गाताना कन्हैय्या शब्द वापरू नका म्हणून चिठ्ठी आली आणि बड्या गुलाम अलींनी पाकिस्तान सोडला .

पहिलवानासारखं धष्टपुष्ट शरीर, मोठ्या मिश्या आणि सारंगी वादनात पटाईत असणारे शास्त्रीय संगीतातले उस्ताद बडे गुलाम अली खां साहेब.

काळजाला भिडणारा त्यांचा आवाज आणि सारंगीवरून फिरणारी त्यांची बोटं असा सगळा साग्रसंगीत सोहळा फक्त बडे गुलाम अली खां यांच्या मैफिलीतच पाहायला मिळतो. एका प्रतिष्ठित शास्त्रीय संगीतात त्यांनी त्यांची मूळ घट्ट रुजवली.

पाकिस्तानला जाऊन ते परत तडकाफडकी भारतात का आले यावर आजचा किस्सा.

बडे गुलाम अली खान हे गायन क्षेत्रातले मोठे गायक होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाचं विभाजन झालं. फाळणीच्या काळात बरेच लोक आपला देश तिकडे दुसरीकडे निर्माण झाला आहे म्हणून पाकिस्तानला निघून गेले. त्याच काळात बडे गुलाम अली साहेबाना कोणीतरी सुचवलं कि अरे आपल्या मुसलमान लोकांचा देश तयार करण्यात आला आहे ,आता आपल्याला तिकडे जावं लागेल. बडे गुलाम अली साहेब सुद्धा आनंदाने चलो, वो भी अपनाही मुल्क हे म्हणाले.

त्यांना काय हिंदुस्थानात गेलं काय आणि पाकिस्तानात गेलं काय गाणंच गायचं होत, म्हणून तेही पाकिस्तानला निघून गेले.

पाकिस्तानात गेल्यावर ते तिथं बराच काळ राहिले, एके दिवशी त्यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाला सगळी प्रतिष्ठित मंडळी बोलवली होती, आर्मीचे जनरल्स, मोठमोठे अधिकारी अशी सगळी लोकं बडे गुलाम अली साहेबाना ऐकायला आली होती.

गायन सुरु झालं, बडे गुलाम अली साहेबानी सूर लावला,मेहफिल रंगायला लागली. त्यातल्या एका गाण्यात ओळ होती कि,

कन्हैय्या ने बैय्या मरोडी…

आणि हि ओळ शास्त्रीय गायनानुसार आवृत्त होत राहते , पुन्हा पुन्हा तीच ओळ विविध हरकतींनी बडे गुलाम अली साहेब ती ओळ गात होते. गाणं चालू असतानाच समोरून एक चिठ्ठी आली ,बडे गुलाम अली साहेबानी ती चिठ्ठी गाता गाताच बघितली. त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं ,

कन्हैय्या का जिक्र मत करो अफसरां नाराज चल रहे हें…..

हे बडे गुलाम अली खान त्यांच्यापेक्षा वरचढ होते त्यांनी ती चिठ्ठी तशीच ठेवून दिली आणि पुन्हा गाणं गाऊ लागले. पुन्हा जरा वेळाने अजून एकी चिठ्ठी आली त्यावेळीही त्यात तोच मजकूर होता कन्हैय्या का जिक्र मत करो अफसरां नाराज चल रहे हे…तेव्हाही ते तीच ओळ गात होते.

असं पुन्हा घडलं तेव्हा बडे गुलाम अली साहेब म्हणाले ये बार बार चिठ्ठी कोण भेज रहा हे और कन्हैय्या का जिक्र मत करो ऐसा क्यूँ बोल रहा हे ? क्यूँ न करू में कन्हैय्या का जिक्र ? बरसो से मेरे पुरखे कन्हैय्या का जिक्र करते आये हे मै क्यू न करू ? अगर ऐसा हे तो मैं इधर नहीं गाऊंगा, मैं गाना बंद कर दूंगा.

गाणं थांबवून ते उभे राहिले, पहिल्यांदाच असा प्रकार घडला होता. त्यांना कुणी विनंतीही केली नाही कि गाणं चालू ठेवा म्हणून. त्यांनी मैफिल आवरली, आणि तेवढ्यावरच न थांबता तिथून उठून ते थेट भारतीय वकालतमध्ये गेले. त्यावेळी श्रीप्रकाश नावाचे राजदूत म्हणून अधिकारी तिथे कार्यरत होते.

बडे गुलाम अली खान साहेब राजदूत श्रीप्रकाश याना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं कि मुझे हिंदुस्थान जाना हे. त्यावर श्रीप्रकाश त्यांना म्हणाले कागदपत्रांची पूर्तता करा म्हणजे तुमचा भारतात जायचा मार्ग मोकळा होईल.

त्यावर बडे गुलाम अली खान साहेब म्हणाले कि नहीं नहीं मुझे अभि जाना हे. यावर श्रीप्रकाश म्हणाले अरे अभि कैसे ? आप नहीं जा सकते.

बडे गुलाम अली मात्र लहान मुलगा जसा हट्ट धरतो तसे अडून बसले. श्रीप्रकाश यांनी बरेच फोन फिरवले, स्वतःच्या पदाचं वजन वापरून, कागदपत्रांची जमवाजमव करून ती सबमिट केली आणि त्यांची भारतात जाण्याची व्यवस्था केली आणि बडे गुलाम अली साहेबांना सांगितलं कि आता एक दोन दिवसात तुम्हाला हिंदुस्थानात जात येईल. मात्र खान साहेब ऐकेचना म्हणाले नहीं मुझे अभि जाना हे. शेवटी नाईलाजाने श्रीप्रकाश यांनी एक विमान चार्टर केलं. जे त्याकाळात अत्यंत मुश्किलीचं काम होतं.

हिंदुस्थानात आल्यावर मात्र बडे गुलाम अली साहेब कधीही भारत सोडून बाहेर गेले नाही.  भारतात त्यांनी बरीच गाणी गायली. भारतातच त्यांचं देहावसान झालं. मातृभूमीवरच त्यांचं प्रेम मात्र कायम आठवणीत राहिलं. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही आपलेच आहेत, दोन्ही संस्कृती आपल्याच आहेत त्यामुळे देवा धर्माच्या नावावरून भांडणं बरं नाही हाच त्यांचा हेतू होता. भारत पाकिस्तान फाळणीच्या मुद्द्यावर त्यांनी केलेलं विधान अगदीच थेट भिडतं,

अगर हर घर में एक बच्चे को हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सिखाया गया होता तो देश का कभी बटवारा नहीं होता.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.