दिल्लीचा रंगीला बादशहा, ज्याने फक्त स्वत:चे नग्न पेंटिंग काढून घेण्यातच धन्यता मानली.

मोहम्मद शहा. पुर्ण नाव मोहम्मद शहा रंगीला. मुघलांच्या रंक्तरंजीत इतिहासातल एक गुलाबी पान. त्याच्या नावाने तुम्हाला दिल्लीत एकही रस्ता दिसणार नाही. इतिहासाच्या पानावर त्याच्या नावाने एकही युद्ध नाही. त्याचा इतिहास लिहण्यासाठी ज्याने घेतला त्याने तो गुलाबी पेनानेच लिहला. 

त्याची चित्र पाहून अनेकांना अश्लीलता दिसली पण पाहणाऱ्यांनी देखील त्याच्याकडे प्रेमानेच पाहिलं, आणि लोकांना दिसला मुघलांच्या घरात जन्मलेला एक रंगीला राजा. 

इतिहासात मोहम्मद शहाच वर्णन रंगीला मोहम्मद म्हणून केल आहे. मोहम्मद शहाचं कर्तृत्त्व इतकच की त्याने आपली कित्येक नग्नचित्र काढून घेतली. नुसती नग्न चित्र काढली तर तो रंगीला कसला. आपल्या दासींबरोबर रासलिला करताना त्याने हि चित्रे काढून घेतली. 

औरंगजेब कोण होता ते आपणाला सांगण्याची गरज नाही. औरंगजेब जेव्हा मुघलांच्या गादीवर आला तेव्हा त्याने मुघल सत्तेने जपलेली कला, साहित्य, संगीत सगळ काही धुळीला मिळवलं. फक्त सत्ता आणि तलवार यावर औंरगजेबाचा विश्वास होता. आपल्या दरबार असणाऱ्या कलाकारांना त्याने रस्ता दाखवला. तिथे आत्ता फक्त सेनापती आणि लढाईची भाषा चालू लागली होती. 

औंरगजेब सत्तेच्या लोभापायी महाराष्ट्राच्या जमिनीवर मेला. शेवटपर्यन्त त्याला मराठ्यांचा पराभव करता आला नाही. आपला पुर्वाधिकारी कोण होईल याची भिती असल्याने त्याने कोणालाच बळ दिल नाही.

त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि मुघल सलतनत रसातळाला जावू लागली. अराजकरता माजली आणि मुघल बादशहांना वजिर भारी पडू लागले. मुघल सेनापतींच्या जीवावर नाचू लागले. 

अशा एका काळात मोहम्मद शहा सत्तेवर आला.

मुघल बादशहाचा कारभार हातात येताच त्यानं काय केलं तर पुन्हा दरबारातील सर्व कलाकारांना बोलावून घेण्यास सुरवात केली. चांगल गाणाऱ्याला, चांगल नाचणाऱ्याला त्यानं राजाश्रय देण्यास सुरवात केली. निदा मॉल सारखा चित्रकार देखील त्याच्याच दरबारात होता. खयाल राग देखील त्याच्याच दरबारात जिवीत झाला. आपल्या तीस वर्षाच्या काळात त्याने एकही युद्ध केलं नाही. 

रंगीला बादशहाबद्दल सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तो स्वत: नाचायचा, तेही दासींचे कपडे घालून. त्याचा हा कार्यक्रम चेष्टेचा ठरला असला तरी त्याने आपल्या दरबारात तृतीयपंथी व्यक्तींना सन्मान दिला हि गोष्ट नाकारुन चालणार नाही.

थोडक्यात त्याला महल हा पुर्णपणे रंगलेला असायचा. तो सकाळी उठून घोडेस्वारी करायचा, नाचायचा गायचा, महिलांसोबत रासलिला करताना आपली चित्र काढून घ्यायचा. पण या सर्व गोष्टीत त्याला एका गोष्टींचा चांगलाच गर्व होता. तो म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या कोहीनुर हिऱ्याचा. 

बादशहा रंगीला मुघलांचा चांगलाच खनिजा संभाळून होता. याची माहिती नादिर शहाला मिळाली. नादिर शहाने मुघल बादशहावर आक्रमण करुन हा सगळा खजिना ताब्यात घ्यायचा प्लॅन केला. त्यासाठी नादिर शहा दिल्लीवर आक्रमण करणार होता. आत्ता युद्ध करण्याची वेळ आली होती ती बादशहा रंगीला याच्यावर. 

बादशहा रंगीलाच्या दरबारात नादिर शहाची चिठ्ठी आली. नादिर शहा दिल्लीवर आक्रमण करणार अशी धमकी त्यामध्ये होती. चिठ्ठी आल्यानंतर रंगीला बादशाहने काय करावं तर आपल्या दारूच्या ग्लासमध्ये ती चिठ्ठी बुडवली आणि विषय सोडून दिला. 

काही दिवसातच दिल्लीच्या वेशीवर नादिर शहाच्या फौजा हजर झाल्या. नादिर शहाचा आदेश आला की दिल्लीची खांडोळी करुन टाकण्याचा प्लॅन करण्यात आला होता. इतक्यात त्या फौजेच्या समोर बादशाहा रंगीलाच्या फौजा उभा राहिला. मैदानात स्वत: बादशहा रंगीला उतरला होता.

बादशहा रंगीलाने नादिर शहाला चिठ्ठी पाठवली. त्यात लिहलं होतं समझौता. प्रत्येक गोष्ट युद्ध करुन थोडीच मिळते रंगीलाचा विश्वास प्रेमावर होता. नादिर तयार झाला. नादिरनं यायचं पाहूणचार घ्यायचा आणि जाताना पैसे घेवून जायचं. अस लुटायचं ते तस लुट, इतकच. 

नादिर पाहूणचार घ्यायला आला. त्याने चांगलाच पैसा गोळा करायला सुरवात केली.

त्यातच नादिरच्या सैनिकांची बाजारात वादावादी झाली. नादिरच्या सैनिकांनी बाजारातच कापाकापी सुरू केली. हाताला येईल त्या प्रकारे त्यांनी लुटलं. नादिरच्या मतानुसार त्याला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले होते पण रंगीला बादशहाचा एक सैनिक फुटला तो म्हणाला इतक्यात हारकू नका.

बादशहाचा खजिना बघितला नाही. नादिरनं दम भरला बादशहा रंगीलाने मुघल खजिना उघडला. नादिरने ते देखील लुटलं. पुन्हा सैनिक म्हणाला. कोहिनूर हिरा तो तर राहिलाच. त्याने बादशहाला कोहिनूर मागितला. कुठला कोहिनूर म्हणून बादशहाने हात वर केले. आत्ता नादिर कोहिनुरच्या मागं लागला. तो दिल्लीतच थांबून राहिला.

अचानक एका वजीरानं त्याला कोहिनूरची माहिती दिली.नादिर जायला तयार झाला. जाता जाता बादशहा रंगीला तो म्हणाला आमच्याकडे एक प्रथा आहे. जाताना तुमचा मुकूट आमच्या डोक्यावर आणि आमचा मुकूट तुमच्या डोक्यावर. रंगीला बादशहा न सांगून काय करतोय.

दिल्लीत तर नादिरच्याच फौजा होत्या. रंगीला बादशहाने आपल्या डोक्यावरचा मुकूट त्याला दिला. मुकूटात लपवलेला कोहिनूर घेवून नादिर गेला तो गेलाच. आत्ता हि गोष्ट कितपत खरी. तर जितका इतिहास खरा तितकीच. गोष्ट तर अशीच सांगितली जाते.  

हे ही वाचा. 

 

1 Comment
  1. online table tennis game 3d says

    Fold – to give up the cards and quit the hand by placing the cards face upon the
    poker table. To that end, they often change the true odds into the casino odds and thereby ensuring a portion of each wager. https://dgrreklam.com/staff/index.php?action=profile;u=38636

Leave A Reply

Your email address will not be published.