बाळासाहेबांनी चॅलेंज देवून भुजबळ आणि त्यांच्या सोबत पक्ष सोडलेल्या ११ आमदारांना पाडलं होतं

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या यशस्वी कारकीर्दी नंतर त्यांच्या सत्तेला आता ग्रहण आलय. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे या ज्येष्ठ नेत्याने आमदारांचा एक गट सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांविरुद्धच बंड पुकारलय.

तसं शिवसेनेला बंड हे नवीन नाहीये. याधीही शिवसेनेत कितीतरी नेते बंड करून सेनेतून बाहेर पडलेत. शिवसेनेतलं एकनाथ शिंदे यांच्या आधी सर्वात मोठ बंड केलं होतं छगन भुजबळांनी.

भूजबळ यांनी 25 वर्ष शिवसेनेत बाळासाहेबांचे निष्ठावान सैनिक म्हणून काम केलं होतं.

माझगाव शिवसेना शाखाप्रमुख, मुंबईचे महापौर ते आमदार अशी वेगवेगळी पदं भुजबळांनी शिवसेनेत असताना भूषवली होती. 90 च्या दशकात बाबरी मशिदीचा मुद्दा जोर धरू लागला होता त्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर हिंदुत्वाचा आवाज उठवला.

पुढे जाऊन भाजप आणि शिवसेना या 2 पक्षांनी युती देखील केली. आता महाराष्ट्रात आपली सत्ता येणार असं या दोन्ही पक्षांना मांनापाससून वाटत होतं.भूजबळ आणि मनोहर जोशी दोघेही मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहू लागली होती. ‘ठाकरे विरुद्ध पवार’ असा सामना अवघ्या महाराष्ट्रात रंगला होता.विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि पवारांनी ठाकरेंना मात देत ही निवडणूक जिंकून घेत सरकार स्तहप्न केलं. 

या  निवडणुकीत शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले आणि शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. 

त्यावेळी बाळासाहेबांनी विरोध पक्षनेते पद मनोहर जोशींकडे सोपवलं. 

नेमकी इथेच बंडाची पहिली ठिणगी पडली.छगन भुजबळांना हे विरोधी पक्षनेते पद हवं होतं. ते न मिळाल्यामुळे ते दुखावले गेले होते.

1990 मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग यांनी मंडल आयोगाचा आधार घेऊन इतर मागास वर्गीयांसाठी केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये 27% आरक्षण जाहीर केलं होतं. राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी भुजबळांची मागणी होती. 

साहजिकच शिवसेना त्यांच्या या मागणीशी सहमत नव्हती.

त्यानंतर पक्षात त्यांचे सतत मतभेद होऊ लागले.  हे मतभेद वाढत जाऊन शेवटी त्याचं पर्यवसान भुजबळांनी पक्ष सोडण्यात झालं. भुजबळ 18 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. पुढे त्यातले 6 आमदार परत स्वगृही परतले.भुजबळांनी पक्ष सोडायची तर हिम्मत केली होती परंतु आता त्याच्या परिणामांना देखील त्यांना सामोरं जावं लागणार होतं. 

भुजबळांच्या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते त्यांनी भुजबळांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. 

1991 साली नागपूर विधिमंडळ अधिवेशन चालू असतानाच भुजबळांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आणि त्या अधिवेशनातच राहिलेल्या 12 आमदारांना घेऊन भुजबळांनी  कोंग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यावेळी राज्यात सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते. प्रवेशा नंतर भुजबळांना महसूलमंत्री पद देण्यात आलं. तर त्यांच्या समवेतचे डॉ. गोडे यांना राज्यमंत्री पद देण्यात आलं.

भूजबळ आणि त्यांच्या सोबतचे आमदार ४ वर्ष सत्तेत राहिले. 

त्यानंतर 1995 च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या बाळासाहेबांनी स्वत: प्रचारात भाग घेतला.

त्यावेळी बाळासाहेबांनी आई जगदंबेला साकडं घातलं होतं की

 ‘आता निवडून नाही आलो तर पुन्हा कधीच दर्शनाला येणार नाही’. 

आणि मतदारांना साद घातलेली की की ‘आत्ता तुम्ही शिवसेनेला मतं नाही दिलीत तर, आयुष्यात तुमच्या दारात परत कधी मतं मागायला येणार नाही’. 

मातदारांनी कौल दिला आणि 1995 च्या निवडणुकीत शिवसेना भाजपाच्या युती चे सरकार निवडून आलं 

 महाराष्ट्राची सत्ता पहिल्यांदा शिवसेनेच्या हाती आली या निवडणुकीत काँग्रेस हा ८० जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनला होता. मात्र यात सर्वाधिक वाताहत झाली होती भुजबळ गटाची. 

शिवसेनेतून बंड केलेल्या भुजबळांचा आणि त्यांच्या 11 सहकार्‍यांचा या निवडणुकीत बाळासाहेबांनी धुव्वा उडवला होता. 

स्वत: भुजबळांना माझगाव मधून एका नवख्या शिवसैनिकाने म्हणजे  बाळा नांदगावकरांनी मोठ्या फरकाने पाडलं.

पैठण मधून त्यावेळी उभे असलेल्या बबनराव वाघचौरे या बंडखोर आमदाराला आत्ता शिवसेनेचे पैठणचे विद्यमान आमदार असलेले आणि आत्ताच्या एकनाथ शिंदेंच्या बंडात सामील असलेले संदिपान भुमरे यांनी जोरदार लढत देऊन हरवलं होतं.

जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार हरिभाऊ आत्माराम महाजन या त्यावेळच्या बंडखोर आमदाराला  महेंद्रसिंग पाटील यांनी एरंडोल मतदारसंघातून हरवले होते. प्रदीप वडनेरे यांचा वडनेरा मतदारसंघातून ज्ञानेश्वर  धाणे यांनी पराभव केला होता. तत्कालीन शिवसैनिक परंतु सध्या राष्ट्रवादीत असलेले गुलाबराव गावंडे यांनी त्यावेळी बोरगाव मंजु या मतदार संघातून गजानन डाळू या बंडखोर आमदारचा मोठ पराभव केला होता. 

 गडचिरोलीतील आरमोरीचे हरिराम वरखेडे यांना रामकृष्ण मढवी यांनी धूळ चारली होती. सध्या राष्ट्रवादीत असलेले शाहुवाडी चे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे देखील त्या बंडखोरांपैकी एक होते त्यावेळी त्यांचा पराभव संजयसिंग गायकवाड यांनी केला होता. कृष्णराव इंगळे या बंडखोर आमदारला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणार्‍या कल्पना नरहिरे या महिला उमेदवाराने जोरदारपणे पाडले. 

आधी शिवसेना मग राष्ट्रवादी आणि मग भाजप असा राजकीय प्रवास असणार्‍या दिवंगत आमदार जगन्नाथ ढोणे यांचा अकोट मतदार संघातून रामेश्वर कराळे यांनी पराभव केला होता. कैलास पाटील या आमदाराला गंगापूर मतदारसंघातून अशोक राजाराम यांनी हरवले होते. बुलढाण्यात राजेंद्र गोडे यांचा विजय शिंदे यांनी पराभव केला होता तर ब्रम्हपुरीत राजेंद्र दोनाडकर यांचा सुरेश खानोरकरांनी पराभव केला होता. 

अशा पद्धतीने या 12 ही बंडखोर आमदारांना बाळासाहेबांनी स्वत: प्रचारात उतरून बंड करण्याची किंमत काय मोजावी लागते ते दाखवून दिले होते. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.