विखेंनी हजारो शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि पंतप्रधानांच्याकडून भाव वाढवून घेतला

राजकारण म्हंटल कि, नेतेमंडळींचे एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरूच असतात. म्हणजे असं म्हणायला काय हरकत नाही कि, राजकारणात आपण नेतेमंडळींना त्यांच्या कामापेक्षा कमी भांडतानाच जास्त पाहतो. पण आपण काही वर्ष मागे डोकावलं तर काही जुनी नेतेमंडळी याला अपवाद ठरतील. 

यातलचं एक नाव म्हणजे बाळासाहेब विखे पाटील. ज्यांच्या कामाची दखल गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेतली गेलीये. पण सोबतच विरोधकांना सुद्धा सोबत घेऊन काम फत्ते करण्याच्या त्यांच्या कलेची आजही वाह वाह केली जाते. या संदर्भातलाच एक किस्सा. 

तर तो काळ होता ८० च्या दशकातला. डॉ. वाय. के. अलघ अॅग्रिकल्चरल प्राईस कमिशनचे  अध्यक्ष होते. ज्यामुळे सहकारातील अनेक सहकाऱ्यांसोबत त्यांची ऊठ-बस असायची. उसाच्या भावाबाबत सगळी मंडळी  डॉ.अलघांना भेटायला यायची. त्यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील शिष्टमंडळाचे नेते होते. 

याच दरम्यान, अलघ यांची भेट झाली बाळासाहेब विखे पाटलांशी. त्यावेळी बाळासाहेब तरुण रक्त होते. आपल्या सध्या सरळ भाषेसाठी  ते ओळखले जायचे. उसाच्या भावाबाबत बोलणाऱ्यांमध्ये त्यांचंही नाव यायचं. पण विखे केवळ उसाच्या भावाबाबत बोलत नसायचे, तर शेतकरी आणि शेतमजुरांच्या सामाजिक शोषणापासून ते सुरुवात करायचे. ग्रामीण संस्थांतील त्रुटींबाबतही त्यांना आस्था होती. 

एकदा बाळासाहेबांनी डॉ.अलघांना लोणीला बोलावलं होते. त्यांनी लोणीच्या पाटबंधारे खात्याच्या डाक बंगल्यात डॉक्टरांच्या कुटुंबाची चांगली सोया ठेवली होती. डॉ.अलघ म्हणतात कि, लोणी माझ्यासाठी एक पाठशाळाच आहे. या भेटी दरम्यानच अलघांचे आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध निर्माण झाले.

त्यांनतर राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा डॉक्टर अलघ यांना पुन्हा एकदा शिर्डीला जाण्याचा योग आला. त्यांना त्यावेळी काहीसं वेगळ चित्र पहायला मिळालं. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळचे  सह कारातील नेते आपसात भांडत असले तरी फायद्यासाठी कसं एकत्र यायचं हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं.  

म्हणजे झालं काय तर डॉक्टर अलघ शिर्डीला गेल्याच्या रात्री मोठा कार्यक्रम आयोजितआला होता. हजारो शेतकरी तिथं जमा झाले होते. बाळासाहेब विखे यांनीचं या शेतकऱ्यांना गोळा केलं होतं. या गर्दीत बाळासाहेबांचे विरोधक सुद्धा होते. जेवणाचा चांगलाचं बेत होता. सगळेजण जेवनावर ताव मारत उसाच्या भावाबाबत बोलत होते.

डॉक्टर  अलघ त्यावेळी एग्रीकल्चर प्राईज कमिटीचे अध्यक्ष असल्याकारणाने त्यांना  शेतकऱ्यांच्या सुरात सूर मिसळणं भाग होतं. त्यांनी तो मिसळला सुद्धा पण एकचं मागणी झाली. ‘ भावाबाबत आताच काय ते बोला’

यावर डॉक्टर अलघ  म्हणाले, ‘आत्ताचं कसं सांगू शकेल, मी फक्त शिफारस करू शकतो. पण हा पंतप्रधानांचा निर्णय असेल. मी जे सांगतो, ते अर्थखाते मानत नाही’. 

शेतकऱ्यांच्या मागणीवरून डॉक्टर अलघ यांनी तशी शिफारस करण्याचं मान्य केलं. डॉक्टर अलघ शेतकऱ्यांना म्हणाले की, पंतप्रधान राजीव गांधी सध्या अमेरिकेत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपण फोनवरचं बोलू शकतो त्यामुळे तुमची ही मागणी तुम्ही स्वतः बोला. 

 डॉक्टर अलघ असं म्हटल्यावर लोक म्हणाले, ‘तुम्हीच बोला’. यावर डॉक्टरांनी पंतप्रधानांचे सचिव गोपी अरोरा यांना फोन केला. त्यांना सांगितले,

‘गोपी, मी आता शिर्डीत आहे. येथे आता दहा हजार शेतकरी एकत्र आले आहेत. राजीव गांधीना शेतकऱ्यांचे भावाबाबतचे मत कळवा. गळित हंगाम आता चालू आहे. भाव जाहीर झाले तर फरक पडेल.’

एवढे बोलून डॉक्टरांनी फोन ठेवला. दोन तासानंतर अरोरा यांचा फोन आला. पंतप्रधान म्हणतात, ‘योगेंद्र भावाबाबत जे म्हणतात, त्यास मान्यता देऊ.’ तेव्हा  डॉक्टरांनी जाहीर केले की, पंतप्रधानांनी प्रस्ताव मान्य केला आहे.

आता शेतकऱ्यांच्या एकत्र मागणीमुळे हा प्रस्ताव मान्य झाला खरा पण या शेतकऱ्यांना एकत्र आणण्यामागे बाळासाहेब विखे पाटलांचा हात होता.  पक्ष जरी वेगवेगळे असले पण मागणी एक असली तर एकत्र येऊन प्रश्न लवकर सुटतात असं त्यांचं म्हणणं होत.

आपल्या एकीच्या गुणधर्माची प्रचीती बाळासाहेबांनी दाखवून दिली होती.  हा गुणधर्म आजचा नेत्यांमध्ये फार क्वचित पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांच्या एका पुस्तकात त्यांना मुलखावेगळा माणूस असं म्हटलं गेलयं.

हे ही वाचं भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.