ग्वालियरमधल्या या दुकानातील बुंदीचे लाडू खायला स्वतः पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यायचे…

खाण्यापिण्याचे शौकीन बरेचजण असतात. सध्या food vloging ज्या पद्धतीने चालू आहे त्यावरून तरी तुम्ही अंदाज लावूच शकतात कि भारतभरात खवय्येगिरी किती मोठ्या प्रमाणात चालते. आता खाण्याचे पदार्थ इतके आहेत कि सांगायलाच नको. तर भारतभरात खाण्यापिण्याचे असणारे पदार्थ हे त्या त्या शहरांनुसार प्रसिद्ध असतात. तर असाच एक किस्सा आहे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आवडत्या दुकानाबद्दलचा.

अटल बिहारी वाजपेयी हे प्रामुख्याने चांगले खवय्ये होते. ज्यावेळी ते दिल्लीत असाहस तेव्हा ज्या ज्या वेळी त्यांना चांगलं काही खायची इच्छा व्हायची तेव्हा ते ग्वालियरमधल्या बहादूरा स्वीट दुकानात जाऊन त्यांच्या आवडीचे बुंदीचे लाडू खायचे.

ग्वालियरच्या लोकांना एक तर माहितीच झालं होतं कि अटल बिहारी वाजपेयींकडून काहीतरी काम करून घ्यायचं असेल, त्यांचा मूड चांगला करायचा असेल तर बहादुरा स्वीट दुकानातले बुंदीचे लाडू कामा येत असे. ज्या लोकांना अटल बिहारी वाजपेयी यांना भेटायचं असे ती मंडळी ग्वालियरच्या बहादुरा स्वीट मधून बुंदीचे लाडू आणि कचोरी घेऊन जात असे.

आता थेट देशाचे पंतप्रधान जर या दुकानात बुंदीचे लाडू खायला येत असेल तर दुकानाच्या मालकाने दुकान काय टापटीप ठेवलेलं असेल ? तर या दुकानाच्या बाहेर एकदम जुना, रंग उडालेला बहादुरा स्वीट्स शुद्ध देशी घी कि मिठाईया असा बोर्ड आहे. दुकानाच्या मालकाने साधेपणा आहे तसाच टिकवून ठेवलाय. बाहेरच्या बाजूला एक मातीची आणि कोळशाने बनवलेली भट्टी, तिथेच बाजूला एक हलवाई बुंदी तयार करत असतो. अशा ताज्या आणि चविष्ठ बुंदीपासून लगेच लाडू तिथे वळले जातात.

बाहेर लोकांची गर्दी कायम असते. ८५ वर्षांपासून बहादुरा स्वीट विविध प्रकारच्या मिठाई विकत आहे. दुकानात असलेली स्वछता म्हणजे गोड पदार्थांचं दुकान असूनही एकही माशी तिथे भिरभिर करताना दिसत नाही.

दुकानात जाताना ग्राहक लोकं स्वछता बघून चप्पल बूट बाहेर काढून मग हॉटेलात प्रवेश करतात. गावठी तुपातून तयार होणाऱ्या इथल्या मिठाया लोकं चवीने खायला येतात. दररोजचं जेवण वेगवेगळ्या चवींचं असतं पण गोडाचं खायला लोकं मालक विकास शर्मा यांच्या बहादुरा स्वीटला संपर्क करतात.

मालक विकास शर्मा अटल बिहारी वाजपेयी यांच्या खाण्याच्या किस्स्याबद्दल सांगतात कि, अटलजी खाण्यापिण्याचे शौकीन होते. ज्यावेळी ते आमच्या दुकानात येत असे तेव्हा त्यांच्या मित्रमंडळीसोबत ते गप्पा मारत मारत लाडूंचा आस्वाद घेत असत. अटल बिहारी वाजपेयी हे एकटे २५० ग्रॅम लाडू खात असे. लाडू खाता खाता ते त्यांच्या कवितासुद्धा ऐकवत असे.

बहादुरा स्वीटमध्ये फक्त बुंदीचे लाडूच फेमस नाही तर मसलन जिलेबी आणि कचोरी हे हि पदार्थ खाण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी या दुकानात असते. सणावाराला या दुकानाला लोकांचा वेढा पडलेला असतो. इतकी प्रचंड लोकप्रियता एखाद्या मिठाईच्या दुकानाला मिळणे तसं दुर्मिळच पण बहादुरा स्वीटची क्रेझ प्रचंड आहे.

या दुकानाची स्थापना करणारे बहादूर प्रसाद शर्मा यांनी जेव्हा अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या भागात मिठाई वाटली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचं एक खास नातं होतं. पुढे बहादूर प्रसाद शर्मा यांचं निधन झालं आणि त्यांच्या मुलाने विकास शर्मा यांनी दुकानाची सूत्र हातात घेतली पण अटल बिहारी वाजपेयी यांना लाडू पाठवण्याचं थांबलं नाही. 

आजही हे दुकान काहीही मॉडिफाय झालेलं नाही कारण हाच साधेपणा या दुकानाची ओळख आहे. खुद्द पंतप्रधान जरी बहादुरा स्वीट मध्ये मिठाई खायला येत असले तरी इथे एकही बॅनर वैगरे त्यांनी लावलेला नाही.

अटल बिहारी वाजपेयींशिवाय अनेक मोठी मंडळी या दुकानाला भेट देतात.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.