बाळासाहेबांच्या नातीनं मुस्लीम मुलासोबत लग्न केलं : पाकिस्तानातून उठलेली अफवा

बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांच्या सून स्मिता ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोन्ही भेटींमुळे उद्धव ठाकरें यांना कुटूंबातून विरोध असल्याचं स्पष्ट झालं. पण ही काही पहिली गोष्ट नाही.

जयदेव ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरून सुरू असणारा वाद यापूर्वीच न्यायालयात गेला आहे. कधीकाळी शिवसेनेचं नेतृत्व आपल्या हाती घेतील अशी शंका असणाऱ्या स्मिता ठाकरे राजकारणाच्या पटालवरून पुर्णपणे गायब आहेत. त्यामुळे ठाकरे कुटूंबात सर्वकाही ठिक आहे हे तर जगजाहीरच आहे. 

पण आपला विषय याहून वेगळा आहे.

विषय आहे बाळासाहेबांच्या नातीच्या लग्नाचा.

मात्र विषय समजून घेण्यापूर्वी वंशावळ पाहणं गरजेचं आहे. बाळासाहेब ठाकरेंना तीन मुलं. बिंदूमाधव अर्थात बिंदा, जयदेव आणि उद्धव. पैकी बिंदूमाधव यांना निहार व नेहा ही दोन मुलं. 1996 साली बिंदूमाधव यांच कार अपघातात निधन झालं. जयदेव यांच्या तीन पत्नी. जयश्री, स्मिता आणि अनुराधा. तर पत्नी जयश्री यांच्यापासून त्यांना जयदीप, पत्नी स्मिता यांच्यापासून राहूल आणि ऐश्वर्य तर पत्नी अनुराधा यांच्यापासून माधुरी ही मुलगी आहे. तर उद्धव ठाकरेंना आदित्य व तेजस ही दोन मुलं. 

बाळासाहेबांचा सर्वात थोरला मुलगा बिंदुमाधव यांची दोन मुलं म्हणजे निहार आणि नेहा. निहार ठाकरे यांची स्वत:ची लॉ फर्म आहे. ते मुंबईत राहतात तर हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांच्याशी त्यांच लग्न झालेलं आहे. निहार यांची बहिण नेहा. 

नेहा ठाकरे यांच्या लग्नावेळीच त्यांनी मुस्लीम युवकासोबत लग्न केलं असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. नेहा बिंदुमाधव यांची मुलगी, त्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंच्या नातीने मुस्लीम तरुणासोबत लग्न केल्याची अफवा पसरली होती..

पण ही अफवा कशी पसरली होती तर याबद्दल हिंदूह्रदयसम्राट हाऊ द शिवसेना चेन्ज्ड मुंबई फॉरएवर या पुस्तकात लेखिका सुजाता आनंदन यांनी विस्ताराने सांगितलेलं आहे. त्या सांगतात की, 

बाळासाहेब ठाकरेंना पाकिस्तान कट्टर विरोधक म्हणून पाहिले जातं. बाळासाहेबांची हिंदूत्ववादी भूमिका, सातत्याने पाकीस्तान विरोधातले त्यांचे स्टेटमेंट व भारत पाक क्रिकेट सामन्यांना होणारा त्यांचा विरोध यांमुळे पाकीस्तानतल्या लहान मुलांना देखील बाळासाहेब कोण आहेत ते माहित होतं. 

पाकीस्तान डुटे या वर्तमानपत्रात 9 डिसेंबर 2011 साली ही बातमी छापून आली होती.

Screenshot 2022 07 30 at 6.46.55 PM

या बातमीत मोहम्मद नाबी या मुलासोबत नेहा ठाकरे ( बातमीत हे नाव गुप्ता असं लिहण्यात आलं होतं) यांनी लग्न केल्याचं सांगण्यात आलं होतं. या बातमीमुळे सर्वत्र अफवा पसरली की बाळासाहेबांच्या नातीने मुस्लीम युवकासोबत लग्न केलं आहे.

इतक्यावर न थांबता बातमीमध्ये लग्न कसं झालं, कुठे झालं, लग्नाला कोण-कोण उपस्थित होतं हे देखील सांगण्यात आलं. 

पण या बातमी काही तथ्य होतं का तर नाही..

कारण ही बातमी पाकिस्तानमध्येच चर्चेत होती, त्यानंतर भारतात ती पसरवण्यात आली. वास्तविक नेहा यांच लग्न गुजराती  व्यक्ती मनन ठक्कर यांच्यासोबत झालं होतं. मनन ठक्कर हे सुप्रसिद्ध डॉक्टर आहे तर त्यांचे वडिल निपुभाई ठक्कर हे मुंबईचे प्रसिद्ध बिल्डर आहेत. हे लग्न ४ डिसेंबर २०११ साली हॉटेल ताज लॅण्ड्स मध्ये झालं होतं.

बाळासाहेबांचा या लग्नाला विरोध असण्याचं कारण देखील नव्हतं, खाली दिलेल्या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे या लग्नाला उपस्थित असलेले दिसतात.

Screenshot 2022 07 30 at 6.54.48 PM

इतकच नाही तर बाळासाहेब यांच्यासोबत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, निहार ठाकरे, नेहा ठाकरे देखील आहेत. 

 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.