बांग्लादेशी पंतप्रधान म्हणतायत आमच्या हिंदूंवर हल्ले होतायत, भारताने जरा शिस्तीत वागावं.

एखाद्या गोष्ट घडली कि त्याचे पडसाद दुसरी घटना घडून उमटतात हा निसर्गाचा एक साधा नियम आहे. आणि अशाच घटना भारतात घडतायत, ज्याचा सामना बांगलादेशी हिंदूंना करावा लागतोय. आणि असं आम्ही नाही तर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणतायत. आणि हे बोलतानाच त्यांनी इन्डायरेक्ट्ली भारताला इशारा दिलाय की, जरा शिस्तीत वागा.

आधी समजून घ्या कि प्रकरण नक्की काय आहे, शेख हसीना असं का म्हणतायत ?  

बांग्ला देशाच्या कोमिला जिल्ह्यात दुर्गा पूजेच्या कार्यक्रमात तोडफोड आणि हिंदू मंदिरांवर हल्ला झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. इंडिया टुडे मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कोमीला भागात कुराण या मुस्लिम धर्मग्रंथाचा अपमान झाल्याची अफवा पसरली होती.

सोशल मीडियावर त्याविषयी चर्चा सुरू होत्या. त्या फॉर्वर्डेड मॅसेज मध्ये असं सांगण्यात येत होत की, दुर्गापूजेसाठी उभारण्यात आलेल्या पंडालमध्ये कुराणाचा अपमान करण्यात आलाय. दुर्गापूजा पंडालमध्ये कुराण हिंदू देव हनुमानाच्या पायावर ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. जेव्हा ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा एकच गोंधळ उडाला.

आणि काही धर्मांध लोकांनी येऊन त्या मंडपाची तोडफोड केली. ही घटना बुधवार, १३ ऑक्टोबर रोजी ढाक्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या चांदपूर जिल्ह्यात घडली. दुर्गापूजा पंडालवर कट्टरतावाद्यांच्या हिंसक जमावाने हल्ला केला. त्यांनी हिंदू देवी -देवतांच्या मूर्तींचीही तोडफोड केली. मीडिया रिपोर्टनुसार, या हिंसाचारात ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. ५० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

यावर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. आणि या समाजकंटकांना इशारा दिलाय. त्या म्हण्टल्यात,

कोमिलाच्या मंदिरातील तोडफोड ही दुर्दैवी घटना आहे. जे लोक लोकांचा विश्वास जिंकू शकत नाहीत आणि ज्यांची कोणतीही विचारधारा नाही, तेच असे हल्ले करू शकतात. धर्म वैयक्तिक आहे. आणि सण सर्वांसाठी आहेत. आम्ही सर्व सण एकत्र साजरे करतो. पण काही लोक धर्मांध असतात आणि असे लोक नेहमी जातीय संघर्ष निर्माण करतात. असे लोक केवळ मुस्लिम समाजातच नाहीत, तर इतर धर्मातही आहेत. जर आपण एकत्र काम केले तर असे लोक यशस्वी होणार नाहीत.

जो कोणी या हल्ल्यात सामील आहे त्याला सोडणार नाही. मग तो कोणत्याही धर्माचा असो. गुन्हेगार कोणत्याही धर्माचा असला तरी गुन्हेगारांना पकडले जाईल आणि त्यांना शिक्षा केली जाईल. 

आणि त्यासोबत भारताला ही सल्ला दिलाय. 

भारतात असं काही घडू नये ज्यामुळे त्याचा आमच्या देशावर परिणाम होईल. आमच्या हिंदूंना त्या  अडचणींना सामोरे जावे लागेल. भारतात मुस्लिमांसोबत काही घडलं तर आमच्या देशातल्या हिंदूंवर त्याचा वाईट परिणाम होतो. भारतानेही याबाबत सावध राहण्याची गरज आहे. जगभरातील वाढत्या दहशतवादी कारवायांमुळेही आमचा देश ही भरडला जातोय.

यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बांग्लादेशात शेख हसीनांनी केलेल्या कारवाईचं समाधानकारक असं वर्णन केलय. ते म्हणतात,

बांगलादेशमध्ये धार्मिक समारंभांदरम्यान हिंसाचाराचे रिपोर्ट आम्ही पाहिले आहेत. बांग्लादेश सरकारने तातडीने कारवाई केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दले तैनात केली. दुर्गा पूजा सोहळा बांगलादेश सरकार आणि तेथील लोकांच्या सहकार्यानेच शक्य झाला.

कट्टरतावादाला बांग्लादेश सरकार अजिबात खतपाणी घालत नाही हेच या घटनेवरून दिसून येतंय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.