बाबासाहेब पुरंदरे यांनी मराठीला दिलेलं आणखी एक महत्वाचं योगदान म्हणजे राजहंस प्रकाशन

मराठी वाङ्मय आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या लेखकांच्या यादीत बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव आदबीने घेतलं जात. त्यांच्या लेखनाने अनेकांनी प्रेरणा घेऊन मराठी साहित्यात आपलं स्थान बनवलयं. त्यांनी लिहिलेली शिवचरित्रावरची पुस्तक आजही वाचताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

आपल्या लिखाणाबरोबर बाबासाहेब पुरंदरे यांनी मराठीला दिलेली आणखी गोष्ट म्हणजे राजहंस प्रकाशन.

शिवशाहीर पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. वयाच्या सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास पुरंदरेंनी सुरुवात केला. कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. दिवसाची रात्र करीत अनेक दप्तरांमध्ये बसून मराठा इतिहासाची माहिती गोळा केली.

या काळात अनेक महत्वाच्या विषयांवर लिखाण होत होतं, पण शिवाजी महाराज्यांच्या चरित्राबद्दल लिहिण्याचं आव्हान कोणी घेत नव्हतं, तेच आव्हान स्वीकारलं, बाबासाहेब पुरंदरे यांनी.

चिकाटीमुळे बाबासाहेबांचे शिवचरित्र लिहून तयार झाले, पण ते प्रकाशित करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नव्हता. पण किती हि किंमत मोजावी लागली तरी चालेल शिवचरित्र प्रकाशित करायचंच हे पुरंदरेंनी मनोमन ठरवलंच होत. त्यासाठी त्यांनी कष्टाचा मार्ग पत्करला. 

आईचे दागिने गहाण ठेवून त्यांनी मित्राकडून सतरा हजार रुपये उसने घेतले आणि १९५२ साली राजहंस प्रकाशनची स्थापना केली.

आपल्या प्रकाशनच्या सुरुवातीच्या काळातच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र ‘राजहंस प्रकाशना’तर्फे प्रसिद्ध झाले.  पण आपल्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांनी बिकट परिस्थितीतून जावं लागलं. 

आपलं हे  पुस्तक वेळेत प्रकाशित व्हावं हे तर बाबासाहेबांच्या डोक्यात होतचं, पण शिवचरित्र लिहायचं म्हणजे कुठलीही गोष्ट सुटायला नको आणि चुकीची जायला नको, या गोष्टीची खबरदारी त्यांनी घेतली. ज्यासाठी त्यांनी रात्रंदिवस या पुस्तकावर काम केलं.  

आता आपलं पाहिलंच पुस्तक त्यात राजहंस प्रकाशनाची स्थापना नव्यानचं झालेली, त्यामुळे पैशांची किल्लत होती. पण पुस्तक प्रकाशित करायचंच, या जिद्दीने त्यांनी पुणे ते मुंबई असा प्रवास करून कोथिंबीर विकून पैसे जमा केले.  आणि या पैशातून पुरंदरे यांनी आपलं ‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाच्या प्रकाशनाने पुरंदरेंच्या लिखाणाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. या पुस्तकाने बरीच प्रसिद्धी मिळवली. आणि यासोबतच राजहंस प्रकाशनाने सुद्धा. राजहंसचा विस्तार होत गेला. 

ज्यानंतर १९५७ साली बाबासाहेब पुरंदरे यांचे मेहुणे श्रीकांत माजगावकर यांनी बाबासाहेबांसोबत कामाला सुरूवात केली. सामाजिक जाणीव आणि वैचारिक मोकळेपणा असे व्यक्तिमहत्व असणारे माजगावकर यांनी पुस्तकाच्या निवडीतून संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण केली. संस्थेनं प्रकाशित केलेल्या जवळपास सगळ्याच पुस्तकांना भरभरून प्रतिसाद मिळाला. 

प्रेरणादायी चरित्रे आणि आत्मचरित्रे, राजकीय, ऐतिहासिक आणि समाजकारणावरील प्रभावी पुस्तके अशी ‘राजहंस’ ची ओळख याच काळात तयार झाली.

संस्थेच्या कामाचा व्याप वाढतच होता, ज्यामुळे त्याची विभागणी करणं गरजेचं होत. त्यामुळे १९६६ साली  माजगावकरांचे धाकटे बंधू दिलीप माजगावकर सुद्धा राजहंसमध्ये काम करू लागले, जे सध्या संस्थेचे संचालक म्हणून काम पाहतात.

आपल्या राजहंसची ओळख जपत आजच्या वाचकांच्या आवडनिवड जाणण्याचा प्रयत्न दिलीप माजगावकरांनी केला, ज्यामुळे राजहंसच्या दालनात विज्ञान, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन अश्या अनेक गोष्टींची भर पडली.

बाबासाहेब पुरंदरे या काळात शिवचरित्राच्या व्याख्यानामध्ये व्यस्त होऊ लागले. त्यामुळे ते राजहंसमधून बाहेर पडले. त्यांचे धाकटे मेहुणे दिलीप माजगावकरांवरच राजहंस प्रकाशनाची सर्व जबाबदारी पडली.

राजहंसच्या इतिहास घडवणाऱ्या कादंबरी आणि पुस्तकांवर नजर टाकली तर, १९८९ मध्ये प्रकाशित झालेलं विश्वास पाटील यांचं ‘पानिपत’, त्याचपाठोपाठ अशोक जैन यांनी अनुवाद केलेलं इंदिरा गांधी यांचं चरित्र, जयंत नारळीकर, डॉ. श्रीराम गीत यांनी घडवलेलं ‘सृष्टीविज्ञानगाथा’, मंगेश पाडगावकर यांचं ‘कथारूप महाभारत’ हे अनुवाद, विश्वास नांगरे पाटील यांचं ‘मन में है विश्वास’, वीणा गवाणकर यांचं ‘एक होता कार्व्हर’.

नवे लिखाण आणि नव्या लेखकांचे राजहंसने नेहमीच स्वागत केले. आज संस्थेने शेकडो पुस्तक प्रकाशित केलीत, पण याचसोबत नवीन तंत्रज्ञानाशी, डिजिटल जगाशी हातमिळवणी केली. संस्थेनं वेबसाईटच्या माध्यमातून पुस्तकाची विक्री केली. तसेच राजहंस प्रकाशन म्हणून अ‍ॅपही लाँच केले आहे. 

म्हणजे मार्ग कुठलाही असेना पण वाचकांपर्यंत उत्तम लिखाण पोहोचवलं हे राजहंस प्रकाशनाचा मुख्य ध्येय राहिलेलं आहे. आपल्या या कामगिरीमुळेचं राजहंस प्रकाशना’ला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. म्हणूनच पब्लिकेशन्सच्या ब्रँड  यादीत राजहंसच नाव टॉपला येतं. या पब्लिकेशन हाऊसची प्रसिद्धी इतकी वाढलीये कि, आज राज्याबरोबर राज्याबाहेरही राजहंसच्या ब्रांचेस आहेत. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.