बाबर समलिंगी होता ! याच प्रेमाखातर त्याने ‘बाबरी मशीद’ बांधली होती ?

बाबारनाम्याचं संक्षिप्त वर्णन करणारे दिलीप हीरो आपल्या पुस्तकात बाबरविषयी लिहिताना  म्हणतात,

“वह पढ़ सकता था, वह लिख सकता था, वह प्यार कर सकता था, वह वासना कर सकता था और वह लड़ भी सकता था!”

या बाबरच मूळ नावं झहीरउद्दीन मुहम्मद बाबर होत. बाबरचं आत्मचरित्र म्हणजे ‘बाबरनामा’. आपल्या स्वतःच्या आत्मचरित्रात बाबर आपल्या भावना व्यक्त करतोय. त्याचं प्रेम, युद्ध, त्याच्या कविता अशा ओतप्रोत भावनांनी भरलंय त्याचं आत्मचरित्र. त्यात त्याने आपलं किशोरवयीन प्रेम ही व्यक्त केलंय.

पण त्याच हेच प्रेम आजच्या जगात मात्र वादग्रस्त ठरतंय. कारण ते समलिंगी होतं, त्याचं प्रेम होत बाबरीवर. बाबरी…जो एक मुलगा होता. 

जेव्हा बाबर १६ – १७ वर्षांचा होता त्या दरम्यानची गोष्ट आहे.

१७ वर्षांचा बाबर उर्दू बाजारात फेरफटका मारायला गेला होता. त्या उर्दू बाजाराच्या गल्लीत त्याला एक त्याच्याच वयाचा मुलगा दिसला. उंच गोरापान सडपातळ बांध्याच्या त्या मुलावर बाबरची नजर खिळली. त्या मुलाचं नाव होत ‘बाबरी’. बाबर प्रेमात पडला होता त्याच्या. बाबर त्या तरुण बाबरीच्या सौंदर्याबद्दल जेव्हा सखोल विचार करत त्या तुर्कीच्या बाजारात फिरत होता तेव्हा बरेच तुर्की लोक, त्या बाजारात बाबरीच्या सुंदरतेची प्रशंसा करत होते.

त्याच्या आठवणींमध्ये, म्हणजेच बाबारनाम्यात त्याने या घटनेचे वर्णन केलंय.

तो म्हणतोय, तुला पाहिल्यानंतर मला शब्दांची कमतरता भासू लागली आहे.

“रहने की शक्ति ही नहीं थी, न ही भागने की शक्ति थी, मैंने तुम्हें जो बनाया, मेरे दिल का चोर हो गया।”

पुढं बाबर बादशहा झाला. त्याची बरीच लग्न झाली. त्यानंतर जेव्हा त्याने परत आपल्या पहिल्या प्रेमाला पाहिलं तेव्हा बाबर म्हणतो, 

वह लड़का मिल गया जो हमारी सोहब्बत में रह चुका था. हम उससे आंखें नहीं मिला पाये, क्योंकि अब हम बादशाह हो चुके थे.

बाबर बादशहा झाला तरी बाबरीवर प्रेमाचं वर्णन करणाऱ्या कविता नियमितपणे करायचा. या मुलावर त्याच प्रेम जडण्याआधी बाबरच लग्न आयेशा सुलतान बेगम बरोबर झालं होत. किंबहुना त्याला बऱ्याच बायका आणि बरीच मुले होती.

पण बाबरी असलेल्या निस्सीम प्रेमाचं प्रतीक म्हणून बाबरी मस्जिद उभी केली असं काही इतिहासकारांच म्हणणं आहे.

असे म्हटले जाते की बाबरच्या अधीन असलेल्या मुघल साम्राज्यामध्ये अनेक समलिंगी होते. कारण त्याकाळात मुस्लिम साम्राज्यांमध्ये समलैंगिकता खूप सामान्य बाब होती. मुघल सैनिक सामान्यत: ज्या राज्यावर स्वारी करत त्या राज्यातील स्त्रिया व तरुण मुलं कवडीमोल गुलाम म्हणून विकत असत. हि मुलं आणि स्त्रिया राजदरबारात विकत घेतले जात. बरेच दरबारी, मुघल राजे लैंगिक समाधानासाठी आपल्या दरबारात किशोरवयीन मुलांना ठेऊन घ्यायचे.

बाबरनामा छगताई भाषेत आहे. तो समलैंगिक होता हे त्याने त्याच्या आत्मचरित्रात सांगितलंच. बाबारनाम्याच्या भाषांतराच काम बऱ्याच विद्वानांनी केलं. पण लोकांना बाबर समलिंगी होता हे समजायला थोडा काळ उलटावा लागला. किंबहुना काळाच्या ओघात बाबरीच्या प्रेमाखातरचं बाबरी मस्जिद बांधली गेली असं पुढं येत राहील.

आजपासून तीसेक वर्षांपूर्वी अयोध्येत बाबरी मशिद कारसेवकांनी पाडली. त्यानंतर देशभरात जातीय दंगली घडल्या, ज्यात शेकडो लोकांचे प्राण गेले. बरेच लोक बेघर झाले. आता आपल्याला हे माहित आहे की, कारसेवक आणि हिंदू संघटनांचा असा विश्वास आहे की बाबरी मशीद ज्या ठिकाणी बांधली गेली ती जागा हिंदू देवता श्री राम यांचे जन्मस्थान आहे. बऱ्याच इतिहासकारांच्या मते, बाबरी मस्जिद हे समलैंगिकतेचं प्रतीक होत म्हणून ती पाडली .

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.