बकरी ईदला बकऱ्याची कुर्बांनी देवून अल्लाह खूष होतो का ? 

कुर्बानी कुर्बांनी अल्ला को प्यारी हैं कुर्बांनी !

आज बकरीईद. मटण खाण्याचा दिवस. आजच्या दिवशी प्रचंड टोकाचा भाईचारा वाढलेला असतो. शाळेत शिकवण्यात आलेलें “हिंदू मुस्लीम भाई भाई” आज तंतोतत पाळण्यात येत असतय. भाभी भाभी म्हणतं आज अनेकजण मटणावर ताव मारतात. तर दूसरीकडे आपल्याच जगात गुंग असणारे लोकं हे चुक आहेचा नारा देण्यात व्यस्त असतात. हिंदूंच्या सणांना विरोध करता तर मग बकरी ईदला पण करा ना ! अशी भली मोठ्ठी संपादकीय पोस्ट टाकून आपल्या पाठिंब्याची वाट पाहत बसतात पण काय होतं जेव्हा मोहल्यातून बिर्याणीचा वास येवू लागतो तेव्हा भलेभले आपला विरोध थंड करतात. 

असो तर हा सामाजिक कोलाहल भारतभूमीवर अखंड राहिलच. मनामध्ये हेतू ठेवून बकरी ईदला देखील विरोध करणारे आहेतच. त्यांचा सर्वात मोठ्ठा प्रश्न हाच आहे की जिवंत प्राण्याला मारून अल्लाह खूष होतो का? भारतीय लोकशाही प्रश्न विचारायला नक्कीच विरोध नाही मात्र प्रश्न कोणत्या हेतूसाठी विचारला जातोय त्यावर चर्चा करणं हे सर्वात जास्त महत्वाच आहे. 

तर सर्वात प्रथम बकरी ईदची कथा ! 

मुस्लीम कॅलेडरचा सर्वात शेवटच्या महिन्यात बकरी ईद साजरी केली जाते. शेवटच्या महिन्याच्या दहा तारखेला बकरी ईद साजरी करण्याची प्रथा आहे. आत्ता यामागची कथा अशी की, अल्लाहचे पैंगबर असायचे. पैंगबर म्हणजे मॅसेंजर, दूत. असेच एक पैंगबर होते त्यांच नाव इब्राहिम अलैहिस्सलाम. 

तर एके दिवशी काय झाले इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या स्वप्नात अल्लाह आले. त्यांनी इब्राहिम अलैहिस्सलाम यांना सांगितल की, तूझ्या जवळच असणारी गोष्ट कुर्बान कर. इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या सर्वात जवळ होता तो त्यांचा मुलगा. आत्ता मुलाला कुर्बान करावं लागणार होतं. 

अल्लाहचा आदेश मानायलाच हवा म्हणून इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी आपल्या मुलाला सोबत घेवून कुर्बांनी देण्याचं ठरवलं. एका वाळवंटातून ते आपल्या मुलासोबत जावू लागले अशातच त्यांना रस्त्यामध्ये भेटला तो सैतान. सैतान म्हणाला, विचार कर !! तुझ्या मुलानंतर तुझी काळजी घेणारे कोणचं नसेल. तु अल्लाहचा विचार करुन आपली सर्वात लाडकी व्यक्ती कशीकाय कुर्बान करु शकतो.  इब्राहिम अलैहिस्सलाम विचारात पडले. नंतर मात्र त्यांनी ठरवलं मुलाची कुर्बांनी देताना मी मागे फिरू शकतो. पण अल्लाहचा आदेश मानायचा. मग त्यांनी काय केलं तर, आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि आपल्या मुलाच्या मानेवरुन चाकू फिरवला. त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली तेव्हा त्यांचा मुलगा इस्लाईल अलैहिस्सलाम त्यांच्या समोर तसाच उभा होता. त्यांनी ज्याच्या मानेवरुन चाकू फिरवला होता त्याच रुपांतर एका बकरीत झालं होतं” 

तर अशी हि बकरी ईदची कथा. आत्ता हि कथा खरी का खोटी असल्या चर्चेत न गेलेलं बरं त्याचं कारण प्रथा, परंपरा, लोककथा यां कधीच विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या ठरत नसतात. तर त्या खऱ्याच नाहीत म्हणून टाळता देखील येत नाहीत कारण हजारो वर्षांपासून त्या लोकांच्या जगण्याचा त्यांच्या धर्माचा अविभाज्य भाग झालेल्या असतात. यातून अल्लाह खूष होतो की नाही हे सांगता येवू शकत नाही पण कुर्बांनी देवून त्याचे तीन हिस्से करणं एक हिस्सा आपल्या नातेवाईकांना, जवळच्या लोकांना देणं, दूसरा हिस्सा गोरगरिबांना देणं आणि तिसरा हिस्सा आपल्यासाठी ठेवणं यातून तरी मोहल्याच्या बाहेरची लोकं खूष होतात एवढं नक्की. 

राहता राहिला जिवंत प्राण्याची कुर्बांनी देण्यात देवधर्म कसला तर ती चर्चा शाकाहारी आणि मांसाहारी गटात जावून केल्यास चांगले उत्तर मिळू शकेल. जसा फक्त हिंदू सणांनाचा विरोध करायचा म्हणून कट्टरतावादी संपादकिय पोस्ट लिहतात तसेच म्हसोबाला बोकड कापता, धुलवडीला बोकड कापता म्हणून दंगा करु शकतात. 

शेवटी काय तर आमची धुलवड तुमची ईद म्हणायचं आणि दाबून मटण खायचं. 

Leave A Reply

Your email address will not be published.