महाराष्ट्रात पत्रकारितेचा पाया रचणाऱ्या बाळशास्त्रींनी धर्मांतराला पहिली वाचा फोडली होती.

६ जानेवारी १९३२ साली मराठी भाषेतलं पाहिलं वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरु झालं. जे सुरु केलं आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी. समाजप्रबोधनाच्या हेतूने दर्पण सुरु करण्यात आलेलं. हे वृत्तपत्र तसं मराठी भाषेतलं पण ब्रिटिश राज्यकर्त्यांना आपलं म्हणणं कळावं म्हणून त्यावेळी दर्पणचा एक कॉलम मराठीत असायचा तर एक इंग्रजीत. स्वातंत्रलढ्याच्या काळात वैचारिक क्रांतीचे हे वृत्तपत्र महत्वाचे साधन बनले. त्यामुळे स्वतंत्रलढ्यातही याची महत्वाची भूमिका होती, असं म्हणायला काही हरकत नाही.   

बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या दर्पण वृत्तपत्राची सुरुवात आपल्या वाढदिवसादिवशीच केली. त्यामुळे ६ जानेवारी हा दिवस अख्ख्या महाराष्ट्रात “मराठी पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो.

जांभेकर मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावचे. वडील गंगाधरशास्त्री यांच्या मार्गदर्शनातचं त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढे ते मुंबईला आले जिथे त्यांनी सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ यांच्याकडे इंग्रजी आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे संस्कृत शिकले. यासोबतच गणित आणि शास्त्र आणि ग्रीक, लॅटिन, फ्रेंच या फॉरेन लँग्वेजचे धडे सुद्धा घेतले. 

त्यामुळंच त्यांना पहिल्या आंग्लशिक्षित पिढीतील अग्रगण्य विद्वान असंही म्हंटल जात. 

बाळशास्त्रींची जडणघडण पाहता कमी वयात गरीब कुटुंबातून, खडतर परिस्थितीतून त्यांनी अत्यंत महान कार्य केलं. पहिलं मराठी वृत्तपत्र सुरु करण्यासोबतच जांभेकरांनी दिग्दर्शन  हे मराठीतील पहिलं मासिक सुद्धा सुरु केलं. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या कार्यात भाग घेणारे ते पहिले एतद्देशीय विद्वान होते.  यासोबतच जांभेकर हे अव्वल दर्जाचे धर्मचिंतक सुद्धा होते. धर्मांतराला पहिली वाचा बाळशास्त्रींनी फोडली होती.

शेषाद्री प्रकरणात बाळशास्त्रींनी कर्मठ लोकांचा विरोध पत्करुन ख्रिस्ती धर्मात गेलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेतलं. एवढंच नाही तर ख्रिश्चन धर्मीय असेल्या कुटुंबासोबत राहिला म्हणून काही सनातनांनी एका मुलाला सुद्धा वाळीत टाकलं होत. त्याला हिंदू म्हणून मान्यता देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला. पण बाळशास्त्री जांभेकरांनी त्या तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास जुमानता त्या मुलाला त्यांनी शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. 

पण धर्मांतराचं सत्र सुरूच होत. यामागचं कारण म्हणजे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे अनेक ग्रंथ भारतात येत होते. ज्याचा परिणाम लोकांवर होत होता. ही गोष्ट लक्षात आल्यावर जांभेकरांनी विचारांचा विरोध विचारांनीच केला पाहिजे, हे धोरण त्यांनी स्वीकारलं आणि १८४५ साली बाळशास्त्रींनी ‘ज्ञानेश्वरी’ची पहिली शिळा प्रत प्रकाशीत केली. 

महाराष्ट्राची तिथून पुढची वाटचाल ही बाळशास्त्रींनी घालून दिलेल्या मार्गावरचं झाली. पण नाही म्हंटल तरी बाळशास्त्रींचे काम दुर्लक्षित राहिलं.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.