१२९ वर्षे कसलीही वर्गणी न घेता गणेशोत्सव साजरा करणारे पुण्याचं एकमेव गणपती मंडळ.

महाराष्ट्राचे अधिष्ठान असलेल्या गणेशोत्सवास सुरुवात झालेली आहे. गणेशोत्सव म्हंटले की, विविध गणपती मंडळ आली, मांडव आले, बाप्पासाठी आरास आली, मोठ-मोठ्या मुर्ती आल्या, मिरवणुका आल्या आणि ह्या सर्वासाठी वर्गणी आणि देणगी आली. दरवर्षी बाप्पांच्या कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी वर्गणी जमा करण्याचा भार आपल्या खांद्यावर घ्यावा लागतो. बऱ्याच वेळा वर्गणी वरून वाद निर्माण होऊन सणाला गालबोट लागण्याचे प्रकार घडत असतात. 

पण आज आपण अश्या एका मंडळाला भेटणार आहोत जे गेले १२९ वर्षे कुठल्याही प्रकारची वर्गणी अथवा देणगी न घेता स्वतःच्या खर्चाने गणेशोत्सव साजरा करत आहेत.

पुण्यात जर तुम्ही गणेशोत्सवासाठी खरेदी करायला येणार असाल तर तुमचे पहिले पाहून वळते ते रविवार पेठ कडे. त्याच रविवार पेठ मध्ये बढाई आळी आहे, त्या आळी मध्ये तुम्हाला विविध प्रकारचे लाकडांचे आरस, लाकडांच्या बैलगाड्या, आणि लाकडांच्या विविध प्रकारच्या बनवलेल्या वस्तू भेटतात. त्याच बढाई आली मध्ये पढाई समाजाचा गणपती बाप्पा आहे.

लोकमान्य टिळकांच्या हस्ते स्थापन झालेला पुण्यातील हा पहिला समाज गणपती आहे. यंदा बढाई समाजाचा गणपती १२९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. 

बढाई समाज हा मुळचा बुंदेलखंडचा. पानिपत युद्धात मराठ्यांना मदत केल्यामुळे शनिवारवाड्याचे काम करण्यासाठी बढाई समाजाला पुण्यात बोलवण्यात आले. पुढे हा समाज इथेच स्थायिक झाला. रविवार पेठ येथे त्यांना वसाहत देण्यात आली. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा लकडी पुल बांधण्यासारखे काम ह्या समाजाने केले आहे.

१८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून चालवलेल्या चळवळीमध्ये बढाई समाजाने सहभाग घेतला. लोकमान्य टिळकांच्या हस्ते या समाजाच्या गणपतीची स्थापना करण्यात आली. सर्व समाज बांधवांनी स्वखर्चातून हा गणेशोत्सव सुरू केला व तो आजपर्यंत स्वखर्चानेच चालू आहे.

गणपती बाप्पाची मिरवणूक बैल गाडीवरून काढण्याची प्रथा गेले सव्वाशे वर्ष अविरतपणे बढाई समाज राबवत आहे. पुण्यामधील नामांकित गणपती मध्ये बढाई समाजाच्या गणपतीचा उल्लेख होतो. 

लोकमान्य टिळकांच्या हस्ते स्थापन झालेला समाज गणपती म्हणून बढाई समाजाच्या गणपतीला मान आहे.

  •  कपिल जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.