बाजोरियांचा अनेक वर्षांचा हिशोब चुकता करायचा म्हणणाऱ्यांनी संधी साधली.

राज्यात आज हायव्होल्टेज लढतीचा समारोप झाला. त्याच झालंय असं कि, अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला आहे. खंडेलवाल यांनी तीन वेळा आमदार असलेल्या गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभवा केला आहे. 

खंडेलवाल यांनी अचूक रणनीती आखत बाजोरिया यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. राज्यात सत्ता असूनही हातची सीट राखता न आल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोणती रणनीती तीच समजून घेऊया… 

तर महाविकास आघाडीकडून सलग तीन वेळा विधानपरिषदेवर जाणारे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया रिंगणात होते. त्यांच्या विरोधात भाजपने वसंत खंडेलवाल यांना तिकीट दिलं होत. अकोला-बुलढाणा-वाशीम या तीन जिल्ह्यात पसरलेली ही सीट मागच्या चार टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात होती. 

मात्र ही सीट शिवसेनेच्या ताब्यात असण्यामागं शिवसेनेच्या ताकदीपेक्षा गोपकिशन बाजोरिया यांचे ‘कौशल्य’ असल्याचं दिसून आलं होत. 

पक्षाचे जास्त मतदान असूनसुद्धा उमेदवार निवडून येइलचं अशी ग्यारंटी या मतदारसंघात नसते. गोपीकिशन बाजोरियांनी अल्पमतात असतानाही त्यांनी विजय खेचून आणलेत. त्यावेळी आघाडाची मते फुटली होती. 

गोपीकिशन बाजोरियांना आव्हान देणारे वसंत खंडेलवाल एके काळी बाजोरियांचे बेझनेस पार्टनर होते. सराफ व्यापारी असणाऱ्या वसंत खंडेलवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत तयार झालेलं प्रोडक्ट आहे. त्यामुळे आरएसएसचं तीन जिल्ह्यात असलेलं नेटवर्क खंडेलवाल यांच्या कामात आलं.

त्यात वसंत खंडेलवाल गडकरींच्या जवळचे मानले जातात त्यामुळे स्वतः गडकरी निवूडणुकीवर लक्ष ठेवून होते.

या मतदारसंघात आकडयांचं गणित

काँग्रेस १९१, शिवसेना १२४ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ९१ असे एकूण ४०६ मते. तर भाजपाकडे २४६ मते होती. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे ८५ तर अपक्ष १७१ असे एकूण २५६ मतदार होते. हे मतदार आपल्या विजयाचा ‘ जॅकपॉट’ बनू शकतात असा समज उमेदवारांना येताच त्यांनी या मतदारांची मनधरणी सुरू केली  

भाजपचं स्वतःचं  २४६ चा मतदान होत. म्हणजे महाविकास आघाडीला विजयासाठी फक्त ६ तर भाजपाला तब्बल १६६. पण खरा ट्विस्ट आहे जमीनीवर चाललेल्या राजकरणाचा. या मतदारसंघाचा इतिहास पाहता या  दोन कारणांमुळं बाजोरियांना ही  निवडणूक अवघड गेली. 

एकतर महाविकास आघाडीत कुरबुरी होत्या.

मतदार संघात सगळ्यात मोठा पक्ष असूनही सीट डावल्यामुळं काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते. तसेच सेनेचेच आमदार असलेल्या नितीन देशमुख आणि बाजोरिया यांच्यातही वाकडं आहे.  त्यामुळं महविकासआघाडीची मतं फुटण्याची शक्यता निर्माण झाली.

वंचित फॅक्टर डावलून चालणार नाही हेच यानिमित्ताने पुढं आलं.

मतदारसंघात वंचितची एक गठ्ठा ८६ मते महत्वाची ठरली. वंचित बहुजन आघाडीला जिल्हा परिषदेमध्ये सभापती निवडणुकीत धूळ चारल्याने प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीवर आधीच नाराज होते.  या पराभवाचा वचपा ते आता काढणार का ? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे मागच्या निवूडणुकीसारखं त्यांनी वंचितच्या सदस्यांना ‘सद्सदविवेकबुद्धीने’ मतदान करण्याचा सल्ला दिला.

पण बाजोरिया यांच्याकडे असणारी अधिक मतं आणि अल्पमतातही विजय खेचून आणण्याचा त्यांचा अनुभव यामुळं त्यांना निवूडणुक अवघड जाणार नाही अस दिसतं होत. पण घडलं काही वेगळंच. यासंबंधी बोल भिडूने अकोल्यातील राजकीय तज्ज्ञांशी संपर्क साधला असता नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांनी खालील माहिती दिली. ते म्हणले,

तीन जिल्ह्यांच्या या मतदारसंघात शिवसेनेकडे आणि सोबतच भाजपकडे जिंकून येण्यासाठी बहुमत नव्हतं. पण भाजपची जी मतदार संख्या होती ती निश्चितच शिवसेनेपेक्षा जास्त होती. पण एकत्रित बघायला गेलं तर आरामात शिवसेनेला विजय मिळवता आला असता.

दीर्घ राजकीय प्रवासात जसे तुमचे मित्र वाढतात तसे शत्रू हि वाढतात. हेच झालं बाजोरिया यांच्या बाबतीत. शत्रूंची संख्या वाढवून घेतली बाजोरियांनी. निवडणुकीपुरते पैसे फेकायचे आणि निवडून आल्यावर लोकांना टाळायचं, निधी द्यायचा नाही. त्यामुळे सगळे नाराज होते. त्यात आणि बाजोरिया यांना निवडून येण्याचा अतीचा आत्मविश्वास नडला.

बाजोरियांचा मागच्या अनेक वर्षांचा हिशोब अनेक लोकांना चुकता करायचा होता. त्यांनी मग संधी साधली.

दुसरं असं होत कि, प्रकाश आंबेडकर यांचा महत्वाचा रोल होता. आंबेडकरांनी यावेळी कोणती भूमिकाच घेतली नाही. त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना संदेश दिला कि,

यु आर फ्री टू डील विथ द कँडिडेट

त्यामुळे ज्या नेत्याकडे पैशांचं पारडं जड होत त्यांच्याकडे जाण लोकप्रतिनिधींनी पसंत केलं. आणि भाजपचं ठरलंच होत कि अभि नहीं तो कभी नहीं. त्यामुळे मग सीट निवडून आलीच.

Leave A Reply

Your email address will not be published.