बाबांचा स्वॅग जिरलाय. हॉटेल बंद करून ढाब्याच्या गल्ल्यावर परत आलेत

उगाच चौकात बसणारे म्हातारे म्हणत नाहीत दैव देते आणि कर्म नेते. असच काहीस दिल्लीतल्या  ‘बाबा का ढाबा’ चालविणाऱ्या कांता प्रसाद सोबत झालं आहे.

गेल्या वर्षी सोशल मिडीयावर हे बाबा तुफान व्हायरल झाले होते. त्यांच्या वयाचा विचार करता सोशल मिडीयावर सिम्पथीचा पूर आला होता. त्याच्या ढाब्यावर  जेवायला लोकांची लाईन लागायची.

मदतीसाठी हजारो लोक पुढे आले होते. मग काय बाबाची गाडी सुसाट सुटली. बाबाने नवीन हॉटेल सुरु केले. घराचा वरचा एक मजला वाढवला. मागचे होते नव्हते ते सगळे कर्ज फेडले. हे सगळ पिक्चर मध्ये घडल्या सारख होत.

हे त्यांच नॉर्मल जीवन आहे. मात्र मध्येच गाडीचा ब्रेक फेल व्हाव असं बाबाच झालं. आता बाबा पुन्हा एकदा आपल्या जुन्या ढाब्यावर परत आले आहेत.

मागच्या वर्षी ऐन कोरोनाच्या ऑक्टोबर महिन्यात गौरव वासन या तरुण युटूबरने ‘बाबा का ढाबा’वाल्या ज्येष्ठ दांपत्याच्या अडचणी लोकांसमोर आणल्या होत्या. गौरवचे स्वाद ऑफिशियल नावाचे युटूब चॅनल आहे. गौरवने एक ११ मिनिटाचा व्हीडीओ तयार केला होता. त्यात बाबांचा ढाबा कसा आहे. तिथे कसे जेवण मिळते. बाबा कसे कष्ट घेतात याची माहिती दिली हाेती.

कांता प्रसाद उर्फ बाबा समोरच्या अडचणी जगासमोर आल्या होता. हे पाहून ‘समर्थ’ भारताचे नागरिक बाबाच्या मदतीसाठी पुढे आले हाेते. ८० वर्षांच्या बाबांना दोन मुल आणि एक मुलगी आहे मात्र ते त्यांचा सांभाळ करत नाही. त्यांची पत्नी आणि ते दिवसभर धाब्यावर जेवण बनवून विकतात. रडत- रडत वयोवृद्ध  बाबाने ही गोष्ट जगाला सांगितली.

हे व्हिडीओ पाहून अनेकांचे उर भरून आले. ढाब्या समोर पिपली लाइव्ह सुरु झाला होता. या ज्येष्ठ दाम्पत्यासाठी देशभरातून प्रेम व्यक्त करण्यात येत होते. त्यांच्या मदतीला सामन्य नागरिक, नेते, अभिनेते सगळेच समजाचे देणे लागते म्हणत पुढे आले होते.

ढाब्यावर आता लाईन लावून जेवण मिळत होते. लोकांना जेवणासाठी वेटिंग कराव लागायचं. लोक मदतीबरोबर सेल्फी घेवू लागले होते. दिल्लीत तर एक नवा सेल्फी पॉईटचं तयार झाला होता. झोपडी सारख दिसणाऱ्या ढाब्यावर तीन-तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. ढाब्यावर सगळी माहिती लिहण्यात आली. त्यात ढाबा कधी सुरु झाला, त्याचे नाव, बाबा आणि त्यांच्या बायकोचा फोटो, त्यांचा मोबाईल नंबरही लिहण्यात आला.

 

कहाणी इथे संपत नाही

ज्या व्हीडीओमुळे बाबा ‘समर्थ’ भारताच्या नागरीकांनपर्यत पोचले होते. नंतर तो व्हीडीओ काढणाऱ्या गौरव वासन आणि त्यांच्यात वाद झाले होते. बाबाने तर गौरव विरोधात थेट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. बाबाने आरोप लावला होता कि,  गौरवने त्यांच्या नावावर लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आणि ते त्यांना दिलेच नाही. गौरवने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते.

गौरवने सांगितले कि, त्याला बाबाच्या नावावर ४ लाख २० हजार रुपये लोकानी दिले  होते. ते त्याने बाबाला देऊन टाकले आहेत. बाबाने गुन्हा दाखल केल्या नंतर दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

त्यानंतर बाबा सातवे आसमान पर होते

लोकांनी दिलेल्या मदतीतून कांता प्रसाद यांनी एक हॉटेल सुरु केले होते. त्यात त्यांनी काम करण्यासाठी दोन आचारी आणि तीन कामगार ठेवले होते. हॉटेल सुरु केल्या पहिल्यांदा खूप जण येत होते. हळूहळू हॉटेल मध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झाली होती.

हॉटेल बनविण्यासाठी बाबांना ५ लाख रुपयांचा खर्च आला होता. हॉटेल चालवायला महिन्याला एक लाख रुपये खर्च येत होता. मात्र त्यातून केवळ  ४० हजारांचे उत्पन्न  मिळत होते. त्यामुळे बाबांना खूप तोटा सहन करावा लागत होता. केवळ तीन महिन्यात बाबाला आपले हॉटेल बंद करावे लागले. त्यानंतर बाबा परत आपल्या जुन्या जागी आले असून ‘बाबा का ढाबा’ सुरु केला आहे.

नवीन हॉटेल सुरु करून आपले खूप नुकसान झाल्याचे बाबा आता सांगत आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.