉक्टर त्यांचे रेकॉर्ड तपासू शकतात. यामध्ये डॉक्टर, परिचारिकासह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी, हॉस्पिटल-क्लिनिक-मेडिकल स्टोअर्सची नोंदणी असेल.

प्रत्येक व्यक्तीसाठी एक युनिट हेल्थ कार्ड तयार केले जाईल. हे आधार कार्ड सारखाच असेल आधार कार्डवर ज्याप्रमाणे नंबर असतो त्या सारखाच नंबर या हेल्थ कार्डवर असेल. त्याच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात त्या व्यक्तीची ओळख पटेल.

युनिक हेल्थ कार्ड रुग्णांसाठी आणि डॉक्टर दोघांसाठी फायदेशीर ठरेल. यामुळे रुग्णांना डॉक्टरांना भेटण्यासाठी मेडिकल फाईल बाळगणे टाळता येते. एवढंच नाही तर डॉक्टरकडे रुग्णाचा युनिक हेल्थ आयडी देखील असेल. ते पाहून आपण त्याच्या आजारांचा पूर्ण डेटा काढला जाईल आणि त्या आधारे पूढचा उपचार केला जाईल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, डिजिटल इंडिया मोहिमेमुळे देशातील सामान्य नागरिकाची शक्ती वाढली आहे. आपल्या देशात १३० कोटी आधार क्रमांक, ११८ कोटी मोबाइल युजर्स, ८० कोटी इंटरनेट वापरकर्ते, ४३ कोटी जन धन बँक खाती आहेत, हे जगात कुठेही नाही.

खरं तर,  पूर्वी आर्थिक अडचणींमुळे बरीच लोकं रुग्णालयात जाणं टाळायची, परंतु आयुष्मान भारत आल्यामुळे त्यांची भीती दूर झाल्याचं म्हंटल जातंय.

व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या विविध भागांना भेटी देताना ते आयुष्मान भारत लाभार्थ्यांना भेटत राहतात. गेल्या तीन वर्षात सरकारने केवळ गरिबांच्या चिंता दूर करण्यासाठी लाखो आणि करोडो रुपये खर्च केले आहेत. देशाच्या वर्तमान आणि भविष्यात सरकारकडून मोठी गुंतवणूक केली जातेय.

पीएम मोदी म्हणाले की, आतापर्यंत लोकांना इतर कोणत्याही ठिकाणी उपचारासाठी जाताना त्यांची सगळी मेडिकल हिस्ट्री सोबत घेऊन जायला लागायची. परंतु जेव्हा अशा सुविधा डिजीटल केल्या जातात तेव्हा लोकांना तसेच डॉक्टरांना सुद्धा मदत होईल.

हेल्थ कार्ड बनवण्यासाठी :

सार्वजनिक रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्रे, आरोग्य आणि निरोगी केंद्रे आणि राष्ट्रीय आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर रजिस्ट्रीशी संलग्न आरोग्य सेवा प्रदाते हे हेल्थ कार्ड तयार करू शकतात. आपण स्वत: हेल्थ कार्ड तयार करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे हेल्थ रेकॉर्ड https://healthid.ndhm.gov.in/register येथे नोंदवावे लागेल.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.