एकेकाळी अतिशय श्रीमंत असणारा बंजारा समाज इंग्रजांच्या रेल्वेमुळे देशोधडीला लागला.

बंजारा म्हटलं की संपूर्ण देशभरात विखुरलेला तांड्याने फिरून आपला उदरनिर्वाह करणारा समाज. काही राज्यांत यांचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश होतो तर काही ठिकाणी भटक्या व विमुक्त जमाती मध्ये. गेली अनेक वर्ष दारिद्याने पिचलेल्या या गोर बंजारा समाजाचा इतिहास मात्र श्रीमंतीचा आहे.

याचे धागेदोरे मिळतात हडप्पा संस्कृती पासून.

साधारण १९२१ साली हडप्पा आणि मोहंजोदारो येथे सिंधू संस्कृतीचा शोध लागला. उत्खननात सापडलेल्या वस्तूंवरून हे लक्षात आले की त्याकाळी व्यापार हा लेणदेण वर म्हणजेच बार्टर सिस्टीम प्रमाणे चालायचा. हा व्यापार बैलांवर लादून करत असत. हे व्यापारी म्हणजे आजचे गोर बंजारा. वाणिज्य करणारे म्हणून त्यांना वनज म्हणत त्यातूनच बंजारा या शब्दाची उत्पत्ती झाली असावी असे म्हणतात.

आजही बंजारा स्त्रियांचा वेगवेगळे काचांचे मण्याचे दागिने व पोशाख पाहिला की त्यांचा सिंधू संस्कृतीचा वारसा लक्षात येतो. त्यांच्या गीतात देखील याचा उल्लेख येतो,

“सिंधू नदी रे पालेम सप्त सिंधू रे राळेम

आरिया दामडिया दाम लगायो रे मारे सेनानायका  “

पूर्वापार पासून मध्य युगापर्यंत ही व्यापारी जमात होती. वाहतूक दळणवळण यावर त्यांची पकड होती. लाखो बैल असलेले तांडे होते. धान्य, मीठ, नारळ, खजूर व इतर जीवनावश्यक वस्तूंची ते ने आण करत असत. यातही मुख्य मिठाची वाहतूक होती.

लवण म्हणजे मीठ वाहणारे यापासून ‘लमाणी’ हे नाव त्यांना मिळाले.

त्यांच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती मिळत नाही परंतु ते स्वतःला राजपूत कुळीतील राणा प्रतापाचे वंशज म्हणवतात. वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांची एक आगळी संस्कृती निर्माण झाली.

भारतात इ.स.१३९६ खूप मोठा दुष्काळ पसरला होता. दुष्काळाच्या वेळी अन्नासाठी हजारो लोक तडफडत मरत असताना बंजारानि नेपाळ, चीन,तिबेट,ब्रम्हदेश, इराण,काबुल इ.भागातून धान्य आणून लोकांना जगवलं. त्यामुळे बंजारा समाजाला प्रचंड प्रतिष्ठा मिळाली होती. त्याकाळच्या ओव्यांमध्ये हि हे जाणवून येते.

“लमाणी नवरा भाग्याचा बायजी 

हातात कडा सोन्याचा बायजी 

कंबरेला कडदोरा चांदीचा बायजी

लमाणी नवरा हवाजी”

राजस्थानातून मुघलांच्या काळी ते महाराष्ट्रात आले. 

बंजारा लोकांना  देशातील सर्व प्रमुख रस्त्यांची माहिती होती. त्यांच्याकडे संपूर्ण देशात एखादी वस्तू पोहचवायची असेल तर योग्य वितरण व्यवस्था होती. कठीण पाऊलवाटांची माहिती होती. आजचे घाट, रस्ते हे मुळच्या बंजारा मार्गांवरच बनले आहेत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी आपसुक बंजारा समाज लढवय्या बनला.

देशातील आर्थिक राजकीय स्थिती वर त्यांचं बारीक लक्ष होत.

बंजारा फक्त व्यापार करत नव्हते तर वेगवेगळ्या लढाईमध्ये गुंतलेल्या सैन्याला रसद पोहचवण्याचंही काम करत होते.  ते युद्ध प्रसंगी तटस्थ असत. दोन्ही बाजूच्या सैन्याला धान्य पुरवण्याचे काम ते निष्ठेने करत. डोक्यावर लावलेल्या लिंबाच्या डहाळीवरून ओळखत असे कि सैन्याला रसद पुरवणारे लमाणी आले आहेत. त्यांना कोणताही सैनिक इजा करत नसे.

मुघलांपासून मराठा साम्राज्यापर्यंत प्रत्येक राजसत्तेला बंजारा समाजाने ही मदत केली. यामुळे प्रत्येक दरबारात बंजारा नायकांना महत्वाचे स्थान होते.

उदाहरणच घ्यायचं झालं तर लख्खी राय बंजारा याना दिल्लीला मुघलच्या दरबारात मानाचे स्थान होते. कापूस, चुना पावडर आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड या गोष्टी ते मुघलांना पुरवायचे.

मध्य आशियातून भारतात होणारा व्यापार लखीराय यांच्या माध्यमातून व्हायचा.

त्यांच्याकडे 4 तांडे होते. प्रत्येक तांड्यामध्ये 5 हजार बैल गाड्या आणि रक्षणासाठी 1 लाख सैन्य होतं. लाखो गाई म्हैशी, खेचर, घोडे, हत्ती यांच्या तांड्यात होते. हे तांडे एखाद्या शहरापेक्षा मोठे असायचे. या लाखो जणांचं पोट लखी राय यांच्यावर अवलंबून होतं.

लख्खीराय यांचा तांडा ज्या भागातून फिरायचा तेथे रस्ता तयार व्हायचा. याच व्यापारी प्रवासात त्यांनी उत्तर भारतात शेकडो तळी, विहिरि बांधल्या. धर्मशाळा उभारल्या. किल्ले बांधले.

लखीराय बंजारा यांच्याप्रमाणे अनेक बंजारा योद्धे भारतीय व्यापाराचा कणा होते.

अठराव्या शतकात इंग्रजांचे भारतात प्राबल्य वाढले. युरोपियन संस्कृतीत वाढलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना बैल, घोडे, घेऊन फिरणाऱ्या बंजारा तांडे हे जिप्सी आहेत असा गैरसमज झाला. याच समजुतीतून त्यांनी बंजारा समाजाचा व्यापार पाडण्याचा प्रयत्न केला.

बंजारा समाजाला गुन्हेगारी जमातींच्या यादीत टाकले.

याच काळात भारतात दळणवळणाच्या सुविधा निर्माण होत होत्या. पक्के रस्ते उभारले जात होते. यामुळे बंजारा समाजाचा उदरभरणाचा उद्योग धोक्यात आला. विशेषतः १८५३ साली आलेल्या रेल्वेमुळे मालवाहतुकीचा मोठा पर्याय उभा राहिला.

रेल्वेचे जाळे देशभर पसरले आणि अन्नधान्य पुरवणारा बंजारा समाज पूर्णपणे देशोधडीला लागला.

पोटाची खळगी भरण्यासाठी बंजारा तांडे व्यापारी मार्गाजवळ डोंगर दऱ्यात माळरानात चारापाणी पाहून वसले. मोठमोठ्या तांड्याना देखील आपल्या जनावरांना सांभाळणे अवघड होऊ लागले. १८९४ साली इंग्रज सरकारने जंगलातील गोंद चारोळी, मोळ्या विकण्यावर देखील घातली. पोटापाण्याचा हा उद्योग देखील हिरावून घेण्यात आला.

या कारणामुळे तत्कालीन बंजारा समाजातील तरुण गुन्हेगारी कडे वळला.

इंग्रजांनी बंजारा समाजाच्या कपाळावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का आणखी गडद झाला. काही स्वातंत्र्ययोद्धे बंजारा समाजाला संघटित करून ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना देखील चिरडून टाकण्यात आले.

महाराष्ट्रात मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा खानदेश भागात लमाणी तांडे कायमचे वसले. काही तांडे शेती व्यवसाय करू लागले. स्त्रियापुरुष बांधकामाच्या कामावर मजुरी करू लागले. विहिरी फोडू लागला. अलीकडच्या काळात ऊसतोड कामगार म्हणून देखील बंजारा समाज काम करताना दिसतो.

एकेकाळी भारतात सर्वात श्रीमंत समजले जाणारे बंजारा अन्नान्न दशेला लागले.

त्यांच्यावरचा गुन्हेगारीचा शिक्का स्वातंत्र्यानंतर १९५२ साली पुसला गेला. महाराष्ट्रात याच समाजातील वसंतराव नाईक, सुधाकर राव नाईक यांच्या सारखे महान नेते होऊन गेले. त्यांनी  केलेल्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीच्या प्रयत्नामुळे विकासाची गंगा या भटक्या लोकांपर्यंत येऊन पोहचली.

आज बंजारा तरुण शिक्षणाच्या सोयीमुळे तांड्यातून बाहेर पडला आहे. पुण्यामुंबईत मोठमोठ्या नोकऱ्यांच्या ठिकाणी या समाजातील तरुण-तरुणी काम करताना दिसतात. चारपाच हजार वर्षे अव्याहतपणे भ्रमंती करणारा हा समाज आता स्थिरावला जरी असला तरी आपल्या गौरवशाली इतिहासाच्या आठवणी आणि परंपरा तो जरूर सांभाळत आहे.

हे हि वाच भिडू 

24 Comments
 1. Vaibhav says

  Banjara mhanje vanjari ka asel tar please sanga

 2. Vaibhav says

  Banjara ani vanjari samajache kahi sabadha ahe ka

 3. arjun phad says

  rajstana tun alele banjara til ek shakha maharashtrat Vanjari manun rahili…
  apan tyanchyatunch ahot…
  mi rajsthan madhe udaypur la eka sangrahlayat Vanjari lokanchi mahiti vachli ahe…
  he lok panjab, rajsthan, mp, jammu maharastra ani karnatak madhe jast ahet…

 4. Dr SANJAY RATHOD says

  Ekach aahet

 5. Indal says

  Nahi .banjara vegle

 6. Yograj says

  Banjara n vanjari he purnapane weg wegle samaj aahet… jawlun baghitlyas kalel donhi samajanmadhe Kontehi samya nahi…

 7. रितेश हरिष पवार says

  वंजारी आणि बंजारा वेगवेगळ्या जाती त्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या न्या.वाधवा आयोग आभ्यासा

 8. रितेश हरिष पवार says

  वंजारी आणि बंजारा वेगवेगळ्या जाती आहे.त्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या न्या.वाधवा आयोग आभ्यासा

 9. Sushil Rathod says

  Nahi vanjari marathi zale aani banjara aamhi gormati aahot.. aamchyat aani vanjari madhe jamin aasman cha fark aahe.. vanjari yanchi bhasha marathi aani aamchi gormati.. aani banjara yanche pehnava dress vegda asto so plz lakshyat theva banjara aani vanjari alag alag aahet

 10. Niranjan mude says

  बंजाराचा इतिहास खुप छान प्रकारे मांडले.

 11. Asv Sudhir Jadhav says

  Banjaras & Vanjari are different from all ways, Both have their different culture, dress, dialect, profession &many others aspects r different which proved Banjaras & Vanjari community r different from each other .

 12. Adv. Sudhir Jadhav says

  Banjaras & Vanjari are different from all ways, Both have their different culture, dress, dialect, profession &many others aspects r different which proved Banjaras & Vanjari community r different from each other .

 13. kunal says

  vanjari—— aamhi vanjari palghar jilhyatle aahot aamche kaahi shabd gujarati tar kahi shabd MP til pradeshik bhashetle aahet. aani mul udaypur yethil aahot ase aikivaaat aahe

 14. भारत says

  च छान उल्लेखनिय बाजू मण्डली दादा अजूण महीती आपूरि आहे त

 15. दिनेश राठोड says

  “लमाणी नवरा भाग्याचा बायजी
  हातात कडा सोन्याचा बायजी
  कंबरेला करदोडा चांदीचा बायजी
  लमाणी नवरा हवाजी” सर ही ओवी कुठल्या पुस्तकात आहे हे कळेल का

 16. Devidas says

  लेखात एकदम विरोधाभास आहे

 17. दिनेश राठोड says

  सर काय विरोधाभास आहे

 18. Ashok says

  Jay sevalal

 19. Papalal says

  Jay savalal

 20. Vaishali Kedar says

  Vanjari samajatil…Lok…mulache Rajasthan Che.

  Sagale udarnirvahasathi..deshbhar tar itar prantat spread jhale…
  So don’t debate…

 21. हेमंत मेघावत says

  आमच्या समाजाची माहिती उत्तम प्रकारे मांडल्याबद्दल आभारी आहे🙏🙏खूपच छान माहिती़..

 22. हेमंत मेघावत says

  सर आपण अठरा पगड जातीत येतो का मला सांगा

 23. Rohidas Jadhav says

  सर मला माझ्या समाजाची संपूर्ण माहिती कसी मिले ते कळवा 8788275744

 24. Sahebrao Rathod says

  चितोडगड आणि पदमिना महाराणी ,राजारतणसिंग व आल्लाऊद्दीन खिलजी,यांची लढाई व तेथूनच भटकंती चा इतिहास सुरू झाला पुढे सेवालाल महाराजा ची लदेणी .

Leave A Reply

Your email address will not be published.