बाहुबलीला मारलेला कट्ट्पा साधा-सुधा नाही तर १०० कोटींचा मालक आहे

भारताच्या फिल्म इंडस्ट्रीत आतापर्यंतच्या सुपर- डुपरहिट चित्रपटात ‘बाहुबली’चं नाव आपुसकचं आघाडीवर येईल. या चित्रपटाने देशातचं नाही तर देशबाहेर सुद्धा मार्केट गाजवलं. बाहुबलीच्या दोन्ही पार्टने जगभरात तब्बल १,६८३ कोटींचं कलेक्शन मिळवलं. हा चित्रपट तर गाजलाच पण या चित्रपटाने आपल्या कलाकारांना सुद्धा लाईम लाइटमध्ये आणलं.

म्हणजे प्रभासचचं उदाहरण घ्या ना, तसं आधीही तो दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रसिद्ध होता, पण बाहुबली चित्रपटातून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो आज नव्या उंचीवर जाऊन पोहोचलाय. आज सर्वाधिक मानधन घेणाऱ्या  अभिनेत्यांमध्ये प्रभासचं नाव टॉपला आहे.

आता या बाहुबली चित्रपटाचं नाव घेतलं कि, मेन लीड असणाऱ्या बाहुबली सोबत हमखास घेतलं जाणार नाव म्हणजे कटप्पाचं. म्हणजे चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं? असा प्रेक्षकांचा सस्पेन्स ताणून धरत या कॅरेक्टरने सुद्धा प्रत्येकाच्या मनात जागा केली होती.

ही कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे सत्यराज. ज्यांचं पूर्ण नाव रंगराज सुब्बिया पण फिल्म इंडस्ट्रीत त्यांना सत्यराज’ या नावानेचं ओळखलं जात.

अभिनेता सत्यराज हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव. ज्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली १९७८ मध्ये, पण एक हिरो म्ह्णून नाही तर व्हिलन म्ह्णून. Sattam En Kaiyil या आपल्या पहिल्या तेलगू चित्रपटात त्याने साकारलेली व्हिलनची भूमिका  इतकी गाजली कि, पुढे अनेक दिग्दर्शकांनी त्याला  उचलले. पण सगळ्या भूमिका व्हिलनच्याचं.

सत्यराज याला इंडस्ट्रीत पॉझिटिव्ह हिरो म्ह्णून ब्रेक मिळाला तो तब्बल १० वर्षांनी म्हणजे १९८७ साली. तो चित्रपट म्हणजे ‘वेधम पुधीथु’ जो चांगलाच हिट झाला. यांनतर १९९० सालचा नदीगन, १९९४ चा अमैधी पडाई, २००७ साचा पेरियार आणि त्याच वर्षी आलेला ओनबधु रुबाई नट्टू या चित्रपटांमध्ये सत्यराज मुख्य भूमिकेत दिसला.

पुढे सत्यराजने २०१२ मध्ये बॉलीवूड चित्रपट ३ इडियट्सचा तमिळ व्हर्जन नानबन, २०१३ साली राजा रानी, २०१५ चा बाहुबली आणि २०१७ चा बाहुबली २ तसंच २०१८ च्या काना या चित्रपटांमध्ये  सहाय्यक अभिनेता म्ह्णून साकारलेली भूमिका चालगीच गाजली. त्यातल्यात्यात त्याच्या बाहुबली मधल्या भूमिकेने त्याला ‘नॅशनल स्टार’ बनवलं.  महत्वाचं म्हणजे अभिनय करण्यासोबत या चित्रपटात सत्यराज दिग्दर्शकही होता.

बाहुबली सोबतचं सत्यराजने १९९५चा ‘विलाधी व्हिलन’ या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले आहे.  या चित्रपटात तो तीन वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसला. चेन्नई एक्सप्रेस मधल्या आपल्या भूमिकेमुळे सत्यराज हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्येही फेमस झाले.

आता या सगळ्यावरून एवढा अंदाज तरी येतो कि, सत्यराज हे आज दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. ६७ वर्षीय सत्यराज गेल्या ४२ वर्षांपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे २२० चित्रपटांमध्ये काम केलेय. त्यामुळे त्यांची कमाई सुद्धा रग्गड आहे. ते आज करोडोंच्या प्रापर्टीचे मालक आहेत.

म्हणजे एका अहवालानुसार सत्यराज जवळपास १०० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. एका चित्रपटासाठी तो २ ते ३ कोटी रुपये घेतो. ‘बाहुबली’ चित्रपटासाठी त्याने २ कोटी रुपये फी घेतली होती. त्यांनतर त्याचा भाव आणखीनच वधारलंय. याशिवाय तो टीव्ही शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आणि जाहिरातींमधूनही पैसे कमावतो.

Idolnetworth.com नुसार, सत्यराजची एकूण संपत्ती १४३ कोटी रुपये आहे.

म्हणजे फक्त एक चॉकलेट हिरोचं नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमाऊ शकतो, अशी तयार झालेली मेन्टॅलिटी खोटी ठरवत गाजलेल्या व्हिलन किंवा सहाय्यक अभिनेत्यांमध्ये सत्यराज याचंही नाव घेतलं जातं. अर्थातच आपली ही वेगळी ओळख आणि ऐश्वर्य निर्माण करण्यात सत्यराजच्या जबरदस्त अभिनयाची जोड आहे, ज्याचं कौतुक नेहमीचं करायलाचं हवं.

हे ही वाचं भिडू :

English Summary:  According to a report, Sathyaraj owns assets worth around Rs 100 crore. He takes Rs 2 to 3 crore for a film. He had taken a fee of Rs 2 crore for the film ‘Baahubali’. After that, its price has gone up even more. He also earns money as a chief guest on TV shows and in commercials.

Web Title: Bahubali fame kattapa net worth is 100crores

Leave A Reply

Your email address will not be published.