जिन्नांचा पुतळा पाडणारी संघटना २० वर्षांपासूनचं पाकिस्तानला टार्गेट करतेय

पाकिस्तानात रविवारी बॉम्बहल्ले करण्यात आले. या दरम्यान पाकमधल्या ग्वादर शहरातल्या पाकिस्तानच्या संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा पुतळा देखील बॉम्ब हल्ल्यात नष्ट करण्यात आला. पाकिस्तानच्या एका वृत्तसंस्थेने सांगितले की,  सुरक्षित क्षेत्र समजल्या जाणाऱ्या ग्वादरच्या मरीन ड्राइव्हवर जूनमध्ये लावण्यात आलेला पुतळा रविवारी सकाळी बलुच बंडखोरांनी स्फोटकांसह उडवला. या स्फोटात पुतळा पूर्णपणे नष्ट झालीये. संबंधीत हल्लेखोर हे पर्यटक म्हणून आले होते.

Jinnah statue

या हल्ल्याची जबाबदारी प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने स्वीकारलीये. बलूच रिपब्लिकन आर्मीचे प्रवक्ते बब्गर बलूच यांनी ट्विटरवर स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या बॉंम्ब हल्ल्याप्रकरणी ग्वादरचे उपायुक्त मेजर (निवृत्त) अब्दुल कबीर खान यांनी सांगितले की, या प्रकरणाची उच्च स्तरावर चौकशी केली जात आहे.

दरम्यान, याआधीही  २०१३ मध्ये बलूच बंडखोरांनी जिरायतमध्ये जिना यांची १२१ वर्ष जुनी इमारत उडवली होती. स्फोटामुळे या इमारतीत प्रचंड आग लागली, ही इमारत सुमारे चार तास जळत होती. क्षयरोगाने ग्रस्त झाल्यामुळे जिना यांनी त्यांच्या आयुष्याचे शेवटचे दिवस तिथे घालवले. नंतर हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

तसं पाहिलं तर, बलुचिस्तान प्रांत क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाकिस्तानमधला सर्वात मोठा भाग आहे, पण  एकूण लोकसंख्येच्या ९ टक्केचं जातीय बलुच आहेत. बलुच बंडखोर गेल्या अनेक दशकांपासून बलुचिस्तानमध्ये सक्रिय आहेत. ते आप-आपसातचं विभागले गेलेत आणि पश्तूनांशी त्यांची स्पर्धा कायम आहे. एवढेच नाही तर हे बलुच पाकिस्तानच्या राजकारणाशी आणि सत्तेवर कब्जा केलेल्या पंजाबी लोकांशीही लढत आहेत.

बलुच विद्रोहींना बलुचिस्तानमधील चिनी प्रकल्पांना कडाडून विरोध आहे आणि म्हणूनच ते पाकिस्तानी सुरक्षा दल आणि चिनी नागरिकांना लक्ष्य करतायेत.

पाकिस्तानात मानवी हक्कांचे उल्लंघन, दडपशाही आणि हिंसाचाराच्या झालेल्या उठावात एक अलगाववादी संघटना बांधली गेली आहे, ती म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA). 

त्यांचा मुख्य अजेंडा म्हणजे स्वतंत्र बलुचिस्तान. तो सुद्धा संपूर्ण ग्रेटर बलुचिस्तान. जो तीन वेगवगेळ्या देशात विभागला गेलाय.  हे विद्रोही अफगाणिस्तानात सुद्धा सक्रिय आहेत.

२००५ मध्ये या अतिरेक्यांनी तत्कालीन परवेज मुशर्रफ यांना मारण्याचा प्लॅन आखला होता. तो यशस्वी झाला नाही, पण यामुळे ते सरकारच्या निशाण्यावर आले. आणि पाकिस्तानात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर प्रतिबंध लावण्यात आले.

यानंतरही या अतिरेक्यांनी अनेक हल्ले केले.  यात बलुचिस्तानात जिन्नांचे घर जून २०१३ मध्ये रॉकेटने उडवून टाकले. चीनविरुद्ध आपला  राग व्यक्त करण्यासाठी २०१८ मध्ये कराची येथील चीनी वाणिज्य दूतावास आणि २०१९ ग्वादर येथील पर्ल हॉटेलवर सुद्धा या बलूच विद्रोह्यांनी हल्ला केला . त्यांनतर २०२० च्या जून महिन्यातचं कराचीच्या स्टॉक एक्स्चेंजलाही हादरवून ठेवले.  

गेली २० वर्षे सक्रिय असलेल्या या संघटनेने आतापर्यंत डझनभर हल्ले केले आहेत. पाकिस्तानसोबतचं अमेरिका, यूके आणि युरोपियन युनियनने BLA ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

हे ही वाचं  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.