बाळासाहेबांच्या सुनबाई आमिर खानला घेऊन बाबरीच्या घटनेवर पिक्चर काढणार होत्या

1999 साली शिवसेनेची सत्ता गेली आणि त्यानंतर शिवसेना पक्षात अंतर्गत दोन गट दिसायला लागले होते. एक गट राज ठाकरेंना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानायचा तर दुसरा उद्धव ठाकरेंना. पण या रेसमध्ये अजून एक व्यक्ती होती.

स्मिता ठाकरे

पूर्वाश्रमीच्या स्मिता चित्रे. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्याशी 1987 साली विवाहानंतर त्या ‘मातोश्री’च्या सूनबाई झाल्या. आणि पर्यायाने ठाकरे. स्मिता ठाकरे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असत. काही कारणानिमित्त जयदेव ठाकरे यांच्याशी ओळख झाली आणि ती वाढून पुढे त्यांचं लग्न झालं.

1987 साली लग्न झालं असलं, तरी राजकीय वर्तुळात स्मिता ठाकरे यांचा वावर अजून दिसत नव्हता. असा वावर दिसायला शिवसेना-भाजप युतीचं सरकार यावं लागलं. साधारण 1996 साला पासून स्मिता ठाकरे यांचा राजकीय वर्तुळातील वावर दिसू लागला होता.

पुढे सिनेसृष्टीत त्यांचा प्रभाव वाढत गेला.

1999 सालच्या हसिना मान जाये पासून त्यांनी राहुल प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सिनेनिर्मितीत पाऊल ठेवलं होतं. 1996 ला राहुल प्रॉडक्शन्सने सपूत सिनेमाचीही निर्मिती केली होती. मात्र, तेव्हा निर्मात्यांमध्ये नाव जयदेव ठाकरे यांचं होतं. मात्र, त्यानंतर पुढील सिनेमात राहुल प्रॉडक्शनच्या निर्मात्यांच्या नावांमध्ये स्मिता ठाकरे हे नाव दिसतं.

पुढे स्मिता ठाकरे यांचा सिनेसृष्टीतील वावर आणि वजन वाढत गेलं.

त्यांनी 2011 साली अयोध्येत 1992 साली पाडण्यात आलेल्या बाबरी मशिद आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीवर चित्रपट बनविणार असल्याचं जाहीर केलं.

बिग बजेट असणाऱ्या या चित्रपटासाठी स्मिता ठाकरेंच्या मनात हिरो म्हणून होता आमिर खान. यासाठी स्मिता ठाकरेंनी आमिर खानला विचारणा केली. मात्र, आमिर खान आपले वेळापत्रक व्यस्त असल्याचे सांगत चित्रपटात काम करण्यास नकार दर्शविला.

पण त्याने या चित्रपटाची पटकथा लिहिताना मदत करणार असल्याचं वाचन स्मिता ठाकरे यांना दिलं.

मग आमिरनंतर कोणाला मुख्य भूमिका द्यावी यातून भूमिकेसाठी अजय देवगणच्या नावाचा विचार झाला. पण पुढं काय झालं याची कोणालाच कल्पना नाही.

त्यावेळी स्मिता ठाकरे या वादग्रस्त विषयावर चित्रपट बनवणार म्हणून वादंग माजला होता.

बाबरी मशीदीच्या प्रकरणात अनेक नेत्यांवर आरोप असून, या विषयाला त्या कितपत न्याय देतील यावर प्रश्न उठविण्यात आले. त्यावर स्मिता ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्या म्हंटल्या,

मी या विषयावर गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट बनविण्याचा विचार करीत होते. या प्रकरणावर मोठे राजकारण झाले असून, मला त्यावर चित्रपट बनविण्याची उत्सुकता आहे. विचार केल्यानंतर मी हा चित्रपट बनविण्याचे ठरविले आहे. या चित्रपटामुळे वाद निर्माण न होणे याकडे माझे लक्ष असेल.

पण आज 11 वर्ष झाले. त्या चित्रपटाकडे डोळे लावून बसलो होतो, खरं चित्रपट काय आलाच नाही.

हे ही वाच भिडू:

 

English Summary: Balasaheb Thackeray’s daughter-in-law, Smita Thackeray was about to make a film on Babri. this film was supposed to have Aamir Khan in the lead. At least that is what Smita wanted.
However, owing to Khan’s prior engagements, he has declined the same but not before helping her with the finer nuances of the script. The filmmaker now has Ajay Devgn in mind for the role.

web title: Balasaheb Thackeray’s daughter in law smita Thackeray was going to make a picture on Babri riots with Aamir khan

Leave A Reply

Your email address will not be published.