अपक्षाला पाठींबा नाही म्हणणाऱ्या सेनेने 2006 साली विरोधातल्या सुप्रिया सुळेंना पाठींबा दिलेला.. 

राज्याच्या राजकारणात संभाजीराजे छत्रपती राज्यसभेचे खासदार कसे होणार यावर चर्चा सुरू आहे. संभाजीराजे छत्रपतींना काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पाठींबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र काही दिवसातच ही जागा फक्त शिवसेनेकडे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते.

मात्र शिवसेनेमार्फत संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत प्रवेश करुनच उमेदवारी देण्यात येईल अशा बातम्या आल्या. त्यानंतर आजच्या दिवशी मातोश्रीवर जावून संभाजीराजे शिवबंधन बांधतील असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र संभाजीराजे मातोश्रीवर न गेल्यामुळे ह्या शक्यता संपुष्टात आल्याचं सांगण्यात येतय. 

आज सकाळी याच घडामोडींवर भाष्य करत असताना संजय राऊत म्हणाले,

की शिवसेनेला कोणत्याही स्वरुपात आपलं राज्यसभेतलं बळ वाढवायचं आहे. त्यासाठी आम्हाला एक खासदार निवडणून आणायचाच आहे. संभाजीराजेंनी सेनेत प्रवेश करावा. कोणत्याही स्वरुपात अपक्षाला पाठींबा देणार नाही… 

त्यांच्या या वाक्यातील सेना कोणत्याही स्वरुपात अपक्ष व्यक्तीला पाठींबा देणार नाही यावर समाजमाध्यमातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली.

संभाजीराजेंनी मराठा समाजाचा आपणाला पाठींबा असून मराठा समाजासाठी सर्व पक्षाने आपणाला पाठींबा द्यावा अस सांगितलेलं आहे. ज्या पक्षाने विरोधी पक्षाच्या सुप्रिया सुळेंना पाठींबा दिला तो पक्ष संभाजीमहाराजांच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय का करतोय असा प्रश्न विचारण्यात येतोय… 

2006 साली सुप्रिया सुळेंना राज्यसभेसाठी पाठींबा दिला होता. 

राज्यात राज्यसभेसाठी निवडणूका होत्या. सुप्रिया सुळे राज्यसभेच्या उमेदवार असतील अस जाहीर करण्यात आलं होतं. पण त्यांचा मार्ग खडतर नव्हता. प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप सेनेचा असणार होता. 

त्यावेळीची आठवण सांगतात शरद पवारांनी 18 नोव्हेंबर 2012 च्या महाराष्ट्र टाईम्सच्या लेखात आठवण सांगितली होती. या लेखात शरद पवार सांगतात, 

सुप्रिया राज्यसभेसाठी उभारणार आहे हे समजताच बाळासाहेबांनी मला फोन केला. बाळासाहेबांनी फोनवरच मला बरेच खडसावले. ते म्हणाले, सुप्रिया आयुष्यात पहिल्यांदा निवडणूक लढवते आहे आणि तुम्ही मला सांगितलेसुद्धा नाही. तिची निवडणूक बिनविरोधच झाली पाहीजे. 

त्यानंतर बाळासाहेबांनी युतीचा उमेदवार उभा राहू दिला नाही व सुप्रिया सुळे बिनविरोध राज्यसभेवर निवडणूक गेल्या. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.