शुगर डेटिंग ऍप्सवर बंदी, आता म्हाताऱ्या खोडांचं कस होणार?

साधारण चार पाच दिवसांपूर्वी एक बातमी आली होती. खास वृद्ध आणि पैशावाल्या आणि ऑनलाईन डेटिंग करणाऱ्या लोकांसाठीची ही बातमी. 

त्याच झालंय असं की, गुगलने आपल्या प्ले स्टोअर वरुन डेटिंग ऍप्स काढून टाकायला सुरुवात केलीय. यात शुगर डेटिंग ऍप्सवर खास करून बॅन आणलाय. यावर बॅन आणण्याची घोषणा २९ जुनलाच केली होती. गुगलच म्हणणं आहे की, आम्हाला आता आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सेक्श्युअल कंटेंटशी निगडित असं कोणतंच ऍप नकोय. त्याचबरोबर ऍपस्टोअरने म्हंटलंय की, आता ज्या ऍप्सचा वापर सेक्स आणि सेक्सशी निगडित पैसे कमावण्यासाठी केला जातोय ते ऍप्स आम्ही बॅन करतोय.

आता त्यांनी का बॅन केलं ते समजलं, पण मग हे शुगर डॅडी असतं तरी काय?

‘शुगर डॅडी’ ही इंग्रजी भाषेतील संज्ञा, व्याख्या आहे असं म्हणू शकताय. ज्याचा अर्थ श्रीमंत म्हातारा माणूस असतो. ज्याच्या डोक्यावरचे केस पांढरे असतात. पण त्याच्याकडे प्रचंड पैसा असतो. जो म्हातारा तरुण मुलींना प्रेमात पडून त्यांना महागड्या भेटवस्तू आणि बरेच पैसे देतो. पण मग यात फक्त म्हातारेच असतात असं नाही बरं..यात चाळीशी पन्नाशीतले पुरुष पण असतात. कधीकधी तर तरुणपणातच पांढरे केस झालेल्या मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंड्स शुगर डॅडी म्हणतात.

हा शुगर डॅडी शब्द खरं तर अमेरिकनांची देणं आहे. 

१९ व्या शतकाच्या मध्यापासून ‘शुगर’ हा पैसा आणि लक्झरीसाठी वापरला गेलेला शब्द आहे.  डॅडी’ हा शब्द १६ व्या शतकापासून वयोवृद्ध व्यक्तीसाठी वेश्यांमध्ये वापरलेला अपशब्द होता. थोडक्यात डॅडी दोघांमधील वयातील फरकाचा संदर्भ देतो.

“शुगर डॅडी” हा शब्द १९ व्या शतकाच्या सुरूवातीपासून वापरला जात आहे. जेव्हा स्प्रेकेलच्या फॉर्च्यूनचा वारस अडॉल्फ स्प्रेकल्सने त्याच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असलेल्या एका महिलेशी लग्न केले त्यावेळी त्याला “शुगर डॅडी” म्हटले. म्हणजे त्याची खरं तर शुगरची कंपनी होती. त्याची बायको त्याला मोठा असल्यानं लाडानं शुगर डॅडी म्हणायची.

पण, हा शब्द रेकॉर्डवर आला १९२३ मध्ये. सिरॅक्यूज हेराल्डच्या एका एपिसोडमध्ये फॅट ऍन फॉर्च्युन मध्ये या शब्दाचा वापर झाला. 

मग जग जसजसं पुढं जाऊ लागलं तसे हे डेटिंगचे ऍप्स सुद्धा आले. म्हणजे कसंय ना, तरुण पोरांना पोरी लगेच पटतात, पण मग अशा डॅडी लोकांना कशा पटणार पोरी ? म्हणून हे ऍप्स आले ज्यात, माणसं बी खुश न बाया बी खुश !

हे ऍप्स करतात काय? 

या ऍप थ्रू महिला म्हाताऱ्या, मध्यमवयीन पुरुषांना डेट करतात. त्या पैशांच्या मोबदल्यात त्या पुरुषांचा  एकटेपणा दूर करतात. यात बरेच ऍप्स आहेत. यातलीच एक ‘शुगर डॅडी फॉर मी’ डेटिंग वेबसाइट श्रीमंत वृद्ध लोकांच्या मनोरंजनासाठी एक बेस्ट प्लॅटफॉर्म मानली जात होती. ही वेबसाइट वृद्ध पुरुषांना पैसे खर्च करणार्‍या तरुण, सुंदर मुलींना डेट करण्याची संधी देत होती. या वेबसाईटची लोकप्रियता गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली. त्याचे सुमारे साडेचार कोटी युजर्स आहेत.

दर वर्षी या साइटवरील २० महिला लक्झरी लाईफ तर मिळवतातच पण यासह सुमारे ६० हजार डॉलर्सची कमाई करतात. ज्या महिला डेट करतात त्यांना समाज त्यांना वेश्या म्हणतो, पण तत्वतः ते खरं म्हणता यायचं नाही. 

वेश्याव्यवसाय आणि श्रीमंत लोकांना पैशासाठी डेट करण्यामध्ये मोठा फरक आहे. अगदी त्यांच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवणे. यावर मर्यादा असतात. इथं तुम्हाला अशा मुलींबद्दल सांगत आहोत ज्या शुगर डॅडी वेबसाइटवर काम करून लाखो रुपये कमवतात. म्हणजे त्या चॅट्सवर, फोन कॉल्स वर बोलतात. कधीकधी त्या नो स्ट्रिंग्स अटॅचवाल प्रेम करतात.

पण आता हे वाचून तुम्हाला डेटिंग करायला मिळणार आहे असं काय नाही बरं. म्हणजे कुठं ऑप्शन असेल तर बघा बुवा..आम्ही फक्त माहिती सांगायचं काम केलंय.

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.