बाळासाहेब म्हणाले होते ‘मार्मिक खपलं नाहीतरी चालेल राशिभविष्य छापायचं नाही’

१९ जून १९६६ साली सुरु झालेल शिवसेना नावाचं वादळ पुढील अनेक दशकं महाराष्ट्रात घोंगावत राहील अस कोणालाच वाटले नव्हते. पण ज्यामुळे शिवसेनेची स्थापना झाली त्या मार्मिकच्या वैचारिक धोरणाबाबत बाळासाहेबांनी कधीच तडजोड केली नाही, त्याचाच हा किस्सा.

मुळात मार्मिक साप्ताहिक बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे बंधूनी १९६० सालीच सुरु केल. नेमकं पुढे काय होणार आहे याची ठाकरे बांधूनाच काय तर प्रबोधनकार ठाकरेनाही कल्पना नव्हती.

बाळासाहेबांवर प्रबोधनकारांचा जबरदस्त प्रभाव होता. प्रबोधनकारांचे व्यक्तिमत्व हि तितकेच झंझावाती होते. पत्रकारिता, चित्रकला आणि वक्तृत्व या तीनही कला प्रबोधनकारांकडूनच त्यांच्यात आल्या होत्या. प्रबोधनकार हे आपल्या घणाघाती वक्तृत्वासाठी प्रसिद्ध होते.

त्याकाळी संयुक्त महाराष्ट्राच्या बैठका  प्रबोधनकारांच्या घरी होत. मराठी माणसावर होत असलेला अन्याय, त्यामुळे लोकांमध्ये तयार होणारा संताप हे सर्व बाळासाहेब बघत होते. प्रबोधनकारांच्या सहवासानं अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचे संस्कार बाळासाहेबांच्या मनावर झाले .

बाळासाहेब त्याकाळी फ्री प्रेस मध्ये नोकरीला होते. तेथील वातावरण दक्षिणात्य होते. बाहेर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु होती .त्या सर्व वातावरणात बाळासाहेबांचा ब्रश अनेकांचा यथोचित समाचार घ्यायचा. अनेकांना ते पटायचे नाही. मालकाचीही व्यंगचित्रांवर करडी नजर असायची. त्यामुळे अनेकदा संपादक आणि बाळासाहेब यांच्यामध्ये खटके उडायचे. ‘अमक्या तमक्या नेत्याची खिल्ली उडवू नका, असं त्यांना सक्त सांगण्यात येई. एकदा हे भांडण टोकाला गेले आणि बाळासाहेबांनी ‘ फ्री प्रेस’ मध्ये परत न जाण्याचा  निर्णय घेतला.

त्यानंतर दोनच महिन्यात मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाची त्यांनी सुरवात केली. “मार्मिक” मधून दाक्षिणात्यांच्या विरोधात धुमधडाक्यात प्रचार सुरु केला. मार्मिकनं दक्षिण भारतीयांच्या विरोधात सुरु केलेल्या या मोहिमेतच शिवसेनेच्या स्थापनेची बिजं होती.

श्रमिक मराठी वाचकांचा शीण दूर व्हावा आणि त्याला एक रिलीफ मिळावा या मर्यादित दृष्टीकोनातून मार्मिकची सुरवात केली होती. मी पोट भरण्यासाठी मार्मिक सुरु करतोय!! असं बाळासाहेबांनी एका लेखात सांगूनच टाकले होते.

मार्मिकच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन  यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते अगदी वाजत गाजत झालं. अल्पावधीतच मुंबईतल्या मराठी माणसाच्या हातात मार्मिक दिसू लागलं. मार्मिक वाचून मराठी माणसाला आनंद मिळत होता पण त्यामुळे त्याचे भौतीक पातळीवरील प्रश्न सुटणार नव्हते.

पुढं मार्मिकच्या निमित्ताने शिवसेना स्थापन झाली. सेनेच काम वाढत होत. अशातच बाळासाहेबांची भेट ह. मो. मराठे या लोकप्रभेच्या संपादकांशी झाली. त्यावेळी मराठेंनी लोकप्रभेच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. पण त्यांनी संपादकपदी असताना लोकप्रभा या साप्ताहिकाचा चेहरामोहरा बदलून त्याचा खप वाढवला होता. आणि हे बाळासाहेबांच्या चांगलंच लक्षात होत.

पहिल्या भेटीतच त्यांनी मराठेंना मार्मिक मध्ये येण्याची ऑफर केली. बाळासाहेब म्हणाले,

आता तुम्ही माझं मार्मिक हाती घ्या, लोकप्रभेच स्वरूप बदलून तुम्ही त्याचा सेल वाढवून दिला, तस मार्मिकच करा.

मराठे त्यावेळी घरदार या मासिकाच्या संपादकपदी असल्यानं त्यांनी नकार दिला. आणि बाळासाहेबांनी ही आग्रह धरला नाही. पण पुढं ९१ सालात मराठे मार्मिकचे कार्यकारी संपादक म्हणून काम बघू लागले.

मार्मिकच ऑफिस त्यावेळी शिवसेना भवनात होतं. मराठे तिथेच बसून त्यांचे संपादकीय काम करायचे. मराठे बाळासाहेबांच्या मार्मिक साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक म्हणून दाखल झाले. स्वरूप बदलून सेल वाढवणं या अवघ्या चार शब्दात त्यांचं संपादकीय धोरण ठरलं. नव स्वरूप कसे असेल याची कल्पना यावी यासाठी मराठेंनी एकदा डमी अंक तयार केला.

विषय कशा प्रकारचे असतील, सजावट कशी असेल, सदर कोणती असतील अशा गोष्टी डमी अंकात दाखवण्यात आल्या होत्या. त्यात साप्ताहिक राशिभविष्य हेही सदर होतं. बाळासाहेबांनी डमी चाळून बघितली. राशी-भविष्याचा सदर बघताच ते म्हणाले,

नको मार्मिक मध्ये राशी-भविष्याचा सदर आम्ही कधीही छापलं नाही. नव्या स्वरूपातही मार्मिक मध्ये राशिभविष्य नको. एक वेळ खप झाला नाही तरी चालेल.

प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांना छेद देणार काम मार्मिक मध्ये त्यावेळीही बाळासाहेबांनी करू दिलं नाही. त्यानंतर वेळ गेला. सामना सुरू झालं. आणि आताच्या सामनामध्ये राशिभविष्य येत.

Leave A Reply

Your email address will not be published.