ज्यांनी डॉक्टर हेडगेवार यांना पहिले नाही, त्यांनी बाळासाहेब देवरस यांना बघावं.

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय देवरस उर्फ बाळासाहेब देवरस यांची पुण्यतिथी.

५ जून १९७३ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांच्या मृत्यू नंतर त्यांनी स्वयंसेवकाना संबोधित करत लिहिले तीन बंद लिफाफे उघडण्यात आले. त्यातल्या पहिल्या लिफाफ्यात एक पत्र होत, ज्यात त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्यानंतर बाळासाहेब देवरस यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बनवण्यात यावे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ नेता दत्तोपंत ठेंगडी यांनी म्हणलं होत, गुरु गोळवलकर म्हणायचे,

“ज्यांनी डॉक्टर हेडगेवार यांना पहिले नाही, त्यांनी बाळासाहेब देवरस यांना बघव.”

एकदा गोळवलकर टांग्यातून जात होते आणि बाळासाहेब देवरस टांग्याला रस्ता दाखवत खालुन चालत होते. त्यांना पायी चालतांना बघून गोळवलकर म्हणाले, असली सरसंघचालक तर पायी चालतो आहे आणि नकली सरसंघचालक टांग्यात बसून जातो आहे.

बाळासाहेब देवरस व गोळवलकर यांच्यात बरेच मतभेदही होते. सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. त्यानंतर सरदार पटेल यांच्याकडून डीपी मिश्र हे सरसंघचालक यांच्याशी चर्चा करायला नागपूरला आले होते. तेव्हा गोळवलकर यांची इच्छा होती की पंडित नेहरुंना एक पत्र लिहावे. पण बाळासाहेब देवरस यांनी त्याला स्पष्ट नकार. बाळासाहेबांचा तो निर्णय गोवळकर यांनी कुठलही हरकत न घेता मान्य केला. बाळासाहेब व गोवळकर यांना एकमेकांबद्दल आदर नक्कीच होता पण दोघांचे विचार हे एका स्तरावरील नव्हते.

देशाच्या राजकारणात विद्यार्थ्यांचा पहिल्यांदा सक्रीय सहभाग बाळासाहेब देवरस यांनी १९७४ च्या गुजरात मधील नवनिर्माण आंदोलनातून घडवून आणला होता.

पुढे १९७४ मध्ये बिहार येथे झालेल्या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जो चढाओढीने सहभाग नोंदवला होता तो बाळासाहेब देवरस यांच्या शिवाय अशक्य होता. एप्रिल १९७४ मध्ये जेव्हा बाळासाहेब देवरस पटण्याला गेले होते तेव्हा विद्यार्थी आंदोलनाला गती आली होती.

तेव्हाच त्यांनी अस मत मांडल की,

संघाचा स्वयंसेवक एक जागरूक आणि संवेदनशील नागरिक आहे. तो समाजातील बदल आणि समाजातील चिंतांकडे दुर्लक्ष कसे करू शकतो. आपण विना तयारीचे आखाड्यात उतरलो आहोत. पुढे अनेक संकटे येतील. पण मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही, आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहचायचे आहे.

बाळासाहेब देवरस यांच्या सरसंघचालकांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मुस्लिमांच्या प्रवेशाचा विचार प्रतिनिधी सभेत मांडला गेला होता. पण तो फेटाळला गेला आणि बाळासाहेब देवरस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी बदलु शकले नाही.

अडवानींची रथयात्रा हा भारतीय जनता पार्टीचा निर्णय नव्हता. हा निर्णय बाळासाहेब देवरस यांच्या नेतृत्वात फार विचार करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला होता. आपल्या मृत्युच्या दोन वर्षे आधीच बाळासाहेब देवरस यांनी रज्जू भैय्या यांची सरसंघचालक म्हणून नियुक्ती केली होती.

पुढे आजारपणामुळे १७ जून १९९६ रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासातील ते एकमेव असे व्यक्ती होते जे बिहार आंदोलन, आणीबाणी, जनता पार्टीचा विजय, ऑपरेशन ब्लू-स्टार, राम जन्मभूमी आंदोलन, बाबरी मस्जिद विध्वंस या आणि अशा अनेक घटनांचे साक्षीदार राहिलेले.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.