मायावतींनी वडिलांना शेवटी दाखवून दिलंच की “मुलगी मुलांपेक्षा कर्तृत्ववान असू शकते”

भारताच्या राजकारणात यशस्वी महिला राज्यकर्त्यांच्या यादीत बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांचा उल्लेख आग्रहाने केला जातो. ज्या दिवशी मायावती पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या तो दिवस देशभराच्या दलितांसाठी ऐतिहासिक होता. साक्षात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर एक दलित महिला बसणं हे २० वर्षांपूर्वी तद्दन एक अशक्य स्वप्न होतं. दलित पुरुषही त्या सिंहासनाचं स्वप्न बघू शकत नव्हता, तर स्त्रीची बातचं सोडा. 

पण मायावतींनी ती अश्यक्य गोष्ट करून दाखवली. आणि एकदा नाही तर ४ वेळा मुख्यमंत्री बनल्या.

पण मायावतींचा हा प्रवास जरी वरवरून  खूप भारी वाटत असला, पण त्यांच्या या प्रवासात त्यांना कुटुंबाची हवी तशी साथ कधी मिळालीच नाही. म्हणजे मुख्यमंत्री पदावर पोहचू पर्यंत तरी. कारण विचारालं तर त्यांच्या वडिलांचं मुलींना कमी लेखन. मायावतींनी स्वतः हा किस्सा आपल्या एका मुलाखतीत सांगितलायं.

तसं मायावती या जाटव जातीच्या, म्हणजे चांभार. बिजनोरीमध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणजे आत्ताचं गाझियाबाद जिल्ह्यातलं बादलपूर. ऐंशीच्या दशकात त्या राजकारणात आल्या. साधारणत: वयाच्या चोवीस-पंचविसाव्या वर्षी त्यांचं घर काही धनिक नव्हतं. पुन्हा घरात तशी पुरुषप्रधान संस्कृती. मुलीच्या कर्तृत्वापेक्षा मुलांच्या कर्तृत्वावर वडिलांचा जास्त विश्वास. 

 घरामध्ये मुलींच्या वाट्याला येणारी मेहनतीची आणि त्रासदायक कामं त्यांना करावी लागत. उत्तर प्रदेशासारख्या आत्यंतिक जातीयवादी राज्यात एका मागासवर्गीय घरातली एक मुलगी. तिला काय स्वरूपाची स्वप्नं पडत असतील ? आणि आयुष्यात आपलं काय होईल असं तेव्हा वाटत असेल ?

अर्थातच आपल्या वडिलांची गोष्ट मायावतींना जास्त सलत असायची. त्या स्वतःच्या वडिलांचा उल्लेख करताना ‘मेरा बाप’ असा करतात; पण कांशीरामांचा उल्लेख करताना ‘मा. श्री. कांशीराम’ असा करतात. कारण त्यामागे सुद्धा एक किस्सा आहे, ज्यामुळे मायावतींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.  

तर तो असा होता जेव्हा मायावतरींनी आपल्या तुफानी भाषणानंतर दलित समाजातील लोकांना प्रेरित केले होते. पण त्या प्रत्यक्ष राजकारणात उतरल्या नव्हत्या. कॉलेजात शिकत त्या आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलायच्या.

या दरम्यान कांशीराम  नुकत्याच स्थापन केलेल्या बामसेफ या संघटनेचे प्रतिनिधी होते. बामसेफ. म्हणजेच बॅकवॉर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज इंप्लाईज फेडरेशन. काशीराम यांनी संपूर्ण देशात फिरून दलित समाजातील सरकारी कर्मचाऱ्यांना संगठीत केलं होत. आपला असाच एक दौरा संपवून ते दिल्लीला परत आले. त्यावेळी त्यांना बामसेफच्या काही कार्यकर्त्यांनी मायावतींबद्दल सांगितलं.

एका मुलीबद्दलच एवढं कौतुक ऐकून कांशीराम न राहून मायावती यांची भेट घ्यायला त्यांच्या घरी गेले. त्यावेळी मायावती वकिलीसोबतच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास देखील करत होत्या. घरी पोहचल्यानंतर कांशीराम यांनी मायावतींना प्रश्न केला. आयएएस का बनू इच्छिता?

यावर मायावतींनी उत्तर दिलं कि, दलित समाजाच्या सेवेसाठी आणि उद्धारासाठी त्यांना आयएएस व्हायचं आहे. यावर कांशीराम यांनी मायावतींना समजावलं,

याआधी सुद्धा बरेच अधिकारी झालेत, पण परिस्थिती आहे तशीच आहेत? तुम्ही नेता बनून सत्तेत या. तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो. कारण अधिकाऱ्यांना देखील सत्ताधाऱ्यांचाच ऐकावं लागत. आणि त्यापुढे काय घडलं हे आपल्या सगळ्यानाचं ठाऊक आहे. 

मुख्यमंत्री झाल्यावर मायावतींनी घरासमोरून गावात चांगला रस्ता तयार करून घेतला आणि वडिलांना थेट प्रश्नही केला कि, 

‘मुलगी ही मुलांपेक्षा कर्तृत्ववान असू शकते हे पटलं ना ?.

 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.