इतरांनी बाजार मांडण्यापूर्वी पुण्याच्या या गुरूंनी योगाला जगभरात पोहचवलं होतं…..

भारतात योगाचं महत्व प्राचीन काळापासून असलं तरी अलीकडच्या काही काळात योगाकडे अनेक लोकं वळत आहेत. ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो अनेक लोक सकाळी सकाळी योग करतात. हे योगाचं महत्व पसरवणारे एक गुरु होते त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया, त्यांनी एका नवीन योगाचा शोध लावला होता.

बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराज अयंगार अर्थात बी के अय्यंगार. १४ डिसेंबर १९१८ रोजी अय्यंगार यांचा जन्म झाला. भारतातल्या योग प्रकारचे अग्रगण्य व्यक्तींपैकी ते एक होते. अय्यंगार योगाचे जनक म्हणून बी के अय्यंगार यांना ओळखलं जातं. अगदी परदेशातही अय्यंगार यांची क्रेझ होती. पण इतकी मोठी पदवी मिळण्याआधीच त्यांचा प्रवास मोठा हलाखीचा होता. 

अय्यंगार यांचं लहानपण एका गरीब घरात गेलं. आईवडिलांचे ते ११ वे सुपुत्र होते. लहानपणी कायम आजारी असल्याने त्यांची तब्येत ढासळत चालली होती. डॉक्टरांनी योगा करण्याचा सल्ला दिला आणि अय्यंगार योगाच्या वेडाने झपाटून गेले. या विषयावर त्यांनी भरपूर अभ्यास केला आणि योगा आत्मसात केला.

पुढे १९३७ साली ते पुण्यात आले. डेक्कन जिमखान्यात लोकांना योगाचं प्रशिक्षण ते देऊ लागले. त्यांच्या योगाच्या चर्चा हा महाराष्ट्रातच नव्हते, देशभरातच नव्हते तर परदेशातही होऊ लागल्या.

१९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात योगगुरू अय्यंगार यांनी बेल्जीयमची राणी, क्वीन एलिझाबेथ अशा सगळ्या मोठ्या लोकांना योगा शिकवला.

अय्यंगार यांच्या प्रशिक्षणावर खुश होऊन बेल्जीयमच्या राणीने त्यांना स्वतःच्या हाताने बनवलेली एक मूर्ती भेटवस्तू म्हणून दिली होती.

वयाच्या नव्वदीतही अय्यंगार हे रोज चार चार तास योग करायचे. अय्यंगार योगाचे जनक म्हणून ते प्रसिद्ध झाले. या योगामध्ये २०० हुन अधिक क्लासिकल योगासन आणि चौदा प्रकारचे योगासन यात सामील होते. अपंग व्यक्तींसाठी त्यांनी नवनवीन योगाचे शोध लावले. 

टाइम मॅगेझीनने २००४ साली जगातले सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्वांची यादी जाहीर केली होती त्यात योगगुरू बी के अय्यंगार यांचंही नाव होतं. जगभरात त्यांच्या योगाचे चाहते तर आहेत शिवाय शिष्यसुद्धा आहेत. अय्यंगार यांनी ७८ देशांमध्ये जाऊन तिथल्या लोकांना योगाबद्दल प्रशिक्षण दिलेलं आहे.

चीनसोबतच संबंध जगभरात त्यांचे ३० हजार शिष्य होते. जगभरातले अधिकृतरीत्या सर्टिफाईड योगगुरू बी के अय्यंगार यांना आपला गुरु मानतात. आजही जगभरात २०० अय्यंगार योग संस्थान जगभरात चालू आहेत. योगावर अनेक पुस्तकांचं लिखाण अय्यंगार यांनी केलं. योगाचा जगभर प्रचार, प्रसार व्हावा म्हणून त्यांनी विपुल लेखन केलं. यामध्ये लाइट ऑफ योग, लाइट ऑफ प्राणयाम, लाइट ऑन योगा सूत्र ऑफ पतंजलि हि पुस्तकं होत. 

अय्यंगार यांच्या शिष्य यादीमध्ये अनेक खेळाडू आणि मोठे व्यक्ती आहेत त्यामध्ये सचिन तेंडुलकर, प्रो. देवधर, मार्टिन क्रो, अनिल कुंबले, श्रीनाथ, राहुल द्रविड़, वीरेंद्र सहवाग, लाला अमरनाथ, दिलीप वेंगसरकर, जे कृष्णमूर्ति, जय प्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, आचार्य अत्रे, एल्डस हक्सले होते.

अय्यंगार यांच्या या विपुल योगदानाबद्दल १९९१ साली पदमश्री, २००२ साली पदमभूषण आणि २०१४ साली पदमविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या ९६ व्या वर्षी म्हणजे २० ऑगस्ट २०१४ रोजी पुण्यामध्ये योगगुरू बी के अय्यंगार यांचं निधन झालं. जगभरात योगाचा प्रचार प्रसार करण्यात अय्यंगार यांच योगदान खूप मोठं आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.