इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचं म्हणून बाळासाहेबांनी ७० व्या वर्षी डिजिटल डिक्शनरी मागवली होती.

सार्वजनिक जीवनात सातत्याने प्रभावशाली राहणे दीर्घकाळ आपले स्थान टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हतीच… अशी किमया सेनापती बाळासाहेब ठाकरेंकडे यांनीच साधली होती.

 ते महाराष्ट्र पुरते न राहता हिंदुस्तान मधील महत्वाचे नेते झाले होते. देशाच्या राजकारणात शिवसेनेने महत्वाचं स्थान मिळवलं होतं. अर्थातच दिल्लीतले नेते देखील बाळासाहेबांच्या ओळखीतले होते. इतर राज्यातले नेते खास बाळासाहेबांची भेट घेण्याची संधी सोडत नसत. बाळासाहेबांना अनेक इतर राज्यांतल्या नेत्यांना भेटावं, बोलावं लागायचं.

 काही चर्चा, कार्यक्रमामध्ये हजेरी लावावी लागत असत. त्यांना अनेक पत्रकार मित्र होते.  त्यांची आणि शिवसेनेचा व्याप वाढतच चालला होता.  

बाळासाहेब देशाच्या राजकारणातले एक महत्वाचे नेते झाले होते. आता साहजिकच आहे कि, त्यांचे मोठं-मोठ्या वर्तमानपत्रात, मासिकांत मुलाखती यायच्या. वेळप्रसंगी त्यांना हिंदी आणि इंग्लिश मध्ये बोलण्याची वेळ येत असत. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आता इंग्रजीला पर्याय नाही. मग त्यांनी मनावरचं घेतलं…इंग्लिश पेपर वाचणे, मासिके वाचण्याची सवय लावली. असंही त्यांचा अभ्यास आणि वाचन प्रचंड होते.  

मग त्यांनी इंग्रजी बोलण्यासाठी आणि समजण्यासाठी मदत व्हावी म्हणून एक डिजिटल डिक्शनरी घेतली. या वयात म्हणजे ७० च्या वर्षी त्यांनी इंग्रजीचा अभ्यास सुरु केला. एक जबरदस्त जिद्द होती बाळासाहेब म्हणजे…..

ते आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना देखील म्हणायचे, खूप जबरदस्त डिक्शनरी आहे… तुम्हाला गरज लागली तर सांगा देतो. आजूबाजूच्या कोणाचा इंग्रजी शब्द चुकला असता त्यावेळेस ते तिथल्या तिथे त्या शब्दाचा अर्थ, उच्चार, स्पेलिंग बरोबर करायचे. कुणाला इंग्रजी शब्दाचा अर्थ काढला तर ते लागलीच  सांगायचे आणि त्यांनी सांगितलेला अर्थ अगदी तंतोतंत बरोबर निघायचा.

इंग्रजी संस्कृतील रिपार्टीज हा हजरजबाबी सवाल-जवाबांचा, वाक्चातुर्याचा प्रकार त्यांना विलक्षण आवडायचा. हा प्रकार ब्रिटिश संसदेत खूप चालायचा. चर्चिल, लिनलिथगो, ॲटली, शॉ या सर्वांच्या वाक्चातुर्याचे दाखले त्यांना आवडायचे. 

असं खुद्ध अंबरीश मिश्र यांनी त्यांच्या एका लेखात सांगितले आहे. ते सांगतात कि, त्यांच्या आणि बाळासाहेबांच्या जेंव्हा जेंव्हा भेटी होत असत. तेंव्हा तेंव्हा त्यांच्या गप्पांमध्ये अशा संवादाबद्दल बोललं जायचं. 

मराठी भाषेवर तर त्यांच्या अप्रतिम प्रभुत्व होतंच, शब्दफेकीची उत्तम जाण त्यांना रंगभूमीवरील अभिनेते इतकीच होती, शिवाय त्यांच्या भाषणात एक महत्त्वाचा भाग असायचा तो म्हणजे ऑडियन्स पार्टिसिपेशन… दसरा मेळाव्यातील किंवा इतर कोणतीही भाषा नाही का ते मध्येच विसरण्यासाठी करायचे आणि म्हणायचे कोण तो आपला… अरे काय नाव त्याचे… तोपर्यंत लोकांनीच उत्तर दिलेले असायचे. 

ही बाळासाहेबांची खासियत होती. त्यांनी माणसाच्या नाडीवर नेमके बोट ठेवलेले होते. त्यांना ती नेमकी गवसलेली होती.

त्यांची दूरदृष्टी आणि निरीक्षण शक्ती अफाट होती. गोष्टी त्यांना सहज लक्षात यायच्या. म्हणून तर शिवसेनेने सारखी संघटना तेवढा काळ सहज सांभाळू शकले, एवढेच नाही तर ती संघटना मोठी ही केली…

बाळासाहेब म्हटले की, वादविवाद आलेच असे अनेक जण म्हणतात. पण हे काही शिवसेनेच्या स्थापनेनंतर सुरू झालेले सत्र नाही. तर त्याही आधीपासून बाळासाहेब हे तसेच होते. त्यांच्या या देधडक-बेधडक वृत्तीमुळेच ते अनेकदा वादात सापडायचे…

१९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यानंतर तर बाळासाहेब अतिशय आक्रमक झाले. मग अखेरीस आक्रमकतेने त्यांच्यामागे विविध प्रकाराच्या खटल्यांचा ससेमिरा सुरू झाला. १९७० च्या जवळपास त्यांच्यावरच्या केसेस मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्या.  

बाळासाहेबांच्या  परखडपणे बोलण्याच्या सवयीमुळे आणि स्वभावामुळेच नंतर केसेस वाढत गेल्या. सभा झाल्या की रात्री उशिरा गप्पा मारताना ते आपल्या जवळच्या लोकांना म्हणायचे, “मला वाटले ते मी बोललो आता पुढचे काम तुमचे तुम्ही काय ते पाहून घ्या”. 

व्हायचं असं की बाळासाहेबांचे एखादा विधान पकडून मग कारवाई केली जायची. त्यांच्या एका वकिलांनी त्यांना एक आयडिया सुचवली कि, बाळासाहेब जेंव्हा भाषण करतील तेंव्हा जवळ एक टेपरेकॉर्डर ठेवायचं आणि नंतर कॅसेटवर भाषणाची तारीख, वार लिहून ठेवायची. म्हणजे कसं मूळ टेप काळजीपूर्वक जपून ठेवली तर ती कोर्टात कामी येईल. 

जर कोणी एखादं विधान फिरवून काही केलं किंवा अर्धवट सांगितलं तर भाषणातला मागचा-पुढचा, आजूबाजूचा संदर्भ सांगणं सोपं जाईल….

 म्हणजे काळानुसार ते बदल मान्य करत असत आणि त्या बदलांचा अवलंब स्वतःच्या आयुष्यात करत असत… 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.